Skip to main content

हेमंत

लेखक अन्वय यांनी शनिवार, 26/09/2009 22:11 या दिवशी प्रकाशित केले.
फासले ऐसे भी होंगे, ये कभी सोचा न था... सामने बैठा था मेरे, लेकिन वो मेरा न था... आपलं असूनही कुणी आपलं नाही, ही वेदना कुणालाही बेचैन करते. हेमंत राग ही वेदना फार तीव्रतेने व्यक्त करतो. आशा आणि निराशा यातील अवकाश म्हंजे हेमंत! त्यात बेचैनी, व्याकूळता, विरहवेदना आहेच; पण तो येईल कधीतरी... होईलच आपला, हे समाधान आणि आसही त्यात आहे. हेमंत रागाला व्यक्त करणारी माझिया प्रियाला प्रीत कळेना...

'नोकरशाई' च्या निमित्ताने

लेखक विनायक पाचलग यांनी शनिवार, 26/09/2009 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
नोक्रशाईचे रंग या पुस्तकाच्या अनुषंगाने केलेले एक मुक्तचिंतन. ''नोकरशाही व्यवस्था'' नाव घेतल्यावरच दचकलात ना!" आता कोणती नवी गडबड! "अशीच तुमचा प्रतिक्रिया असणार, अगदी बरोबर आहे. सर्वसामान्यांना नको वाटणारी अशीच ही व्यवस्था . ती सरकारी ऑफिसेस, गर्दी, ते कधीतरीच भेटणारे साहेबलोक! चहापाणी ,अग आई ग!आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे टेबलाखालची देवाण-घेवाण. थोडक्यात काय, तर लोकांना त्राही त्राही करून सोडणारी एक व्यवस्था आणि त्याचबरोबर मेंदूत अगदी नकळतपणे कुठेतरी उमटणारा 'नको रे बाबा!' चा सूर! खरे ना? सर्वसामान्य माणसांच्या डोक्यात साधारणत: हेच चित्र उभे राहणार, आणि राहिलेच पाहिजे म्हणा!

न्यायशास्त्रभ्यासासंबंधी एक प्रश्न.

लेखक हैयो हैयैयो यांनी शनिवार, 26/09/2009 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
न्यायशास्त्रभ्यासासंबंधी एक प्रश्न.
नमस्कार, श्री. अमर्त्य सेन ह्यांनी अलिकडेच 'ऐडिआ आफ् जस्टिस्' नामक एक पुस्तक लिहिले आहे. त्यासंबंधीची मराठीभाषिक वृत्तपत्रांतील परीक्षणे अभ्यासतांना एका वृत्तपत्रांत श्री. अमर्त्य ह्यांनी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेचा वृत्तांत वाचनांत आला. ह्या पत्रकार परिषदेमध्ये श्री. अमर्त्यांनी पत्रकारमित्रांस एक प्रश्न केला, आणि त्याची सकारण समर्पक उत्तरे मागविली. त्या प्रश्नासंबंधी चर्चा होणे मला येथे अपेक्षित आहे. श्री. अमर्त्य ह्यांचा प्रश्न असा : अ, ब, क ह्या तीन स्वतंत्र व्यक्ती आहेत.

त्यांना हवी मरण्याची परवानगी....

लेखक अमित बेधुन्द मनचि लहर यांनी शनिवार, 26/09/2009 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
राज्याच्या ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या पण जिल्हा परिषदांच्या माध्यमातून काम करणाऱ्या भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या मेकॅनिकल विभागातील डेप्युटी इंजिनीयर अंगद सावंत यांनी त्यांच्याच खात्याच्या प्रधान सचिवांकडेच 'मरण्याची परवानगी' मागितली आहे. कोणत्या प्रकारचा अवंलब करून, कोणत्या दिवशी व कोणत्या वेळी मरावे, याबाबत सुस्पष्टपणे लेखी परवानगी मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. अंगद सावंत यांनी सातारा येथेही काम केले असून, सातारा जिल्हा परिषदेच्या काही अधिकारी व पदाधिकाऱ्यांबद्दलही त्यांच्या भ्रष्टाचाराच्या गंभीर तक्रारी आहेत.

अमेरिकन काटकसरी झाला.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 26/09/2009 06:43 या दिवशी प्रकाशित केले.
आता पर्यंत अमेरिकेत सोन्याचा धूर जळत होता.साधारण २००७ पासून सर्व धूर जळून गेला.अमेरिकन कफल्लक झाला.आणि त्याला तोच जबाबदार आहे. त्याची हांव,ग्रीड,नडली. आहे त्यापेक्षा अधिक हवं,दोन माणसांना पाच बेडरूमचं घर हवंच.मॉलमधे जायचं, दिसेल ते खरेदी करायचं, आणि घरी आणायचं. कालांतराने ते अर्धवट वापरून किंवा न वापरून घरात झालेल्या वेअरहाऊसमधे दामटून टाकायचं.कां तर अमेरिकन एकॉनॉमी "अर्न ऍन्ड स्पेन्ड" वर चालते.क्रेडीट कार्डावर दहा दहा हजार, डॉलर्स कर्ज काढा.

