Skip to main content

दीप रंग..

लेखक प्राजु यांनी सोमवार, 19/10/2009 07:39 या दिवशी प्रकाशित केले.
धूसर झाल्या नभी तारका आसमंती बेहोष हिवाळी, मेहंदी रंगल्या सोनपाऊली पहाट घेऊन येई दिवाळी.. मंद तेवते दीप अंगणी जणू नक्षत्रे उतरून आली, रंग माखूनी अंगावरती, जमीन सारी भरून गेली.. मंद सुगंधी अभ्यंगातून, धुंद काया होत सकाळी चंदन गंधी मुग्ध न्हाऊनी यौवनास या नवी झळाळी.. रूणझुण पैजण कर्णफ़ुले अन् सुवर्णमाला गळा ल्यायली, निळ्या जांभळ्या गर्भ रेशमी वस्त्रांकित ही तनू बावरी.. बिंदी रेखूनी भाळावरती, काजळरेखा नयनी आली साज सोवळा लेऊन दर्पणी लज्जित बाला रूप न्याहाळी.. क्षणैक नजरानजर होऊनी शृंगाराची मिळे पावती, लाजलाजली रूपगर्विता दिपोत्सवाचे रंग हासती.. - प्राजु
काव्यरस

दिल्लीची रखुमाई......सोनिया.....माझी माऊली.....

लेखक पिवळा डांबिस यांनी सोमवार, 19/10/2009 00:17 या दिवशी प्रकाशित केले.
कच्चा माल एक स्पष्टीकरण.... प्रथम माझ्या मिपाच्या वाचकांना, लेखकांना, प्रशासकांना, (आणि अवांतर मिपाकरांना) दिवाळीच्या शुभेच्छा! आणि काकांच्या लाडक्या तात्याला तर खास दिवाळीनिमित्त गोड गोड पापा!!!! :) आम्ही हे लिहित आहो हे याचं कारण आमचा सटकलेला मेंदू आणि दिवाळीच्या सुट्टी यामुळे हाताशी असलेला वेळ.... सोनिया विषयी आम्हाला खास पुळका आहे अशातला भाग नाही. आम्ही कॉन्ग्रेस किंवा भाजप पार्टीचे नाही, किंबहुना अंमळ भांडवलशाहीच आहोत!!!! उद्या सोनियाचं आमच्या दृष्टीने चुकलं तर तसंच लिहिणार.

पहाट

लेखक घोडीवाले वैद्य यांनी रविवार, 18/10/2009 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्यासारख्या रात्रीचा दिवस करणाऱ्या (म्हंजे रात्रपाळीत काम करणाऱ्या) लोकांना पहाट माहीतच नसते. दिवाळीची- नरक चतुदर्शीच्या दिवशी आम्हाला पहाट दिसते. एरवी बारावाजेपर्यंत आमचा सूर्य उगवत नाही. या वर्षीची पहाट मात्र आम्ही एन्जॉय केली. पुण्यातल्या दोन कार्यक्रमांना (सुरेश वाडकर आणि पंडित जसराज) आम्ही पहाटेच (आमच्या मध्यरात्रीला) हजर होतो. हे आम्हाला कसं काय जमलं, याचा शोध आम्ही घेतोय. पण पहाटेच उठून सात्विक आनंद घेण्याचे आम्हाला यंदा जमले खरे! एरवी आम्ही अनेकदा भरलेले ग्लास खाली करीत उत्तररात्रीची मजा घेतलीय. त्यावेळी दिसलेली पहाट आम्हाला तांबूस वाटली.

आमच्या बखरीतून...

लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 18/10/2009 15:47 या दिवशी प्रकाशित केले.
... आमचा जन्मसिद्ध हक्क ! `अध्यक्ष महाशय, पुज्य गुरुजनवर्ग आणि माझ्या प्रिय विद्यार्थीमित्रांनो,... स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळविणारच, अशी सिंहगर्जना करून ब्रिटिश सरकारला हादरवून सोडणाया नरकेसरी लोकमान्य टिळकांचा जन्म, ज्याप्रमाणे एखाद्या चिखलात सुंदर कमळ उगवावे त्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिखली या गावी झाला... त्यांच्या वडिलांचे नाव'... ... डोळे मिटून आणि मुठी घट्ट आवळून मागेपुढे झुलत मी टिळक पुण्यतिथीच्या दिवशी आमच्या कोकणातल्या गावातल्या शाळेत भाषणाला सुरुवात केली आणि `टिळकांचा जन्म चिखली या गावी झाला' या वाक्याशी येताच माझी गाडी गडबडली...

'उ'कारावर चंद्रानुस्वार कसा काढायचा?

