मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चित्रपट परीक्षणः २०१२ (एक मायावी अंतिम सत्यानुभव)

निमिष सोनार · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
हा चित्रपट म्हणजे एक अविस्मरणीय असा अनुभव आहे. याची देही याची डोळा आपण जगाचा अंत यात बघतो. चुकवू नये असाच हा चित्रपट आहे. मी पाच पैकी पाच मार्क या चित्रपटाला देतो. खरे तर मला चार मार्कच द्यायचे होते पण एक जास्त मार्क कशासाठी ते या परीक्षणाच्या शेवटी सांगतो... या चित्रपटाच्या कथेविषयी प्रथम थोडक्यात सांगतो- (खरे सांगायचे झाले तर, अशा प्रकारच्या "आपत्तीपटांमध्ये" कथा तेवढी महत्त्वाची नसतेच.) " सन २००९ मध्ये सतनाम नावाचा एक भारतीय अंड्रियन नावाच्या आपल्या एका अमेरिकन मित्रास एक गोष्ट लक्षात आणून देतो ती अशी की खाणीत खोलवर त्याला पृथ्वीच्या पृष्ठभागावरचे व आतले तापमान दिवसेंदिवस असाधारणपणे आणि वेगाने वाढत असल्याचे दिसते. २०१० मध्ये अमेरीकेत यावर महत्त्वाच्या राष्टाध्यक्षांची एक गुप्त बैठक होते व सर्वांना समजते की जगाचा अंत माया सभ्यता च्या कॅलेंडर नुसार खरोखरच जवळ आला आहे. पैसे आणि सत्ता असलेल्या काही लोकांना वाचवण्याचा ठराव होतो आणि चीन मध्ये एक "मोठे जहाज" बनवायला सुरुवात होते. २०१२ मध्ये अमेरिकेत जॅकसन नावाच्या एका लेखकाला हे "अंतिम सत्य" योगायोगाने समजतं आणि तो त्याच्या पूर्वीच्या पत्नी मुलांना आणि त्या पत्नीच्या सध्याच्या मित्राला वाचवण्याचे आटोकाट प्रयत्न करत चीनपर्यंत कसातरी पोहोचतो.. त्यानंतर काय होतं? कोण कोण वाचतं? हा सगळा प्रकार पडद्यावरच अनुभवण्यासाठी आहे." चित्रपटाची बलस्थाने: हा चित्रपट आपण फक्त "पाहात" नाही तर "अनुभवतो" अशाच प्रकारच्या काही पूर्वीच्या चित्रपटांपेक्षा (उदा. इंडीपेंडंस डे) यातले वेगळेपण म्हणजे- यात अमेरिकेने एकाधिकारशाही दाखवलेली नाही. आपणच सर्वज्ञानी आहेत असा आविर्भाव आणलेला नाही. यातील तांत्रीक करामती अतिशय अप्रतीम असून त्याला तोड नाही. जे घडतं ते अगदी खरंखुरं वाटतं. चित्रपटगृहात एकट्याने (म्हणजे, मित्रपरिवार्/कुटूंब ओळखीचे कुणी नसतांना) हा चित्रपट बघणे म्हणजे एक धाडस आणि धैर्य लागतं कारण एकामागून एक आपत्ती बघतांना सुन्न व्हायला होते. चित्रपट्गृहात सिनेमाभर चार ते पाच वेळा शिट्ट्या आणि टाळ्या वाजतात. हॉलिवूडच्या चित्रपटाबाबत असे प्रथमच मी पाहिले. अर्थात त्या कशासाठी वाजतात हे प्रत्यक्ष जाउन अनुभवा. सगळ्यांनी यात छान काम केले आहे. अशा चित्रपटांत अर्थातच पार्श्वसंगीत महत्त्वाचे असते आणि ते यात उत्तम आहे. त्यामुळे सगळं अतिशय खरं वाटतं. चित्रपटातील उठावदार व लक्षात राहाण्याजोगे प्रसंगः खालील प्रसंगातील स्पेशल इफेक्ट मुळे ते लाजवाब वाटतात- अभूतपूर्व भूकंपामध्ये कॅलीफोर्निया आणि सॅन फ्रान्सिस्को ची वाताहत लॉस एंजिल्स समुद्रात गडप होते. वॅटिकन सिटी, चर्च, भारत, तिबेट व एक मोठे क्रुझ यांची वाताह्त रिओ दि जानिरो चा येशू चा पुतळा पडतो. हिमालाय वितळतो. पर्वताच्या वरून दिसणारे ज्वालामुखी च्या उद्रेकाचे भयानक चित्रण लिंकन मेमोरियल टॉवर कोसळते. सगळात वरचे दृश्य म्हणजे - शेवटचे " मोठे जहाज" आणि त्यावरचे प्रसंग. काही मोजक्या त्रुटी- भारत आणि काही इतर देशातल्या इमारती व ठिकाणे यांचे काय व कसे होते हे यात दाखवले नाही. त्याचे कारण मला असे वाटते की- मंदिर, मस्जीद, कुतुबमिनार, ताज महल वगैरे नष्ट होतात असे बघणे कदाचित आपल्याला आवडले नसते. आंदोलनं झाली असती. हा अडीच तासांचा चित्रपट आहे. अर्थात भारतात आपल्याला त्याची सवय आहे. पण जगभरच्या टीकाकारांकडून मात्र यावर टिका होत आहे. कथेवरही टिका होते आहे. पण, मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे कथेला जास्त महत्त्व दिले नाही तरी काही हरकत नाही. काही प्रसंगात जास्तच "चित्रपट- स्वातंत्र्य" घेतलेले दिसते. (सिनेमॅटीक लिबर्टी) सतनामच्या भूमीकेत भारतीय कलाकारच घेतला असता तर छान झाले असते. पण जिमी खरोखर सतनाम च्या भूमिकेत शोभून दिसतो. पाच मार्कांचे गुपीत- चार ऐवजी पाच मार्क मी दिले ते यासाठी- चित्रपटच मुळात सुरु होतो तो भारतापासून. केवळ एका भारतीयामुळे सगळे वाचतात असे यात दाखवले आहे. भारतीय लोक हे शांतता प्रेमी, सहिष्णु, त्यागी, कुटुंबव्यवस्था टिकवणारे असतात हे यात जाणवत राहाते. हा एकप्रकारे आपला गौरवच आहे असे मला वाटते. तेव्हा, कृपया फक्त चित्रपटगृहातच जा आणि हा चित्रपट बघा, अनुभवा आणि जगा..... --- निमिष सोनार, पुणे

