तुम्हाला कुणाशी गप्पागोष्टी करायला आवडतील?
दोन चार दिवसांपुर्वी, आर्लिंग्टन व्हर्जिनियाच्या एका शाळेतील मुलाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामांना एक प्रश्न विचारला की, तुम्हाला जिवंत अथवा ऐतिहासिक पैकी कशातही बसणार्या कुठल्या एकाच व्यक्तीबरोबर जेवायला आवडेल? ओबामांचे उत्तर होते महात्मा गांधी! :
"Dinner with anyone dead or alive? Well, you know, dead or alive, that's a pretty big list," Obama responded amidst laughter. The next moment he was serious.
"You know, I think that it might be Gandhi, who is a real hero of mine," Obama said. "Now, it would probably be a really small meal because he didn't eat a lot," he said amidst laughter. "But Mahatma Gandhi is someone who has inspire people across the world for the past several generations," he said. (दुवा)
तर या बातमीमुळे एक प्रश्न (थोडा बदलून) मनात घोळू लागला. जर आपल्याला कुणाएका ऐतिहासिक (हयात नसलेली) व्यक्तीबरोबर गप्पा मारायला मिळाल्या तर त्या कुणा बरोबर असतील? या काथ्याकुटा निमित्ताने काही निर्बंध घालूया: अशी ऐतिहासिक व्यक्ती १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धात सहभागी झालेली अथवा नंतरची असावी. जास्तीत जास्त पाच व्यक्ती (कमीत कमी अर्थात एक) असू शकतील मात्र त्या विविध विस्तृत (ब्रॉड) क्षेत्रातील असाव्यात. प्रत्येक क्षेत्रातील एकचः राजकारण, साहीत्य, शास्त्र, कला, समाजकारण.
बोला कोण कोण येतात डोक्यात आणि नक्की त्यांच्यातील कशाचे आकर्षण वाटते?
वाचन
23609
प्रतिक्रिया
0