Skip to main content

गीतार्थ बोधिनीचे लेखक कोण?

लेखक अविनाश ओगले यांनी शुक्रवार, 09/10/2009 21:56 या दिवशी प्रकाशित केले.
गीतार्थ बोधिनी नावाचा एक खूप जुना ग्रंथ नुकताच पाहण्यात आला. पहिली काही पाने फाटलेली असल्याने लेखक, प्रकाशक, प्रकाशन वर्ष ही माहिती उपलब्ध नाही. गीतेचा मूळ श्लोक, समश्लोक, आर्या, दोहा, ओवी, अभंग (मूळ श्लोकाच्या आशयाची) असे या ग्रंथाचे स्वरुप आहे. अध्यायांच्या सुरवातीला वामनकृत असा उल्लेख आहे. ही रचना वामन पंडितांची असावी या समजुतीने खापरे.ऑर्ग वर शोध घेतला. तिथे वामन पंडितांच्या साहित्यकृतीत या पुस्तकाचा उल्लेख नाही. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या साईटवर त्यांच्याकडील जुन्या ग्रंथांच्या यादीत या नावाचे एक पुस्तक आहे पण लेखकाचा उल्लेख नाही. याबद्दल कुणी अचूक माहिती देऊ शकेल काय?

ऐरावती रत्न थोर

लेखक विकास यांनी शुक्रवार, 09/10/2009 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
नोबेल पुरस्कार (विशेष करून शांतता) देताना राजकारण होते हे नक्कीच. ते केवळ अमेरिकन फिक्सिंग नसून नॉर्वेजीयन फिक्सिंग आहे, किंबहूना हे महासत्तांचे एकत्रीत फिक्सिंग आहे. बर्‍याचदा ज्या देशात सौंदर्यसाधने खपवायची असतात त्या देशातील युवतींना "मिस युनिव्हर्स" केले जाते तसेच ज्या मुद्यांना जोर देयचा असतो त्यातील व्यक्तीस नोबेल शांतता पुरस्कार दिला जातो. म्हणूनच दुर्दैवाने गांधीजींना मिळाला नाही. नेहरूंनी तर इतके चीन विरुद्ध शांतताप्रिय राहून हरून दाखवले तरी देखील मिळाला नाही कारण त्या काळातील जागतीक राजकारणात त्याचे महत्व नव्हते.

मराठी नहीं है राज ठाकरे..!

लेखक मड्डम यांनी शुक्रवार, 09/10/2009 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
राज ठाकरे यांचे आंदोलन आणि मुंबई मराठी माणसाचीच या त्‍यांच्‍या भूमिकेवर हिंदी माध्‍यमातून नेहमीच टीका केली जात असते. मात्र एका हिंदी भाषकाने तर राज यांच्‍या मराठी असण्‍यावरच प्रश्‍नचिन्‍ह उपस्थित केले आहे.

टाटा स्काय प्लस... माहिती हवी आहे...

लेखक भडकमकर मास्तर यांनी शुक्रवार, 09/10/2009 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
हे टाटा स्काय प्लस प्रकरण जेव्हा गेल्या वर्षी आले होते तेव्हा चांगलेच इन्ट्रेष्टिंग वाटले होते पण किंमत महाग म्हणून आम्ही घेतले नाही.. डीटीएच मध्ये लाईव्ह टीव्ही पॊज, रेकॊर्ड आणि रिवाईन्ड ्करता येते. ४५ तासाचे रेकॊर्डिंग उपलब्ध असते. ते लोक असे म्हणतात की आपली टीव्ही पहायची पद्धत बदलून टाकेल टाटा स्काय प्लस. पुष्कळ निरर्थक पाहण्यात वेळ जातो, त्याऐवजी मोजकेच उपयोगी कार्यक्रम पाहिले जातील असे वाटते. तेव्हा किंमत ९ हजार होती.

घर

लेखक टुकुल यांनी शुक्रवार, 09/10/2009 13:47 या दिवशी प्रकाशित केले.
टप, टप, टप करत बाजुच्या खिडकिवरचे पावसाचे थेंब जुन्या आठवणींत ओढताहेत. परवा माझ्या नवीन फ्लॅट चा ताबा मिळनार, नवीन फ्लॅट बराच मोठा आणी मस्त सोसायटीत आहे म्हणुन घरचे सर्व जण खुष, आनंद आहे, पण काय माहीत माझ्या सध्याच्या घराला काय वाटत असावे! -------------- खर्रर खर्रर खच्च, घरासमोर ४०७ टेंपो येवुन थांबला, बोलल्याप्रमाणे आज घराचा ताबा घेण्यासाठी दशरथ आला होता.