वाचने 2527 वाचनखूण प्रतिक्रिया 8

टारझन Sun, 11/15/2009 - 09:41
हॅहॅहॅ ... वाटंच पहात होतो .. कोण परिक्षण टाकतंय म्हणून !!!
चीन मध्ये एक "मोठे जहाज" बनवायला सुरुवात होते.
=)) एक जहाज आहे काय ? बहुदा मी २०१३ पाहिला असावा :) त्यात ३ मेगाशिप्स होत्या !!! आणि हो .. हॅ मुव्हीतले स्पेशल इफेक्ट्स टोट्टल हॉलिवुडी असले तरी .. कथा मात्र बॉलीवुडी आहे ;) अँड्रियन त्याचं प्रतिक !! आख्ख्या मुव्हीत फक्त अंडी घालत असतो ... शेवटी मात्र एक स्पिच देतो ... बास आणखी क्काही करत नाही !!! आणि उगा लै म्हत्वाचं काम करण्याचा आव आणतो :) चित्रपटात आवडलेले सिन्स : १. सगळे प्रलयकारी .. विध्वंसक .. विनाशक सिन्स एक से एक आहेत. २. विमानातून जेंव्हा जॅक्सन आणि बाकी लोक कार ने लँड करतात तो सिन ३. त्याच विमानाने जेंव्हा ते टेक ऑफ करतात तेंव्हा दोन बिल्डींग मधून अगदी वाचतात तो सिन. चित्रपटातले आवडते ड्वायलॉग्स : १. विमानातून जेंव्हा कारने लँड करायचं असतं ,तेंव्हा हिरो ला नवी कोरी बेंटली चावी ने स्टार्ट होत नाही तेंव्हा मोटू रशियन (का कोण तो) त्याच्या जाड्या भसाड्या आवाजात "इंजीन ..स्टार्ट" म्हणतो !! २. मोटू रशियनची गर्लफ्रेंड(व्हाट टू नेम यार .. रहायची ह्याच्याबरोबर .. न प्रेम त्याच्या डायवर बरोबर) जेंव्हा त्याला मिडल फिंगर दाखवते. ३. हा डॉयलॉग आपल्याला सगळ्यात जास्त आवडला. पप्पा जॅक्सन आपल्या पोरांना घेऊन एका अभयारण्यात जातो.. जाताना पोरांना तिथल्या आठवणी सांगताना म्हणतो.. जेंव्हा मी आणि तुमची मम्मी इथे आलेलो तेंव्हा इथे एक तळं असायचं ... तेंव्हा प्रसंगावधान राखुन त्याचं अतिचोंबडं पोरगं त्याला सुनवतं .."क् मॉन ,,, जॅक्सन .. वी डोन्ट वान्टू नो व्हेयर यू अ‍ॅन मॉन हॅड सेक्स " ... =)) प्रचंड हसलो होतो.... इन शॉर्ट ... मुव्ही पहायचा तर ... बिग स्क्रिन वर !!! अल्टिमेट मुव्ही !! आवडत्या स्त्री बरोबर पहाण्यास अनुकुल !! :) स्क्रिनवरचे रोमांचकारी अनुभव हृदयाला भिडतात !! -- (बुगाटी प्रेमी) टारझन बेंटली

