Skip to main content

अपुर्णता, निमित्त, भोगवादी पात्रं आणि मिसळ-नोंदी.

लेखक Nile यांनी गुरुवार, 29/10/2009 00:28 या दिवशी प्रकाशित केले.
अपुर्णता: पुर्ण आहोतच अश्या भावनेने जेव्हा मनुष्य वावरतो तेव्हाच तो अपुर्णता सिद्ध करत असतो. निमित्तः जेव्हा गरज नसते तेव्हाही जे आपले अस्तित्व दाखवते ते निमित्त. भोगः भोगायचंच म्हणल्यावर वाट्टेल ते भोगता येतं. पात्रं: वरील पात्रं लेखकाच्या कल्पनेचा विलास आहेत वास्तव्याशी साम्य आढळल्यास दोष मराठी संकेतस्थळ या संकल्पनेला द्यावा. मिसळ: वरील सगळ्यांची मिसळ चाखलीच पाहीजे असं नाही. (क्रमशः)

मावळत्या दिनकरा

लेखक jaypal यांनी बुधवार, 28/10/2009 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
एके संध्याकाळी ठाणे रेल्वे स्टेशनच्या पुलावरुन काढलेले फोटो. शाळेत नविन असल्याने अजुन "गमभन" नीट येत नाही. सबब मानात असुनही वर्नन करता येत नाही. तो पर्यन्त फोटोंचा आनंद लुटा. हौशि छायाचित्रकार जयपाल http://www.flickr.com/photos/jayendra001/

एक ताईचा सल्ला: जो खरच फायदेशीर आहे.

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 28/10/2009 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
एक ताईचा सल्ला: जो खरच फायदेशीर आहे. आज पराशेठ चा ताईचा सल्ला वाचला अन मला माझी ताई लिहीत असणार्‍या 'साप्ताहीक सदर- ताईचा सल्ला' याची आठवण झाली. हा सल्ला जरी हलकाफूलका, खेळकर वातावरणात लिहीला गेला तरी त्यात माझ्या मते एक अतिशय चांगला सल्ला दिला गेला आहे. आजकाल सगळीकडे विज, पाणी यांच्या भविष्यातील टंचाईबद्दल बोलले जाते. तस पाहिले तर या दोन्ही गोष्टी आपण फारच हलक्या घेतो.

एक वेगळे जग- सीमलेस ट्युब

लेखक अजय भागवत यांनी बुधवार, 28/10/2009 19:50 या दिवशी प्रकाशित केले.
बॉल-बेअरींग, बंदूकीच्या आणि तोफांच्या नळ्या, प्रत्येक दुचाकी/चारचाकीचे सांगाडे, बॉम्बशेल, अनेक आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भव्य इमारती आणि जमीनीतून कच्चे तेल काढण्यासाठी तयार केलेल्या विंधणविहीरींच्या केसिंगसाठी ज्या सीमलेस ट्यूब वापरल्या जातात त्या कशा तयार करतात ह्याची माहिती अगदी थोडक्यात येथे द्यावीशी वाटते. ६० च्या दशकात जमशेदपुरला आपल्या देशातील पहिला प्रकल्प ईटलीच्या तंत्रज्ञानांच्या मदतीने उभा राहिला.

भारताचा स्वातंत्र्य संग्राम

लेखक स्वाती२ यांनी बुधवार, 28/10/2009 18:44 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, माझ्या मुलाला उन्हाळ्याच्या सुट्टीत वाचण्यासाठी मी भारतीय स्वातंत्र्य संग्रामा संबंधी पुस्तके शोधतेय. मिपाकरांनी पुस्तकांची नावे सुचवल्यास माझे पुस्तके मिळवायचे काम सोपे होईल. माझा मुलगा १४ वर्षांचा आहे. अमेरिकन इतिहास- रिवोल्युशनरी वॉर, सिविल वॉर वगैरेचा त्याचा चांगला अभ्यास आहे. भारतीय इतिहासाची माहिती अमर चित्र कथा वाचून थोडी फार आणि जी काय इथल्या शाळेत शिकला ती .म्हणजे दांडी यात्रा, अहिंसा आणि गांधी. तर १८५७-१९४७ या काळाचा आणि थोडा त्याच्या आधीचा इतिहास सांगणार्‍या पुस्तकांची नावे सुचवा.

