Skip to main content

पाणीपुरी

लेखक भोचक यांनी मंगळवार, 22/09/2009 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
पाणीपुरी हा काय पदार्थ आहे? 'पाणीपुरी' आणि तीही 'खायची'? छ्या. पुरीत भरलेलं पाणी प्यायचं की खायचं? आणि त्यातलं पाणी महत्त्वाचं की पुरी? त्या क्षुद्र पातळ पुरीला खायचं काय? (आणि त्या पुरीतल्या पाण्यात असतं तरी काय? नुस्तं आंबटगोडपणा. उगाचच, दिवस गेलेल्या बाईसारखं वाटतं.) खाणं म्हणजे कसं असावं, ज्यातून आत्मानंद, परमात्मानंद मिळाला पाहिजे. एकेक घास खाता खाता परमोच्च आनंदाची प्राप्ती झाल्याचा फील आला नाही तर ते खाणं कसलं? त्यामुळे आंबटगोड पाणीपुरीविषयी अस्मादिकांची मतं अशी 'तिखट' होती. पण इंदूरला आलो नि पुदिन्याचं पाणी पिऊन दुसर्‍या दिवशी पोटाचं जे होतं, तसे सगळे समज-गैरसमज 'स्वच्छ' झालेत.

आणि तिथे भारतीय गरुड उतरला ....

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 22/09/2009 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
चीनच्या अतिक्रमणाच्या पार्श्वभुमीवर भारतीय वायुदलाने लद्दाख येथील अत्यानुधिक न्योमा विमानतळावर एक नवीन धावपट्टी तातडीने बांधुन घेतली आहे. चीनच्या हेलिकॉप्टर्सनी नुकताच हवाई हद्दीचा भंग करत खडकांवर लाल अक्षरांत मँडरिन भाषेमधून साइनबोर्ड रंगवल्यानंतर तातडीने हालचाल करत भारताने त्याला प्रत्युत्तर दिले आहे. आतापर्यंत इथे फक्त हेलिकॉप्टर्स उतरत असत. पण नुकतेच वायुदलाचा शौर्यचक्र विजेता चमू, ग्रुप कॅप्टन एस. सी. चाफेकर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ए एन ३२ जातीचे मालवाहु विमान न्योमा विमानतळावरील नव्याने बांधण्यात आलेल्या धावपट्टीवर उतरवले.

बाबा नवाथे!

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 22/09/2009 15:13 या दिवशी प्रकाशित केले.
तसे बाबा नवाथे जॉली होते. वयस्करच होते. ८० प्लस म्हणा ना! अलिकडेच वारले! सोसायटीत सर्वांशी तसे मिळून मिसळून वागायचे. गच्चीत जायच्या जिन्यावर नेहमी बसलेले असायचे. पण सोसायटीतलं पब्लिक नेहमी त्याची थट्टा-मस्करीच करायचं. आणि ती करताना बर्‍याचदा त्यांच्या वयाचा मुलाहिजा राखला जात नसे. पण बाबा नवाथे कधी कुणावर रागावायचे नाहीत! पुढे पुढे तर लोकं त्या म्हातार्‍याची जास्तच भंकस करू लागले, टेर उडवू लागले. नाही, तसं बाबांचही चुकायचं. म्हातार्‍याला बसण्या-उठण्याची जराही आदब नसे. उघडेबंब, आत लंगोट नसलेली चट्टेरीपट्टेरी हाफ चड्डी घालून बघावं तेव्हा म्हातारा गच्चीत जायच्या जिन्यात बसलेला असायचा.

खळबळजनक बातमी... हे असे आणखी किती दिवस चालणार?

लेखक मड्डम यांनी मंगळवार, 22/09/2009 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
खालची बातमी वाचा हे असे आणखी किती दिवस चालणार? गँगरेपनंतर महिलेला जीवंत जाळले मुंबई मुंबईच्‍या एन्टॉप हिलमध्‍ये एका महिलेवर सामुहिक बलात्कार करून त्यानंतर तिला आगीत टाकून दिल्‍याची खळबळजनक घटना घडली असून आगीत मोठ्या प्रमाणावर भाजलेल्‍या या तरुणीचे येथील सायन हॉस्पिटलमध्‍ये उपचारा दरम्‍यान निधन झाले आहे. या 24 वर्षीय महिलेला दोन मुले असून पोलिसांनी या क्रुर घटनेतील चार आरोपींना अटक केली आहे. या चार आरोपींपैकी एकाचे या महिलेवर एकतर्फी प्रेम होते त्‍यातून त्याने हे कृत्य केले आहे.

जबरदस्त

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 22/09/2009 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
"पश्या रात्री माझ्याकडे झोपायला येतोस का आज?" नंदु अगदी अजीजीने विचारत होता मला. "साल्या कोणी ऐकले तर काय म्हणेल ? खी खी खी" मी तेव्हड्यात नंद्याची खेचुन घेतली. "आय एम सिरीयस यार. आई बाबा बालाजीला गेल्यापासुन ३ दिवस मी काढले कसे तरी पण एक तर नविन घर आणी त्यातुन आज अमावस्या...." "बर बर चल दस्ती बंद कर आता, १०.०० पर्यंत येतो मी बाटली घेउन" मी नंद्याला डोळा मारत म्हणालो. साधारण १०.३० च्या सुमारास मी नंद्याच्या घरी पोचलो. "का रे येव्हडा उशीर झाला ?" "यार नंद्या, तुमच्या सोसायटीच्या कॉर्नरला कोणीतरी माणुस अचानक रस्त्यातच मरुन पडलाय रे, भवतेक त्याला जोरदार हार्ट अ‍ॅटॅक आलेला दिसतोय.

