Skip to main content

नेटकर

लेखक कौतुक शिरोडकर यांनी मंगळवार, 13/10/2009 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
तिचा माझा संसार, तसा 'वेल सेट' आहे इथे 'मी', तिथे 'ती'... मध्ये 'इंटरनेट' आहे जग कुठच्या कुठे गेलय ? म्हणून तर... घराच्याच कोपर्‍यात, मांडलं युग 'जेट' आहे कोण म्हणतो आहे इथे, फक्त 'खिडाक्यां'चे राज्य आमच्यासाठी 'विन्डो' , आख्खं इंडीया 'गेट' आहे माणसांचा वावर...
काव्यरस

(धूळधाण)

लेखक अमृतांजन यांनी मंगळवार, 13/10/2009 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
तुझा फोटो पाहून व्यवहाराचे गणित समजून घेताना तुझ्या गोतावळ्याचा हिशोब लिहू लागले तेव्हा... तेव्हा म्हणालास, "सासू, दिर, भावजय, आणि नणंद ह्यांचा हिशोब लावतेयसच कशाला? लग्न आपल्यासाठी असतं अन नातीगोती भांडणं करण्याऱ्यांसाठी. नातलग सगळे सारखेच- इथून-तिथून." स्वार्थ पाहण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा हेच आठवून मी बाजूला सरले कारण त्या वेगळ्या संसारात भलं आपलंच होतं डोकं वापरुन निर्माण केलेलं! *** गेल्या दसरा-दिवाळीत आपण घर आवरत होतो आता पुन्हा सण आलाय... आता पसारा आवरुन घायचा आहे माळ्यावरची बोचकी-बाचकी फेकण्याचा मनोसंकल्प तरी तडीस न्यावाच लागेल, कारण बोहारणीकडून चांगलेसे भांडे मिळवण्याचे रंजन त्यातच!

मंद

लेखक पर्नल नेने मराठे यांनी मंगळवार, 13/10/2009 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
निम्मा पैसा तुझा दारुत उडुन गेला अन उरला सुरला टॅक्ससाठी मान्ड्ला गेला का असा तु मंद मित्र घेवुन जातात फेसाळत्या उत्साहात स्वर्गभास अन्धारलेल्या बारच्या कामीनींवर पैसा उडवण्यासाठी *** कडुकारल्यासारखा रस पिउन फुलता अन शरीरे ताबा जाउनी झुलती का असा तु मंद मित्र कधिच घेत नाहित त्यांच्या बिलाचा फास अन वेटर घेवुन जातो क्रेडीट कार्ड तु स्वॅप रोज चोळामोळा झालेल्या अर्थव्यवस्थेच्या रान्गेत असलेल्या बॅन्ककरप्सीसाठी
काव्यरस

'ठेवणीतला' प्रश्‍न!

लेखक दिनेश५७ यांनी मंगळवार, 13/10/2009 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
'ठेवणीतला' प्रश्‍न! 'आकाशातून कोसळणाऱ्या धारांच्या माऱ्यातून वाट काढत आमची एस. टी. मुंगीच्या पावलानं पुढे सरकत होती. खिडक्‍यांच्या काचांवरही ढग साचले होते आणि त्यावर बोटं फिरवून साफ केलेल्या काचेतून बाहेर पाहात माझ्या शेजारच्या सीटवरचा तो वयस्कर प्रवासी सुन्न सुस्कारे सोडत होता. त्याचा चेहराही काळजीनं भरल्यासारखा होत होता. ...धुवांधार पावसानं सिंधुदुर्ग जिल्ह्यात थैमान घातलंय, जनजीवन पुरतं कोलमडून गेलंय....एरव्ही वाहनांनी गजबजून पळणारा मुंबई-गोवा महामार्ग सुनासुना आहे. एखादं मागे फिरून परतणारं वाहन आणि पावसातून वाट काढत जमेल तितकं पुढे जाण्याचा प्रयत्न करणारी एस. टी.