घ्या हात धुवून!

लेखक आपला अभिजित यांनी बुधवार, 28/10/2009 17:20 या दिवशी प्रकाशित केले.
जगातल्या समस्त समस्यांची घाऊक चिंता असलेल्या अनेक पाश्‍चात्त्य संघटना आहेत. त्यांना कधी कशाचे उमाळे येतील, याचा नेम नसतो. त्यातून ऊठसूट प्रत्येक गोष्टीचं सेलिब्रेशन करायची सवयच लागली आहे जणू पाश्‍चात्त्यांना. चित्रविचित्र दिवसांचा जन्म होतो, तो त्यातूनच. नुकताच "जागतिक हात धुणे दिवस' साजरा झाला. त्यामागचा उद्देश भव्यदिव्य असला, तरी एक वेगळाच विचार त्यातून मनात डोकावला. या दिवसाचा खरंच उपयोग करून काही समाजोपयोगी, हितकारक करता आलं तर? पाहूया, एक झलक. 1. सरकारी कर्मचारी ः यांच्यासाठी कुठलाही दिवस "हात धुणे दिवस'च असतो.

डॅनबरी

लेखक प्रभो यांनी बुधवार, 28/10/2009 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
चंगळवादी आणी आद्य विठोबा रहिवासी असलेल्या अमेरिकेच्या संयुक्त संस्थानी कनेक्टीकट भागातील डॅनबरी क्षेत्री अथवा जवळपास कोणी मिपाकर वारकरी राहतात का?? असल्यास कळवा. अवांतरः येत्या ९ तारखेपासून ३-४ महिन्यासाठी माझी बदली तिकडे होतेय......

ताईचा सल्ला

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी बुधवार, 28/10/2009 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
प्रश्न :- ताई, मी मिसळपाव वरील एक स्त्री सभासद आहे, माझे खुप मित्र आणी खुप फॅन्स पण आहेत. मी सगळ्या धाग्यांवर भरभरुन प्रतिसाद देते पण सभासद मला 'उगाच पुढे पुढे करणारी, अतिशहाणी आणी बालिश' म्हणतात. आजकाल तर काही सभासद मला तुझे खाते 'फेक' आहे म्हणतात. काहि स्त्री सभासद तर मला मुद्दामुन "काय रे कसा आहेस?" असे विचारतात. पुरुष सभासद "मला फोन कर म्हणजे तुझ्या आवाजावरुन तु मुलगी आहेस का नाही ते कळेल" म्हणतात. सगळेच माझ्या ज्ञानावर व रुपावर जळतात. ताई मी काय करु ?

जखमी चित्रबलाकाचा अलारिपु

लेखक शरदिनी यांनी बुधवार, 28/10/2009 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
ऋष्यमूक पर्वतावर कोळीगीत गाणार्‍या स्पायडरमॅनला, नखुरडे ठसठसत तिल्लाना नाचणार्‍या रणराणीला, वास येतोय सटरफटर जळक्या कबाबांचा, ड्रोन ड्रोन ड्रोन प्रतिभेचे अंतर्गत सोळा आणे फटाकडे व्यक्ती / सामाजिक दारूण समस्यासाकडे लोचट ओशट कडबाकुट्टी लाल्लाल खरपूस वीटभट्टी वादळवारे प्रतीक कॅत्रिना घोरी महमद कैफ वासना दुय्यम संयम अळम् टळम् सत्य अहिंसा गर्रम गर्रम लाटावाटा कोमल भाटा महापुरातील लव्हाळत्राता लायटर फ़ायटर रुधिरवंचिता मेजर्मायनर धेनुवल्लभा विहिरीतेली बॆरलबॆरल वजिरीस्तानी क्वीन घायल ड्रोन ड्रोन ड्रोन