३३ कोटी
परवाच बोलताना कोणीतरी म्हणाले की ३३ कोटी देव आहेत.
सहज विचार केला तर ज्या वेळेस देव ही संकल्पना आस्तित्वात आली तेंव्हा ज्ञात जगाची लोकसंख्या सुद्धा ३३ कोटी नसेल. मग हे ३३ कोटी देव आले कोठून?
जिथे १०० कौरवांची नावेच कोणाच्या लक्षात नाहीत तिथे ३३ कोटी कसे लक्षात रहाणार.
गणपतिची फ्यामिली ( वडील शंकर ,आईपार्वती , भाऊ कार्तिकेय , पत्न्या रिद्धी आणि सिद्धी ) विष्णूची फ्यामिली ( पत्नी लक्ष्मी आणि दशावतारातील इतर पत्न्या) ब्रह्मदेवाची फ्यामिली. विरोबा वेतोबा भैरोबा म्हसोबा म्हाळसाई सटवाई हे स्थानीक उपदेव असे ज्ञात सगळे मिळूनसुद्धा ३३ कोटी होत नाहीत.
मिसळपाव