Skip to main content

कायस्थी चिंबोरीचे कालवण

लेखक स्वाती२ यांनी सोमवार, 16/11/2009 01:20 या दिवशी प्रकाशित केले.
कायस्थी चिंबोरीचे कालवण काल इंटर्नॅशनल मार्केटमधे ब्ल्यू क्रॅब मिळाले. ते घेऊन इतर खरेदी बाजूला ठेवून तसेच घाईघाईने घरी आलो. तरी तासाभराचा प्रवास होताच. पण काही घोळ न होता चिंबोर्‍या सुखरूप घरी पोचल्या.

हिंदी ही राष्ट्र भाषा ? – एक गैरसमज

लेखक संतोष सतवे यांनी सोमवार, 16/11/2009 00:19 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदी ही राष्ट्रभाषा? – एक गैरसमज आणि त्याचे मराठीवर अनिष्ट परिणाम ( http://amrutmanthan.wordpress.com/2009/07/21/15/ ) भारतातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील लोकांना जी वस्तुस्थिती आहे तिची स्पष्ट माहिती असावी, म्हणून मुद्दामच मी हा लेख लिहीत आहे. भारताच्या घटनेमध्ये कुठल्याही एका भाषेचा उल्लेख ’राष्ट्रभाषा’ असा केलेला नाही.

घेतली उडी अशी वेडी (वीर तात्याराव सावरकरांचा पोवाडा)

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 15/11/2009 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
स्वातंत्र्यसिंह गर्जला गोरा हाकला फार माजला रेटा त्याच्या देशाला ब्रिटीशाला......हो जीरह जी जी जी...जीजीजी ........ जनसागर ये उधाणाला वीरामागे जमला विनायकी रमला एकाच सावरकरी हाकेला......हो जीरह जी जी जी...जीजीजी ........ शंका कोणीना काढी सोडली घोडी घेई आघाडी दावली सावरकरी धडाडी......हो जीरह जी जी जी...जीजीजी ........ सायबाची करी नासाडी घातल्या धाडी आवळली नाडी वीर तो इंग्रजास नाडी......हो जीरह जी जी जी...जीजीजी ........ तोडगा साहेब काढी बनवले बंदी शृंखला बाधी बोटीने अंदमाना धाडी......हो जीरह जी जी जी...जीजीजी ........ कचकडी भासली कडी संकल्प सोडी योजना वेडी कुपाचे तळही तो फोडी......हो जीरह जी जी
काव्यरस

परत एकदा 'स्वच्छतेच्या बैलाला..'

लेखक नीधप यांनी रविवार, 15/11/2009 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या वर्षी मायबोली दिवाळी अंकात लिहिलेल्या माझ्या स्वच्छतेच्या बैलाला.. http://vishesh.maayboli.com/node/26 या लेखाच्या संदर्भाने मायबोलीवरच http://www.maayboli.com/node/4327 या ठिकाणी चर्चा सुरू झाली. काय करता येऊ शकेल, कसे करता येऊ शकेल इत्यादी बाबींवर उहापोह सुरू झाला. आणि मग थांबला. सुरूवातीला धडाक्याने सुरू केलेली ही चर्चा आणि बरंच काही करू असं स्वतःलाच दिलेलं वचन बाजूला पडलं तरी विसरलं मात्र नव्हतं. अनुभवांची आणि चिडचिडीची भर पडतच होती.

विनंति

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 15/11/2009 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र टाइम्स या दर्जेदार ई वृत्त पत्राचा आदर्श डोळ्या समोस ठेवुन त्यांच्या म.टा.फोटो गॅलरी सारखि मि.पा. फोटोगॅलरी सुरु करण्यांचि गळ तात्या साहेबांना घालावि काय?

आय.आय.एम. अहमदाबादमधून

लेखक क्लिंटन यांनी रविवार, 15/11/2009 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, गेल्या अनेक दिवसांपासून मला आय.आय.एम. अहमदाबादमधील विद्यार्थीजीवनावर मिपावर लेख लिहायचा होता. तो आता लिहिता येत आहे याचे समाधान आहे. लेखाच्या निमित्ताने इतरही थोडी माहिती लिहित आहे. भारतीय प्रबंध संस्थान (आय.आय.एम) सर्वप्रथम कलकत्याला १९५९ मध्ये सुरू झाले. त्यासाठी कलकत्ता विद्यापीठ आणि भारतीय संख्याशास्त्र संस्था (Indian Statistical Institute) मधील ज्येष्ठ प्राध्यापकांना अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातील बिझनेस स्कूलमध्ये ’बी-स्कूल’ संबंधी प्रशिक्षणासाठी पाठवले होते आणि त्यांनी परत आल्यावर आय.आय.एम कलकत्त्यात प्राध्यापक म्हणून अध्यापन करायला सुरवात केली.

चित्रपट परीक्षणः २०१२ (एक मायावी अंतिम सत्यानुभव)

लेखक निमिष सोनार यांनी रविवार, 15/11/2009 08:40 या दिवशी प्रकाशित केले.
हा चित्रपट म्हणजे एक अविस्मरणीय असा अनुभव आहे. याची देही याची डोळा आपण जगाचा अंत यात बघतो. चुकवू नये असाच हा चित्रपट आहे. मी पाच पैकी पाच मार्क या चित्रपटाला देतो.

घरच्या घरी KFC.

लेखक गणपा यांनी शनिवार, 14/11/2009 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या आठवड्यात एका मित्राने विचारल होत की KFC च चिकन कस बनवतात ते महिती आहे का रे ? हा प्रकार कधी घरी करुन पाहिला नव्हता पुर्वी. म्हटलं ट्राय करुन पहायला काय हरकत आहे. गुगलुन कृती शोधली. पहिलाच प्रयत्न त्यामुळे अगदी KFC सारखे निट नाही जमले, पण जे काही झालय ते शेअर करतोय.. साहित्य: चिकनचे मोठ्या आकारचे तुकडे.

बुधिया, पा आणि आपण

लेखक ऋषिकेश यांनी शनिवार, 14/11/2009 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
काहि वर्षांपूर्वी आपण सगळ्यांनीच बुधिया या (तेव्हा) चार वर्षाच्या मुलाच्या धावण्यासंबंधीत बातम्यांनी भरलेले रकाने वाचले. ज्या वयात रेकॉर्ड म्हणजेच काय हे कळत नाहि त्यावयात त्याला एका रेकॉर्डसाठी त्याला ६५ कि.मी धाववलं गेलं होतं. त्यावेळी त्या मुलाला प्रसिद्धी बरोबरच सहानूभूती मिळाली होती. त्याच्या प्रशिक्षकांना बहुदा दंड/शिक्षा झाल्याचेही आठवते. आज बालदिनाच्या निमित्ताने त्या बुधियाची पुन्हा आठवण झाली. अशी अचानक आठवण होण्यामागे म्हटलं तर काहिच कारण नाहि आणि म्हटलं तर बरीच आहेत. याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या भोवती मला सतत दिसणारे बुधिया. एक नाहि तर अनेक बुधिया.