लेखक सुधीर काळे यांनी रविवार, 18/10/2009 13:17 या दिवशी प्रकाशित केले.
उर्दू (देवनागरीत) किंवा हिंदी लिहितांना चंद्रानुस्वार वारंवार लागतात. मिपावरील गमभन सॉफ्टवेअर वापरताना 'उ'कार सोडून 'आँटी', 'कँटीन'सारखे शब्द लिहिता आले, पण हूं, यूं घूं येईनात. 'बराहा'मध्ये ते कसे लिहायचे ते माहीत होते पण 'गमभन'मध्ये लिहिता येई ना. म्हणून मी कांहीं निवडक लोकांना "'ऊ'कारावर चंद्रानुस्वार कसा द्यायचा हे कुणी सांगू शकेल काय?" हा प्रश्न विचारला उदा: "घूंघट"मधला घूं , "यूं तो हमने"मधील यूं, "मैं नशेमें हूं"मधील हूं वगैरे बर्‍याच लोकांनी त्यांनाही माहीत नाही असे कळवले, पण 'कांजी'प्रवीण (चिनी-जपानी चित्रलिपी) 'सुबक ठेंगणी'ने ताबडतोब कळवले.

शंकराचार्यांच्या कंपूतील लोकांचा पर्दाफाश आणि त्याला तात्याचे समर्थन! सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा! :)

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 18/10/2009 10:01 या दिवशी प्रकाशित केले.
आजकी ताजा खबर, आजकी ताजा खबर! शंकराचार्यांच्या कंपूतील लोकांचा पर्दाफाश! :) आणि त्याला हे आमचं समर्थन -
"ब्रह्म सत्य जगत् मिथ्या" ही विचारसरणी प्रमुख असली तरी सर्वमान्य किंवा बहुतांशी तत्त्वज्ञानी लोकांना मान्य होती अशी वस्तुस्थिती नाही.
अगदी खरं आहे.. आपल्याला तर साला पयल्यापासनंच या शंकराचार्यांचं म्हणणं पटत नाय! हां, आता आपण सर्वमान्य नाय परंतु एक सागतो.

"नशेत (तर्र) असल्यास मरणाचे काय भय"

लेखक सुधीर काळे यांनी रविवार, 18/10/2009 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
सामंतकाकांची "केला मी तर प्रारंभ पिण्या" ही कविता वाचल्यावर 'आदम' नावाच्या शायरने लिहिलेली आणि मला आवडणारी एक गझल आठवली.....! त्या गझलबद्दल कांही मला आवडलेले मुद्दे खाली देत आहे. 'उर्दू' भाषेचा प्रवास नुकताच करणार्‍यांसाठी मुद्दाम शब्दार्थही देत आहे. ज्यांना यात जास्त रुची असेल त्यांनी मरहूम डॉ. सानी व डॉ. विनय वाईकर यांनी (हे डेंटिस्ट आहेत) संपादित केलेला (आणि महत्वाची गोष्ट म्हणजे देवनागरी लिपीत रचलेला) "आईना-ए-गझल" हा शब्दकोष जरूर वाचावा. तो नुसता शब्दकोषच नसून त्यात एकादा शब्द कसा वापरला जातो ते कळावे म्हणून जवळ-जवळ १०,००० 'शेर'ही दिलेले आहेत.

जालिय लेखनाची दखल...

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी शनिवार, 17/10/2009 21:13 या दिवशी प्रकाशित केले.
आज आंतरजालावर बरीच मराठी संस्थळं भरभराटीला येत आहेत, मराठी युनिकोडसुविधेमुळे मराठी टंकन सुलभ झाले आणि ब्लॉग्जचे पेव फुटले... त्यामुळे ज्या लोकांनी आयुष्यात आपण कधी लिहू असे कल्पिलेही नसेल असे लोक लिहू लागले, मराठी वाचन कमी झाले म्हणता म्हणता या नवीन तंत्राविष्कारामुळे मराठी वाचनच नव्हे तर लेखनही वाढते आहे. एकूणातच... एक नवीन जग आकारास येत आहे. आणि आपण आजचे नेटकर या विश्वाचे सुरूवातीचे दिवस आणि वाढ अगदी पहिल्या रांगेत बसून बघतो आहोत. तर जालिय दिवस असे सुखासमाधानात जात असताना, साधारण तीनेक आठवड्यांपूर्वी अचानक रामदासांचा व्यनि आला. एखाद्या सदस्याचे सगळे लेखन बघायचे असेल तर काय करायचे?

पुलं, निळा कोल्हा आणि.....

लेखक JAGOMOHANPYARE यांनी शनिवार, 17/10/2009 18:28 या दिवशी प्रकाशित केले.
पिपात पडलेल्या निळ्या कोल्ह्याचे पितळ अखेर उघडे पडले आणि सगळ्या कोल्ह्यांनी त्याला राज्यपदावरून पदच्युत करून हाकलून दिले. निळा कोल्हा रानोमाळ भटकत निघाला आणि अखेर तो एका आमराईत आला. आमराईत जरा विश्रान्ती घ्यावी म्हणून तो एका डेरेदार झाडाच्या दिशेने निघाला. झाडाजवळ गेला आणि बघतो तर काय.. ! तिथे मध्यम वयाचा, चश्मा घातलेला आणि मिश्किल हसणारा एक माणूस एका चिमुरड्या मुलीबरोबर गाणे म्हणत होता.