Skip to main content

(किराणा घराण्याचा अति संक्षिप्त इतिहास...)

लेखक सुनील यांनी सोमवार, 26/10/2009 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
किराण्या घराण्याची सुरुवात देहूकर बुवांनी साधारणतः सतराव्या शतकात पुणे प्रांती केली. परंतु हे घराणे फार काळ टिकाव धरू शकले नाही. त्यांच्या विरोधी घराण्यांनी बुवांच्या हिशोबाच्या चोपड्या इंद्रायणी नदीत बुडवल्या. त्यातील काही चोपड्या नंतर बाहेर काढण्यात आल्या असल्या तरी हे घराणे नामशेषच होत गेले. बुवांपश्चात त्यांच्या घराण्याची खासियत शेजारील गुर्जर प्रांतातील शा घराण्याने उचलली. त्यानंतर जवळपास तीन शतके ह्या शा घराण्याने आपला दबदबा ह्या प्रांती कायम राखला. अगदी परवा परवा पर्यंत त्यांचा प्रभाव खेडोपाडच्या लोकांवर होता.

लाडकी लेक

लेखक वेदश्री यांनी सोमवार, 26/10/2009 10:51 या दिवशी प्रकाशित केले.
"अहो, ऐकलंत का? फीचे पैसे कधी मिळणार तुमचे? तुमच्या लाडक्या लेकीला एकही धडका ड्रेस नाही.. तो घ्यायचाय आणि जरा भाजीही आणायची होती." "आली होती पण खर्च झाली. आईला एमटी केलेत पैसे." "खर्च झाली???!!! आईंना आत्ता गेल्याच महिन्यात तर एमटी केलेलीत ना तुम्ही मग आता परत?" "भाऊला लागत होते हातऊसने.." "बास्स.. त्यांच्या उधळपट्टीला ठिगळे लावायला पैसे आहेत पण पोरांना कपडे घ्यायला नाहीत पैसे.. इतक्या दिवसांनी आलेली ती मेली फी, तीही टाकलीत देऊन आणि परत म्हणा मीच कर्कशा म्हणून.." "माझ्याकडे नाहीयेत आत्ता अजिबात पैसे. कडधान्यं कर काही दिवस." "बाबा, आईला का त्रास देता तुम्ही?

किराणा घराण्याचा संक्षिप्त इतिहास...

लेखक वाटाड्या... यांनी सोमवार, 26/10/2009 04:41 या दिवशी प्रकाशित केले.
सप्रेम नमस्कार मंडळी.. आज आपण किराणा घराण्याचा थोडक्यात आढावा घेऊयात.. किराणा घराण्याचा इतिहास हा थोडासा विचित्र आणि थोडासा वादातीत आहे तरीही ते घराणं सर्वात जास्त लोकप्रिय आहे. असं सर्वसाधारण समज आहे की किराणा घराणं उस्ताद अब्दुल करीम खाँ साहेबांपासून सुरु होतं.पण ते काही खरं नव्हे. तर, अमिर खुस्त्रोचा शिष्य 'गोपाल नायक' किराणा घराण्याचा खरा आद्य पिता आहे. त्याच्यापासुन किराणा घराणं सुरु झालं. पुर्वी तो दुताई नावाच्या यमुनातीरी असलेल्या गावी रहात असे. पण त्याने यमुनेच्या पुरामुळे आपला मुक्काम मुझफ्फरनगर जिल्ह्यातील 'किराणा' ह्या गावी हलवला.

मनसेचे भवितव्य

लेखक अक्षय पुर्णपात्रे यांनी रविवार, 25/10/2009 21:49 या दिवशी प्रकाशित केले.
विधानसभेच्या निवडणु्कीचे निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर मतदारांनी दिलेला कौल स्थैर्याच्या दिशेने आहे असे काही विश्लेषक म्हणतात तर काही विश्लेषक विरोधकांकडे नसलेल्या पर्यायी कार्यक्रमाला दोष देतात. मात्र मनसेचा प्रभाव वाढला असल्याविषयी दुमत आढळत नाही. मनसेला मिळालेल्या जागा मुख्यतः (खडकवासला आणि कन्नडचा अपवाद सोडल्यास) मुंबईत आणि नाशिकमध्ये आहेत. या शहरांमध्ये आणि काही प्रमाणात पुण्यात मनसेने मांडलेले मुद्दे लोकांना पटत आहेत असे आढळते. पण मनसे हा एक समर्थ पादेशिक पक्ष म्हणून भविष्यात उभा राहू शकेल असे आपल्याला वाटते का? ग्रामीण महाराष्ट्रात मनसेला पाय रोवता येतील का?

