
साहीत्यः
४ कप मैदा (मैदा+गव्हाचे पीठ किंवा गव्हाचे पीठ, मी गव्हाचे पीठ घेतलेय...)
२ टीस्पून यीस्ट
१/२ कप + २ टेस्पून साखर
१.५ कप कोमट दुध
१ टेस्पून मीठ
१/४ कप बटर किंवा तुप (याचं प्रमाण जेव्हढं जास्त तेव्हढा खुसखुशीतपणा वाढेल...)
कुटलेली दालचीनी, जायफळ
आले बारिक तुकडे करुन

कृती:
१) एका वाडग्यात २ टेस्पून साखर + २ टीस्पून यीस्ट मिसळुन घ्यावे.
२) साखर्+यीस्ट मध्ये १/२ कप कोमट दुध घालावे आणि ५-७ मिनीटे बाजुला ठेवुन द्यावे.
३) १ कप दुध + १/४ कप बटर +१/२ कप साखर एकत्र करुन गॅसवर अगदी कोमट तापवावे...अगदी बटर वितळेपर्यंतच, जास्त गरम करु नये.
४) आता मैदा + यीस्टचे मिश्रण + वरिल दुध+तुप्+साखरेचे मिश्रण + आले+ दालचीनी-जायफळ एकत्र करुन ५-१० मिनीटे मळुन घेणे.
५) १ १/२ तास उबदार ठिकाणी पीठ फुगायला ठेवा...जवळजवळ दुप्पट फुगुन येइल.
६) हाताने ४-५ पंच मारुन पीठ परत अर्धा-एक मिनीट मळा.
७) २ बेकिंग ट्रे ला ग्रीस करुन ठेवा
८) आता त्याचे ४ भाग करुन त्या गोळ्यांना जाड लाटुन घ्या आणि लांब-लांब गुंडाळी करुन वरुन पाण्याचा हात फिरवून बेकिंग शीट किंवा कुकी शीटवर ठेवा.
९) आता अजुन ४५ मिनीटे उबदार जागी ठेवुन द्या.
१०) ३५० फॅ.वर २५-३० मिनीटे बेक करा...
११) आता या ब्रेड्सना ४-५ तास थंड होऊ द्या आणि नंतर अंदाजे १/२ इंच जाड चकत्या कापुन घ्या...
१२) आता या चकत्यांना कुकी शीटवर ठेवून २८० फॅ. वर ३० मि. बेक करा...अधनं-मधनं बघत रहावं लागतं...
१३) हलक्या तपकीरी रंगावर कडक झाले की हे टोस्ट झाले समजावे...

टीपा:
बाहेरच्या इतकं छान लागणार नाही बहुधा...गव्हाच्या पीठापेक्षा मैद्याचे जास्त छान लागतात.
बटर,साखर-मीठाचे प्रमाण जरुरीप्रमाणे बदलावे....
आवडीनुसार तीळ, खसखस, मनुका ही घालु शकता..