(हगवण)

लेखक शाहरुख यांनी मंगळवार, 13/10/2009 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
तू सांगितलंस म्हणून सगळीकडच्या मिसळींची चव घेताना बरी मिसळ सापडली होती तेंव्हा... तेव्हा म्हणालास, गल्ली, बोळातल्या आणि पेठेतल्या कुठल्याही मिसळी खातोस कशाला? मिसळ एकाच ठिकाणी खायची, अन् ती पण डब्बल हाणायची. मिसळीची खरी चव एकच-तिथलीच खायला जाण्याची वेळ आली तेव्हा हेच शब्द तुझे निर्णायक ठरले कारण गाव तर तुझंच होतं मला फारसं माहित नसणारं *** गेल्या कळेला फेरी मारून मी आलो होतो आता पुन्हा एकदा कळ आलीय ताकद नसली तरी जायचं आहे एकाच फेरीत पोट साफ करायचा खटाटोप तरी करावाच लागेल, कारण मिसळ खायची हाव तर आहेच तू मिसळ खात असशील! मनसोक्त, नेहमीसारखीच मीही खाणार!!
काव्यरस

(सुगरण)

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी मंगळवार, 13/10/2009 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
(प्रेरणा: मिभोकाकांनी दिलेली सुपारी) तू सांगितलंस तेव्हा पट्टीची सुगरण कशी समजून घेताना मोदकांसाठी सामान लिहू लागले तेव्हा तेव्हा म्हणालास ... "नारळ, पिठी, गूळ, आणि मीठाच्या भानगडीत पडतेस कशाला? मोदक दोघांसाठीच आहे, अन पाककला इतरांसाठी. मोदकाची जात एकच - उकडीची" तेव्हा तुझे हेच शब्द आधार वाटले पण जोशींचं दुकान बंद दिसलं माझा आधारच काढून घेणारं *** गेल्या अंगारकी चतुर्थीला आपण सावरलो होतो पुन्हा पंचांग पहायचं राहिलं आता मोजून खरेदी करायचं आहे वाढू लागलेलं वजन कमी करण्याचा खटाटोप तरी करावा लागेलच कारण जुन्या कपड्यात मावण्याचं स्वप्न
काव्यरस

हा काय म्हणतो पहा.. आणि निवडणूक आयोग तोंड बंद करुन बसला आहे

लेखक हर्षद आनंदी यांनी मंगळवार, 13/10/2009 08:27 या दिवशी प्रकाशित केले.
सनातन प्रभात मध्ये आलेली ही बातमी... अश्या उमेदवारांना राष्ट्रवादी पार्टी तिकिटे देते, त्या पक्षाचा जाहीर निषेध !! बाकी काय करु शकतो आपण?

(विरजण)

लेखक मिसळभोक्ता यांनी मंगळवार, 13/10/2009 03:00 या दिवशी प्रकाशित केले.
(प्रेरणा: सांगायलाच हवी काय?) तू बोलावलंस म्हणून प्रतिसादांच्या दूधदुभत्याने प्रसन्न जाऊन लेखांमागून लेख पाडू लागलो तेव्हा... तेव्हा म्हणालास, ‘’क्या बात है, +१, असेच म्हणतो या खेळात पडतोसच कशाला? दूधदुभतं स्वतःसाठी असतं, अन् विरजण मिसळ्भोक्त्यांसाठी. तात्याची जात एकच - (म्हातार्‍याचा) नातू हीच" ताक पिण्याची वेळ आली तेव्हा हेच विरजण तुझा आधार ठरले कारण त्या मडक्यात दही तयारच होतं लेखनाचा उत्साहच काढून घेणारं! *** गेल्या त्या काळी मनोगतावर आपण वावरलो होतो आता ह्या काळी मिपा झालंय... आता आवरून घ्यायचं आहे रद्द केलेले सदस्यत्त्व विसरण्याचा खटाटोप तरी करावाच लागेल, कारण मालकाला शिव्या देण्याचं एक
काव्यरस

(प्रकरण)

लेखक बेसनलाडू यांनी मंगळवार, 13/10/2009 01:57 या दिवशी प्रकाशित केले.
तू सांगितलंस म्हणून मेकॅनिक्स् चं प्रकरण समजून घेताना फोर्सेसचे कम्पोनन्ट्स् लिहू लागलो तेव्हा... तेव्हा म्हणालीस, एफ् साइन् थिटा, एफ् कॉस् थिटाच्या या प्रकरणात पडतोसच कशाला? 'प्रकरण' दोघांसाठी असतं, अन् मेकॅनिक्स् फक्त मार्क मिळविण्यासाठी प्रकरणाची जात एकच - लफडं हीच लफडं करण्याची वेळ आली तेव्हा हेच शब्द माझ्यावर आघात ठरले कारण तुझ्या प्रकरणात नाव भलत्याचंच होतं माझा आधारच काढून घेणारं! *** गेल्या वार्षिक परीक्षेत मी बोंबललो होतो पुन्हा वार्षिक परीक्षा आलीय... आता पास व्हायचंच आहे मागे खाल्लेली गटांगळी विसरण्याचा खटाटोप तरी करावाच लागेल, कारण पास होण्याचं एक स्वप्न त्यातलंच! तू आपटली असशीलच!
काव्यरस