Skip to main content

(धूळधाण)

लेखक अमृतांजन यांनी मंगळवार, 13/10/2009 या दिवशी प्रकाशित केले.
तुझा फोटो पाहून व्यवहाराचे गणित समजून घेताना तुझ्या गोतावळ्याचा हिशोब लिहू लागले तेव्हा... तेव्हा म्हणालास, "सासू, दिर, भावजय, आणि नणंद ह्यांचा हिशोब लावतेयसच कशाला? लग्न आपल्यासाठी असतं अन नातीगोती भांडणं करण्याऱ्यांसाठी. नातलग सगळे सारखेच- इथून-तिथून." स्वार्थ पाहण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा हेच आठवून मी बाजूला सरले कारण त्या वेगळ्या संसारात भलं आपलंच होतं डोकं वापरुन निर्माण केलेलं! *** गेल्या दसरा-दिवाळीत आपण घर आवरत होतो आता पुन्हा सण आलाय... आता पसारा आवरुन घायचा आहे माळ्यावरची बोचकी-बाचकी फेकण्याचा मनोसंकल्प तरी तडीस न्यावाच लागेल, कारण बोहारणीकडून चांगलेसे भांडे मिळवण्याचे रंजन त्यातच! तू पडला असशील! धापकन, बावळटासारखाच मीही पडले!! शिडी घसरुन, रापकन, तिच ती खोक कपाळावर जन्मभर मिरवून घेत! या वेदनेची कळ मात्र आता मला मिटवायची आहे मेडीकल इन्सुरन्सच्या तुझ्या पॉलीसीत ती कुठं बसेल?
लेखनविषय:

वाचने 3214
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

या, तुमचेही स्वागत!!! :)

In reply to by श्रावण मोडक

चूभू द्यावी-घ्यावी. :-) हे विडंबन-पुष्प आपल्या चरणी वाहतांना मनाला जो काही आनंद झाला त्यास काय वर्णावे.

मस्त :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

माझ्या ह्या विडंबनाच्या पहिल्यच प्रयत्नाला चांगली दाद मिळाल्यामुळे मला खूप स्फुरण चढले आहे. आभारी.

In reply to by अमृतांजन

मला खूप स्फुरण चढले आहे. मिपाकरांनो, कुठे फेडाल ही पापं ? उसके घर देर है, अंधेर नही ! चित्रगुप्ताने ह्या उत्तेजनाची नोंद घेतलेली आहे. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by मिसळभोक्ता

आयला ! चित्रगुप्ताला कुठल्या कुठल्या उत्तेजनांची नोंद ठेवावी लागत असेल नै?? --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by अवलिया

चित्रगुप्ताला कुठल्या कुठल्या उत्तेजनांची नोंद ठेवावी लागत असेल नै?? नाना, अरे जगाचा आरोह सुरू झाला, आणि तू अजून अवरोहातच अडकला आहेस ! (बुल्स आणि बेअर्स ना शुद्ध मराठीत आरोही आणि अवरोही म्हणजावे का ?) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by चतुरंग

चालायचंच... सगळ्याच दुधाचं दही होत नाही.. काही नासत.. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.