आयटीवर बोलू काही..!
(संदीप - सलिल आणि त्यांच्या तमाम चाहत्यांची क्षमा मागून)
जरा मजेने, जरा खरोखर बोलू काही
चला दोस्तहो, या आयटीवर बोलू काही
उगाच गाजर ऑनसाईटचे दाखवित रहा तू
गळले नाही प्रोजेक्ट तोवर बोलू काही
पी एम. पाहून चॅटींगवर कुजबुजली पोरे
पाठ फिरू दे त्याची नंतर बोलू काही
हवेहवेसे फ्लर्ट तुला जर हवेच आहे
स्मार्ट देखण्या ट्रेनीबरोबर बोलू काही
किती काळजी अप्रेजलची बघ रांगेतुन
एप्रिल नाही तर ऑक्टोबर बोलू काही
स्किल्स असू दे सीवीमध्ये काठी म्हणुनी
रिसेशनचा प्रवास खडतर बोलू काही
मूळ गीत - आयुष्यावर बोलू काही
कवी - संदीप खरे
काव्यरस
मिसळपाव