Skip to main content

कुलंग... जेथे आकाश ठेंगणे वाटते...

लेखक विमुक्त यांनी शुक्रवार, 25/09/2009 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
"येत्या विकऐंडला कुलंगला जायचा बेत आहे... येतोस का?" असा राहुलदादाचा SMS आला... खूप दिवसांपासून मला कुलंगला जायच होतं... कळसुबाईच्या कुशीत अलंग, मदन आणि कुलंग विसावले आहेत... इगतपुरीच्या परिसरात अजीबात भटकलो नव्हतो... तिकडच्या डोंगररांगा जरा वेगळ्याच आहेत... आकाश सुद्धा ठेंगण वाटावं असे उंच डोंगर आहेत... मग शुक्रवारचं काम संपवून मी बदलापुरला राहुलदादा कडे पोचलो... रात्री सगळी तयारी करुन झोपी गेलो... पहाटे ५.४६ च्या लोकलने कल्याणला पोचलो आणि मग कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलमधे चढलो... राहूलदादा, अरुण सर, निलीमा मँडम, अवळे सर आणि मी असे आम्ही पाचजण कुलंगला चाललो होतो...

torrents

लेखक अभिजा यांनी शुक्रवार, 25/09/2009 13:01 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या कोणती टोरेन्ट्स साईट चांगली आहे? मी पूर्वी देसीटोर्रेन्ट्स.कॉम चा सभासद होतो. मला वाटत्तं की ती साईट आता पेड साईट आहे. कोणी खुलासा करू शकेल काय? धन्यवाद!

ती ...

लेखक मनीषा यांनी शुक्रवार, 25/09/2009 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
अशीच एकदा, मला ती दिसली बरीचशी माझ्यासारखी ..... पण तरीही खूप वेगळी तिला विचारलं मी, कुठून आलीस? आणि आता कुठे चाललीस?

रान

लेखक क्रान्ति यांनी शुक्रवार, 25/09/2009 09:05 या दिवशी प्रकाशित केले.
ज्याच्या सावलीचा धरावा विश्वास विषवल्ली कवटाळे त्या वृक्षास जळला मोहर, झडली पालवी, दिसे रिता, पर्णहीन तो भकास विषवल्ली तरारली, फोफावली, वाढत चालली; वेढत चालली घनदाट गर्द हिरव्या रानाला, एकेका वृक्षाची गिळत सावली रान कुठे आता? उद्ध्वस्त स्मशान घोंघावतो वारा एकटा बेभान उघडे-बोडके निष्पर्ण सांगाडे फांदीफांदीवर भुतांचे थैमान क्षणात अवघे चित्र पालटेल वठल्या वृक्षाला धुमारा फुटेल मिटतील विध्वंसाच्या खाणाखुणा, पुन्हा रानात या गारवा दाटेल मन रान, विषवल्ली अहंभाव वेड्या, कर तिचा वेळीच पाडाव जाळ तिची बीजं, तोड तिच्या फांद्या, आणि जिंकून घे आयुष्याचा डाव
काव्यरस

आईचा गोंधळ घालते आईचा जोगवा मागते हे गाणे हवे आहे..

लेखक नानबा यांनी शुक्रवार, 25/09/2009 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
आईचा गोंधळ घालते आईचा जोगवा मागते हे उषाताईंचे विस्णुदासांचे गाणे ताबड्तोब/ लौकर हवे आहे. कुणाकडे mp3 असल्यास माझ्या आईच्या इ मेल आयडी s.phadnis217@gmail.com वर पाठवाल का???

टोस्ट...Tea Rusk...

लेखक दिपाली पाटिल यांनी शुक्रवार, 25/09/2009 03:33 या दिवशी प्रकाशित केले.
साहीत्यः ४ कप मैदा (मैदा+गव्हाचे पीठ किंवा गव्हाचे पीठ, मी गव्हाचे पीठ घेतलेय...) २ टीस्पून यीस्ट १/२ कप + २ टेस्पून साखर १.५ कप कोमट दुध १ टेस्पून मीठ १/४ कप बटर किंवा तुप (याचं प्रमाण जेव्हढं जास्त तेव्हढा खुसखुशीतपणा वाढेल...) कुटलेली दालचीनी, जायफळ आले बारिक तुकडे करुन कृती: १) एका वाडग्यात २ टेस्पून साखर + २ टीस्पून यीस्ट मिसळुन घ्यावे. २) साखर्+यीस्ट मध्ये १/२ कप कोमट दुध घालाव

टार्‍या म्हणजेच लव्हचुंबक

लेखक टारझन यांनी शुक्रवार, 25/09/2009 01:32 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार्स लोक्स , ढिष्क्लेमर्स : १. वांङमय लिहीण्याचा माझा पहिलाच प्रयत्न आहे .. :) लहान तोंडी लै मोठा घास घेतोय संभाळून घ्या ;) टारझन ही माझी अफ्रिकन इमेज .. माझी रियल इमेज आणि व्हर्चुअल इमेज ह्या मधे जी काही कष्मिषकिष्मिश का काय रे .. चाललं होतं त्याच्या परिणाम म्हणजे हे वांङमय ! सगळे हलकेच घ्यायचे आहे बरं ! २. कमजोर हृदयाच्या लोकांना लेख अतिशय हिण& हिणकस वाटण्याची शक्यता आहे , त्यांनी इथेच थांबलेलं बरं ! पुन्हा "मिपावर हे काय येतंय ?

माझा भ्रमणध्वनी क्रमांक आता बदलणार नाही :)

लेखक देवदत्त यांनी शुक्रवार, 25/09/2009 01:06 या दिवशी प्रकाशित केले.
वर्ष २००८. पुण्यात एअरटेलचे प्रिपेड कार्ड घेउन बहिणीला मुंबईत दिले होते. पण काही कारणाने त्यावरून काही संपर्क करीता येत नव्हता. कार्डमध्ये बाकी असलेले पैसे ही पाहता येत नव्हते. कसातरी ग्राहक सेवेचा क्रमांक शोधून काढला. पण कार्ड पुण्याचे, मी ठाणे/मुंबईत. ह्या वरून त्यांनी मला भरपूर फोनाफोनी करावयास लावली. त्यातच एकाने मला ९८२००९८२०० हा नंबर दिला म्हणाला "ह्या क्रमांकावर एअरटेलला संपर्क करा." मला खात्री होती की तो क्रमांक हच/वोडाफोनचा आहे. पण त्यास माहीत नव्हते बहुधा.