पुरुषप्रधान मालिका : थूंकू

लेखक llपुण्याचे पेशवेll यांनी शुक्रवार, 09/10/2009 09:56 या दिवशी प्रकाशित केले.
गेले अनेक दिवस (विषेशतः हापिसातून घरी गेल्यावर) डोक्याला शॉट लावणार्‍या आणि महिलांच्या डोळ्यातून पाणी काढणार्‍या अनेक मालिकांचे रतिब विविध वाहीन्या घालत असतात. पूर्वी सास-बहूच्या मालिकांचे रतिब हिंदी वाहीन्या घालत असत (हुश्श तेव्हा आमच्याकडे केबल नव्हती). तर सांगण्याचा मुद्दा हा कि या भयंकर कंटाळवाण्या मालिका घरी गेल्यावर सोसाव्या लागतात. अगदी आतल्या खोलीत जाऊन काही वाचन करावे म्हटले तरी आजूबाजूच्या घरातून येणारा असल्याच मालिकांचा आवाज आणि त्यांचे पार्श्वसंगीत यामुळे डोके उठते. त्यामुळे कधी कधी बा**ला हापिसात बसून काम करत सडलेले बरे असे वाटून जाते.

आचार्य अत्र्यांच्या भाषणाचा दुवा

लेखक सुमीत भातखंडे यांनी शुक्रवार, 09/10/2009 05:02 या दिवशी प्रकाशित केले.
आचार्य अत्र्यांच्या वक्त्रुत्व कलेबद्दल आजवर ऐकत आलो होतो - वाचत आलो होतो. एखादं भाषण खरंच ऐकायला मिळावं असं खूप वाटायचं. आणि आज हा दुवा सापडला: http://www.youtube.com/watch?v=19WXh6YP02g मी स्वतः अजून सगळे भाग ऐकलेले नाहीत. पण राहावलं नाही म्हणून आधीच इथे दुवा देत आहे. पण जे काही ऐकलय त्यावरून तरी, इट्स अमेझींग.

लोकाग्रहास्तव पंचामृत

लेखक प्रभो यांनी शुक्रवार, 09/10/2009 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
आज पेश करतोय लोकाग्रहास्तव (विशेषतः विशाल, गणपा, स्वाती राजेश , स्वाती २ यांच्या आग्रहास्तव ) गौरीच्या नैवेद्यातील माझा सर्वात आवडणारा पदार्थ पंचामृत कच्चा मालः १. एक-दीड ईंच लांबीचे खोबर्‍याचे पातळ काप (१५-२०) २. भाजलेले शेंगादाणे (१५-२०) ३. हिरव्या मिरचीचे तुकडे (१५-२०) ४. कोथिंबीर ५. कडीपत्ता ६. भाजलेल्या तिळाचे कूट (अर्धी छोटी वाटी) ७. शेंगदाणा कूट (अर्धी छोटी वाटी) ८. मीठ ९. चिंच १०.गुळ ११. जिरे १२. मोहरी १३.

व्हाईट चिकन चिली

लेखक स्वाती२ यांनी गुरुवार, 08/10/2009 18:53 या दिवशी प्रकाशित केले.
इथे फॉल सुरू झालाय. तेव्हा थंड पावसाळी हवेत गरम गरम खाण्यासाठी- व्हाईट चिकन चिली आणि कॉर्न ब्रेड कॉर्न ब्रेड साहित्य १ कप मैदा १ कप कॉर्नमिल ३ टे स्पून साखर १ १/२ टी स्पून बेकिंग पावडर १/२ टी स्पून मीठ १ कप दूध १/४ कप तेल १ अंडे, फेटून १/२ ढब्बू मिरची बारीक चिरून आवडत असल्यास (मी लाल ढब्बू मिरची वापरते) कृती ओवन ४००F तापत ठेवावा. ९इंच वाल्या चौकोनी बेकिंग पॅनला आतून तेलाचा हात लावून घ्यावा. एका मोठ्या वाडग्यात मैदा, कॉर्नमिल, बेकिंग पावडर,साखर, मीठ एकत्र करावे.