वेताळ Sun, 11/15/2009 - 10:44
माया सभ्यतेनुसार आपण आपली पृथ्वी कशी नष्ट होणार हे आपल्या हयातीत बघणार आहोत.त्यामुळे मला तर २१ डिंसेंबर २०१२ चीच ऊत्सुकता लागुन राहिली आहे. पिक्चर मात्र नक्की बघु, तेही थेटरात जावुनच बघु. वेताळ

In reply to by वेताळ

विजुभाऊ Mon, 11/16/2009 - 12:10
भारत आणि काही इतर देशातल्या इमारती व ठिकाणे यांचे काय व कसे होते हे यात दाखवले नाही. खरे कारण आहे की अमेरीकन माणसाला अमेरीकेबाहेर जग आहे हेच ठाऊक नसते

फारएन्ड Sun, 11/15/2009 - 11:32
स्पेशल इफेक्ट्स जबरदस्त आहेत. एक आपत्तीपट म्हणून टायटॅनिक, जुरासिक पार्क वगैरेच्या लेव्हल चा (कथानक, नाट्य वगैरे मधे) नसला तरी नक्कीच बघण्यासारखा आहे. फक्त प्रत्येक वेळेस मोठा विध्वंस यांच्या पाच्-दहा फूट मागे चेस करत असतो ते जरा विनोदी वाटले.

In reply to by फारएन्ड

टारझन Sun, 11/15/2009 - 11:42
हॅहॅहॅ
फक्त प्रत्येक वेळेस मोठा विध्वंस यांच्या पाच्-दहा फूट मागे चेस करत असतो ते जरा विनोदी वाटले.
ह्याला बॉलिवूडी इफेक्ट म्हणतात. आणि जर तसं नसतं घडलं तर तुम्ही पहिल्या १० मिनीटात बाहेर आला असतात :) असो .. आपला विनोद विनोदी वाटला ;) - डेडएन्ड

तिमा Sun, 11/15/2009 - 18:56
खरंच असं झालं (माया संस्कृतीच्या आकडेमोडीनुसार) तर कित्ती कित्ती मज्जा येईल! मी नरकात पेढे वाटीन या पापी जगाला नष्ट केल्याबद्दल) हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

In reply to by तिमा

लवंगी Mon, 11/16/2009 - 07:21
थोडे स्वर्गातपण पाठवा स्पेशल डिलीव्हरीने आम्हा बाकिच्या मिपाकरांना ... :)

गणपा Mon, 11/16/2009 - 02:05
कालच पाहिला. स्पेशल इफेक्ट्स चांगले आहेत पण तद्दन गल्लाभरु चित्रपट वाटला. फारएन्ड म्हणाला तोच विचर मनात आला होता, साला प्रत्येक वेळी याची कार/बस/विमान मोठ्या विध्वंसाला हरवते. एक बदल जाणवला अमेरिकेचा आम्हीच सर्वज्ञ हा समज दुर झालेला जाणवतो, अमेरिके बाहेरही जग आहे आणि तिथे रहाणार्‍या लोकांनाही थोडी फार अक्कल,ज्ञान आहे हे हॉलिवुडकारांना जाणवायला लागल आहे ;). पुर्वी मला नेहमी प्रश्न पडायचा की सगळे विध्वंस/प्रलय, एलियन्स, गॉडझिअला/डयनॉसॉर्/किंगकॉंग बिचार्‍या अमेरिच्याच मागे का लगलेत बर. पण हा चित्रपट पाहुन हा समज दुर झाला ;)