भूताप: आटोक्यात ठेवण्याचे उपाय

लेखक नरेंद्र गोळे यांनी मंगळवार, 22/09/2009 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
भूताप: आटोक्यात ठेवण्याचे उपाय मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८११२४ मूळ इंग्रजी लेखः ग्लोबल वॉर्मिंग: मीन्स टु अरेस्ट मूळ इंग्रजी लेखकः गोरा चक्रबोर्ती २६ जुलै २००६ रोजी एकाच दिवसात संततधार ९४४ मिलीमीटर पाऊस पडला. गेल्या काही वर्षांत कॅटरिनासारख्या वादळांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे. डिसेंबर २००६ मधे दोहा शहर अनैसर्गिकरीत्या, पावसासहित आलेल्या वादळाने पंगुवत झाले होते. गेल्या वर्षी, २००७ साली, राजस्थानच्या वाळवंटी क्षेत्रांत, जैसलमेर जिल्ह्यात हिरवळ उगवली होती.

गणित

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 22/09/2009 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
कधी शब्द ते वत्सल कधी प्रहार झेलायाचे कधी ओंजारणे स्नेहाळ कधी आघात सोसाट्याचे मनात असते कायम भय आंधळ्या डोहाचे अंधारभुल होते धुसर सुसाट वारे दु:खाचे येते नभा पल्याडुन बोलावणे कधी सौख्याचे कधी कोसळणे आकाश ओझे ते अनपेक्षिततेचे कोवळ्या अन किरणांतुनी ओघळणे कधी सुर्याचे रखरखाट कुठे तप्तसा हे जगणे असंतुलनाचे मी शोधतो वाट माझी सोडवीत गुंते रस्त्यांचे सुटले नाही कधीही मज गणित आयुष्याचे विशाल.

बटाट्याचे साँग (song)

लेखक लवंगी यांनी मंगळवार, 22/09/2009 07:48 या दिवशी प्रकाशित केले.
सूचना: या पाककृतीचा आणि खाण्याचा संबध आहे .. गाण्याशी काहि संबध नाहि.. मी जेंव्हा नविन लग्न होऊन सासरी आले तेंव्हा कोकणी सासरी आपला कसा निभाव लागणार हा मोठ्ठा प्रश्न माझ्यासमोर होता. पण दुधात साखर मिसळावी तशी नविन घरी कधी रुळले ते कळलच नाही. जेवण करायची खूप आवड सुरवातीपासून असल्याने आईहि खूष होत्या. मलातर कोकणी पाककृतीच्या रुपात मोठा खजिना हातात लागल्यासारखे झाले. त्या सुरवातिच्या दिवसात आईंच्या हाताखाली शिकलेल्या पदार्थांपैकी एक बटाट्याचे सॉंग. आज नवरोंबाचा वाढदिवस म्हणून खास बनवली ही भाजी.

कृतज्ञतेवर माझा विश्वास आहे.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 22/09/2009 05:21 या दिवशी प्रकाशित केले.
आज मी व प्रो.देसाई आमच्या एका मित्राच्या घरी गेलो होतो.खरं तर हा आमचा मित्र आता ह्या जगात नव्हता.पण त्याची एकूलतीएक मुलगी त्या घरात राहात होती.तिलाच भेटायला म्हणून गेलो होतो. अलिकडे आमचा हा मित्र-अनिल धायगुडे- वरचेवर आजारी पडायचा.आता वयोमानामुळे आजार येत राहणं क्रमपात्र होतं,पण अनिलला जरा जास्तच त्रास होत होता.मुळात त्याला मधूमेहाची बाधा होती.हा छूपा रोग एव्हडा भयंकर आहे की तो सर्व शरिर निरनीराळ्या कारणानी खाऊन टाकतो.आणि बरेचवेळां स्थूल शरिरयष्टी असली की मधूमेहाचा शिरकाव हटकून होतो. तशात त्याच्या दोन शस्त्रक्रिया झाल्या होत्या.

केक कापायच्या विविध पद्धती

लेखक चिरोटा यांनी मंगळवार, 22/09/2009 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
समजा एक केक दोन व्यक्तींमध्ये- आणि मध्ये समान वाटायचा आहे तर कसा वाटता येईल? नेहमी वापरली जाणारी पद्धत- १)तिसर्‍या व्यक्तीने(समजा ने) एक छेद देवून केकचे दोन भाग करणे. २)अ(किंवा ब ने ) ने प्रथम त्याच्या आवडीचा तुकडा उचलणे. ३)ब(किंवा अ ने) ने दुसरा तुकडा उचलणे. वरील पद्धत fair(न्याय्य) म्हणता येईल का? क च्या द्रुष्टिकोनातून अर्थातच ती आहे पण अ किंवा ब च्या नजरेतून ती असेलच असे नाही.म्हणजे ब ला ही विभागणी ७०%-३०% ही वाटु शकेल व तो ही विभागणी अन्याय्य म्हणेल.