कालची खादाडी सुरळीच्या वड्या (उर्फ खांडवी)
नमस्कार मंडळी, काल सक्काळी सक्काळी मिपा उघडल नी समोर सुरळीच्या वड्या पाहुन चचलो.(हा तात्यापण रोज लोकांना चचवण्याचे नवनवीन उपाय शोधत असतो. विमा एजंट आहे की काय कोण जाणे.) (अजुन दिसतेयती बेटी पहील्या पानवर पण हॅ..हॅ..हॅ..हॅ.. आज मेरेपास भी वडी है.) तर सांगतो काय की ही सुरळीची वडी माझी अतिप्रिय. तात्याच्याच शब्दात सांगायच तर या वडी वर आमचा लै जीव.
काय कराव सुचेना, इकडे मोजुन २-३ भारतीय हाटेलं आहेत. तिथ काही हे असले नेमके मला आवडणारे पदार्थ मिळत नाहीत. बर स्वतः कराव तर, हा प्रयोग मी मागे १० वर्षांपुर्वी अतीसुक्ष्मलहरीभट्टीत केलाहोता. सुदैवाने तेव्हा घरात कुणी नव्हत. गुणी बाळा O:) सारख सगळ किचन नीट आवरुन ठेवल होतं. तरी आईला शंका आलीच :W .
किचन जरा जास्तच चकचकीत दिसत होत. :?
तर असो ... हापिसात थोड गुगलुन पाहील. एक दोन रेशीप्यांची प्रिंटआउटस काढली. आणि ठरवल की आज ह्या वड्या पाडायच्याच.
पुढे कृती सचित्र देत आहे. जेणे करुन माझ्या सारख्या नवशीक्या हौशी खवय्यांना सोप्प जाव.
१)सर्वप्रथम लागणारा कच्चामाल.
१ वाटी चण्याच पीठ. (बेसन)
१ वाटी दही .
(चित्रात १/२ वाटी दिसतय, पण हौशी झालो म्हणुन कय झाल... परत २० + २० मिनिट गाडीची चाक तुडवत दुकानात जाण जीवावर आलं. त्यामुळे आहे त्यात निभावुन नेल.)
१ वाटी पाणी.
१/२ चमचा हळद.
१/२ हिंग.
मीठ चवीनुसार
सजावटी साठी : नारळ, कोथिंबीर.
फोडणी साठी : तेल, मोहरी, हिरवी मिरची
२) बेसन, दही, पाणी एकत्र करुन त्यात हळद, मीठ,हिंग(मी चवी साठी १/४ चमचा आल लसणाची पेस्ट पण टाकली) टाकुन चांगले फेटावे.
गुठळ्या होउदेउ नये. गुठळ्या होणे हा बेसनाचा जन्मजात हक्क आहे आणि तो तो बजावतोच. पण त्याला त्या पासुन परावृत्त करण्यासाठी मी सगळ मिश्रण मिक्सर मध्ये घातल. B)
३) जाड बुडाच्या पातेल्यात थोड तेल तापवल.
४) तयार मिश्रण त्यात टाकुन मंद आचे वर शिजत ठेवल. सतत ढवळत रहाव लागत, गुठळ्या होउदेउ नयेत.
५) मिश्रण शिजत आल की लगेच एक अॅल्युमिनीयम फॉईल वर हे मिश्रण कलथॅने पसरवावे.
६) साधारण ५ मिनिटांनी सुरीने उभे १ ते १/२ इंच रुंदिचे चरे पाडावे.
७) अलगद हाताने रोल करुन वड्या बनवाव्या.
८) वरुन नारळ कोथिंबीर पेरावी.
९) मोहरीची फोडणी करुन वरुन तडका द्यावा. (फोडणी करताना त्यात हिरवी मिरची कापुन टाकल्यास तिचा थोडा तिखट पणा तेलात उतरतो. मी घाई धाईत टाकायला विसरलो)
पाककृतीस लागणारा वेळ. १५-२० मिनिटे.(सर्व कच्चामाल हाताशी असल्यास).
आवरायला लागणार वेळ. १ तास.
मी किचन मध्ये शिरलो की "पाककृती नको पण पसारा आवर" हे माझ्या बायकोच पेटंट वाक्य. त्यामुळे तिने सक्त ताकीद दिली आहे कि जर पसारा आवरणार असशील तरच आत ये. पण सध्या एकटाजीव असल्याने आपलच राज्य आहे किचनवर ;)
विसु: जर तुमच्या घरी झालेला पसारा आणि भांडी घासण्यासाठी बाई वा गडी (मग भले ती/तो लग्नाची का असेना) नसेल तर या भनगडीत पडु ने.
खासु: तात्याने प्रवृत्त केल्याने ही रेशीपी त्यांना समर्पीत.
वाचने
14437
वाचनखूण
प्रतिक्रिया
30
लई भारी...
आइशप्पथ
In reply to आइशप्पथ by सहज
सहजराव,
In reply to आइशप्पथ by सहज
अगदी सहमत - १००% !!
व्वा. भुक
धन्यवाद......
सुरळीच्या वड्या..
सचित्र
काय बोलू?
अरे वा
अहाहा,
गणप्याव्...
मलाही करून पाहण्याचा हुरूप आला! यातच आपले यश सामावलेले आहे!!
साष्टांग
In reply to साष्टांग by स्वाती२
धन्यवाद
In reply to धन्यवाद by गणपा
रेसिप्याव
In reply to रेसिप्याव by स्वाती२
हॅ हॅ हॅ...
अरे
सह्ही
एकदम मस्त
लई भारी...
ते तेल फोडणिचे असेल
सह्हि दिसताहेत रे वड्या..
मस्तच
मस्तच!
आभार
वड्यातर
मस्त..
मस्तच
मस्त आहे