सारे भारतीय माझे...
भारतीय उपखंडाच्या बाबतीत साधारणतः १९व्या शतकापासून एक विधान केले गेले आहे की येथे दक्षिणेत द्रवीड नामक समाज होता आणि उत्तरेत युरोप आणि इतर ठिकाणाहून आर्य आले त्यांची वसाहत वाढली आणि बघता बघता त्यांची भाषा आणि संस्कृती यांनी देश व्यापला गेला. मॅक्समुल्लरशी झालेल्या वैचारीक देवाणघेवाणीतून लोकमान्य टिळकांचा आणि त्यानंतर बहुतांशी अनेक विचारवंतांचा असाच समज झाला होता की आर्य आणि पर्यायाने संस्कृत देशाबाहेरून आली आहे वगैरे...
कालांतराने दोन गट पडले एक आर्य-द्रविड असा भेद मानणारा. दक्षिणेत या भेदामुळे एकेकाळी देशातून फुटून जाण्याची भाषा पण होती. अजूनही स्वतःचे वेगळे पण सांगितले जातेच. दुसरा गट हा भेद न मानणारा आणि अनेक भौगोलीक (उ.द. सरस्वती नदी, द्वारका) सत्ये उपग्रहाद्वारे उलगडणारा, तसेच ही कधीकाळची परकीयांची येथील "नेटीव्हां"ना कमी लेखायची आणि भेद घडवून आणायची कॉन्स्पिरसी मानणारा. आजच्या एका बातमीमुळे यातील राजकारणावर जरी उत्तर मिळणार नसेल तरी समाजकारणावर चांगला प्रकाश पडला आहे असे वाटले.
हार्वर्ड विद्यापिठ, एमाआयटी आणि भारतीय शास्त्रज्ञ यांनी एकत्रीत केलेल्या संशोधनात अनेक जनुकांचा (जीन्सचा) अभ्यास केला गेला, त्यातील समानता अथवा विषमता शोधली गेली. आणि असे लक्षात आले की शास्त्रीय अनुमानाप्रमाणे असा भेद अस्तित्वात असू शकत नाही. लाखाच्या संख्येत "जेनेटीक मार्कर्स" पासून ते अगदी जातीनिहाय जीन्सचा यात अभ्यास केला गेला.
काही वाक्ये वेळेअभावी भाषांतरीत न करता तशीच्या तशीच खाली उर्धृत करत आहे:
..."``The initial settlement took place 65,000 years ago in the Andamans and in ancient south India around the same time, which led to population growth in this part,'' said Thangarajan. He added, ``At a later stage, 40,000 years ago, the ancient north Indians emerged which in turn led to rise in numbers here. But at some point of time, the ancient north and the ancient south mixed, giving birth to a different set of population. And that is the population which exists now and there is a genetic relationship between the population within India.'' ...
..."The researchers, who are now keen on exploring whether Eurasians descended from ANI, find in their study that ANIs are related to western Eurasians, while the ASIs do not share any similarity with any other population across the world. However, researchers said there was no scientific proof of whether Indians went to Europe first or the other way round. "...
...
"Between 135,000 and 75,000 years ago, the East-African droughts shrunk the water volume of the lake Malawi by at least 95%, causing migration out of Africa. Which route did they take? Researchers say their study of the tribes of Andaman and Nicobar islands using complete mitochondrial DNA sequences and its comparison those of world populations has led to the theory of a ``southern coastal route'' of migration from East Africa through India.
This finding is against the prevailing view of a northern route of migration via Middle East, Europe, south-east Asia, Australia and then to India. "
वाचने
5397
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
रोचक बातमी +१
छान माहिती
In reply to छान माहिती by सुनील
+१
In reply to छान माहिती by सुनील
रोचक नक्की पण
In reply to रोचक नक्की पण by विकास
"टाईम"मधील एक जुना लेख
In reply to "टाईम"मधील एक जुना लेख by सुधीर काळे
अगदी बरोबर
ANI & ASI
द्रविड
बातम्यांचा आधार
In reply to बातम्यांचा आधार by श्रावण मोडक
शोध---
In reply to शोध--- by विकास
हाहाहाहा
धन्यवाद
नेहरुंच्या "भारत -एक खोज " पुस्तकातही चा॑गले विवेचन केले आहे....