संघटनापालट-2

लेखक अन्वय यांनी रविवार, 25/10/2009 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
राज आणि काका बरेच दिवसांनी भेटत होते. बोलत होते. त्यामुळे बराचवेळ दोघे एकमेकांना डोळे भरून पाहात होते. नि:शब्द निरव शांतता त्या भव्य दिवाणखान्यात दाटून राहिली होती. मदतनीस आत निघून गेला होता. "काय म्हणतेय तब्येत?'' त्या शांततेत राजचा स्वर घुमला. "अजून ठणठणीत आहे. तू बघतोच आहेस.'' काका उपरोधाने बोलले. कधीकाळी आपल्या आवाजानं भल्याभल्यांची भंबेरी उडवणाऱ्या काकांचा आवाज थकल्याचं राजला स्पष्टपणे जाणवत होतं. त्यांना बोलताना मधेमधे धापही लागत होती.

आली माझ्या घरी ही दिवाळी

लेखक प्रभो यांनी रविवार, 25/10/2009 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळीला घरी गेलो होतो.त्याची काही छायाचित्रे मिपाकर कुटुंबियांसोबत शेअर करावी वाटली म्हणून इथे देत आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काढलेली रांगोळी. ही रांगोळी आईने काढली.

बायको ही सायको असते..डरकाळ्या आणि म्यांव..म्यांव

लेखक कानडाऊ योगेशु यांनी रविवार, 25/10/2009 13:38 या दिवशी प्रकाशित केले.
डरकाळ्या : - बायको ही बायको असते.. एरवी नॉर्मल असली तरी..तुमच्यासाठी सायको असते.. :T साडीचोळी साठी तिची सारखि धावाधाव असते.. तुमच्या तुंटपुंज्या बॅंकबॅलन्समधला.. बायको शिरकाव असते.. ~X( घरामध्ये नववधुसारखी.. ओलांडुनी ती माप येते.. आयुष्यभर पुढे मग.. तुमचेच माप काढत बसते..
काव्यरस

सुगरणीचा खोपा

लेखक सुनील यांनी रविवार, 25/10/2009 07:09 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या महिन्यात काही मित्रांबरोबर वाईला गेलो होतो. तिथे फिरताना झाडावर टांगलेली सुगरणीची घरटी पाहिली. मित्राने त्याचे काही फोटोदेखिल काढले. आज, मिपाच्या मुखपृष्ठावरील "खोपा" पाहून त्याची आठवण आली. स्थळ - वाई दिनांक - ५ सप्टेंबर २००९ आभार - (मिपाकर नसलेला) मित्र, सलील अवांतर - तात्यांनी दिलेल्या गाण्यातील दुव्यात बहिणाबाई चौधरींचा उल्लेख संत बहिणाबाई असा आला आहे, ते चूक आहे.

गार्गी अजून जिवंत आहे...

लेखक ऋषिकेश यांनी रविवार, 25/10/2009 01:23 या दिवशी प्रकाशित केले.
आज अचानक मंगला आठलेकर यांचं "गार्गी अजून जिवंत आहे" हे पुस्तक हातात पडलं. जन्मतारीख वगैरे नसणार्‍या काळात साधारण १९१४-१५ च्या सुमारास उत्तरप्रदेशात इलाहाबादला जन्मलेल्या गुलाबबाईची ही कहाणी. सातव्या वर्षी लग्न होऊन दहाव्या वर्षी मुलाला जन्म दिलेल्या ह्या गुलाबबाईने इतक्या जुन्या काळात इलाहाबाद-प्रयागसारख्या कट्टर धार्मिक परंपरा असलेल्या शहरात अंत्यसंस्काराच्या कामाला वयाच्या अकराव्या वर्षी सुरवात करून तिने "स्त्रियांनी स्मशानपौरोहित्य का करू नये?" असा प्रश्न तत्कालीन धर्ममार्तंडांना केला होता. ह्या स्त्रीबाबत लेखिका एक दोन पानी लेख वाचते आणि त्या स्त्रीला भेटायचंच या विचाराने तिचा शोध घेते.