एक नवा प्रस्ताव मांडू इच्छितो!

लेखक सुधीर काळे यांनी शुक्रवार, 25/09/2009 21:32 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वश्री तात्यासाहेब, विकास, चतुरंग, बिपिन व इतर मिपा मॅनेजमेंटचे सदस्यः (इतरांची नावें अद्याप माहीत नाहींत) मी एक प्रस्ताव मांडू इच्छितो. बर्‍याचदा आपल्या वाचनात एकादी झकास ललितकलेतली गोष्ट येते; ते व्यंगचित्र असेल किंवा एकादा आंग्ल भाषेतला लेख असेल किंवा कविता असेल. ती प्रस्तुतकर्त्याने लिहिलेली नसेल, अमराठी असेल, पण त्याला/तिला ती मिपावरील सभासदांना सांगण्यायोग्य वाटत असेल तर आज मिपावर अशी कांहीं सोय नाहीं. उदा: जेंव्हा ए. आर. रहमान यांना ऑस्कर पारितोषिक मिळाले त्यावेळी एका पाकिस्तानी विचारवंताने/प्राध्यापकाने एका पाकिस्तानी वृत्तपत्रात लिहिलेला एक अतीशय सुंदर लेख माझ्या वाचनात आला.

शतघौतघृत

लेखक अमृतांजन यांनी शुक्रवार, 25/09/2009 21:15 या दिवशी प्रकाशित केले.
शतघौतघृत हा विलक्षण प्रकार गायीचे दुध वापरुन बनवलेल्या तुपापासून करतात. प्रक्रिया:
  • जेव्हढे तूप घ्याल त्याच्या शंभरपट पाणी घ्या.
  • ते पाणी एका पातेल्यात घेऊन त्यात तूप घाला व शंभर वेळा ते पाणी डावी-उजवी कडे फिरवा.
  • शंभरवेळा झाले की पाणी फेकून द्या.
  • असे शंभर वेळा करा.
= १०० * १००
  • असे सिद्ध धूतलेले तूप जखमेवर वापरुन पहा. चूटकीसरशी जखम भरुन येते.
  • ओठ फाटत असल्यास ओठांना लावा व चमत्कार पहा.
  • चेहऱ्याला लावा आणि पहा कशी कांती चमकदार होते ते.

सारे भारतीय माझे...

लेखक विकास यांनी शुक्रवार, 25/09/2009 20:56 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय उपखंडाच्या बाबतीत साधारणतः १९व्या शतकापासून एक विधान केले गेले आहे की येथे दक्षिणेत द्रवीड नामक समाज होता आणि उत्तरेत युरोप आणि इतर ठिकाणाहून आर्य आले त्यांची वसाहत वाढली आणि बघता बघता त्यांची भाषा आणि संस्कृती यांनी देश व्यापला गेला. मॅक्समुल्लरशी झालेल्या वैचारीक देवाणघेवाणीतून लोकमान्य टिळकांचा आणि त्यानंतर बहुतांशी अनेक विचारवंतांचा असाच समज झाला होता की आर्य आणि पर्यायाने संस्कृत देशाबाहेरून आली आहे वगैरे... कालांतराने दोन गट पडले एक आर्य-द्रविड असा भेद मानणारा. दक्षिणेत या भेदामुळे एकेकाळी देशातून फुटून जाण्याची भाषा पण होती. अजूनही स्वतःचे वेगळे पण सांगितले जातेच.

गॅरी आणि मी

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 25/09/2009 19:50 या दिवशी प्रकाशित केले.
मी राहातो ठाण्याला. तो राहतो साउथ अफ्रिकेला. सध्या जरी कोच म्हणुन भारतिय क्रिकेट बरोबर असतो. मला क्रिकेटपटु मधे स्वारस्य नाही. मी क्रिकेट फारसे बघत नाही. क्रिकेट थोडेफार कळते. वर्ल्ड कप जिंकल्यावर( २ दा) सगळ्या भारतियांप्रमाणे मला सुद्धा आनंद झाला होता. जिंकल्यावर टी.वी वर हायपर होणारे (धोनी के धुरंदर वैग्रे)आणि हरल्यावर देश पार धुळीला मिळाल्यागत अश्रुपतन करणारे टी.वी चे बातमीदार मला अस्वस्थ करतात. एकंदरीत क्रिकेट बरोबर फारसे सख्य नाही. सध्याच्या दिनचर्येत वर्तमानपत्राला स्थान नाही. संध्याकाळी वाचण्यात अर्थ नाही. टी.वी.