Skip to main content

निरंजन

लेखक दमनक यांनी सोमवार, 07/12/2009 21:32 या दिवशी प्रकाशित केले.
शेवटी म्हटलं, प्रवासात शिकलेली गाणी चिरंतन प्रवाशांच्या ओठी देऊन जावीत. मग त्यांच्या किलबिलाटातून ती गाणी सगळीकडे पसरतील. सकाळी घरट्याबाहेर पडताना ही गाणी आठवत असतील आणि संध्याकाळी परत येताना अंगभर साठवत असतील... मग एखादे दिवशी याच गाण्यांनी उजवलेल्या एखाद्या स्वरभारल्या कुशीतून मी परत जन्म घेईन आणि ती गाणी परत... नव्याने शिकेन. नाहीतरी, माझं असं काय होतं जे मी घेऊन आलो ? माझं असं काय आहे जे मी घेऊन जाईन ? पण एक मात्र नक्की. जगण्याची गाणी निरंजनपणे गात राहीन.

अजीब दास्ता हैं ये......

लेखक भानस यांनी सोमवार, 07/12/2009 20:14 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाने जोर धरला होता. पहाटेच उठून माझ्या रूमची खिडकी सवयीने उघडली होती. मस्त ओले थंडगार वारे अन मध्येच पावसाचे तुषार आत झेपावत होते. जरासे कुंद वाटत होते पण मला आवडतो पाऊस. रह रहके समीर समोर दिसत होता. अरे हो, मी - दिशा. जिथे आनंद, चैतन्य भरभरून नांदत असेल तिथेच मी रमते. आयुष्याला ओझे समजून वाहणारे लोक पाहिले की फार त्रास होतो मला. मी त्यांना सरळ नजरेआड करते. ही अशी जमात आहे ना की त्यांना कोणीही कितीही समजावले तरीही ते करंटेच राहणार. तेव्हा छोड दो. हां आता अगदी जवळचे काही असे वागतात ना तेव्हा चांगली हजेरी घेते त्यांची. परवाचीच गोष्ट, रजत दोन दिवस डोक्याला हात लावून बसला होता.

पु लं ची गाजलेली वाक्य ...

लेखक संदीप शल्हाळकर यांनी सोमवार, 07/12/2009 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांचे आवडते पुलं, ज्यांना आपण सगळे कलेतलं आराध्य दैवत मानतो, त्यांची आठवण म्हणुन त्यांची काही विनोदी वाक्य संग्रहीत करण्यासाठी मला आपणा सगळ्यांची मदत पाहिजे. तेव्हा आता चालु करुया या नव्या उपक्रमाला.....

कल्पवृक्ष कन्येसाठी ....

लेखक पर्नल नेने मराठे यांनी सोमवार, 07/12/2009 14:20 या दिवशी प्रकाशित केले.
नोव्हेंबर डिसेंबर महिने जवळ आले की दत्तजयंतीचे वेध लागत, घरात बाबांचे गुरुचरित्राचे पारायण सुरु होत असे. घरात छान भक्तिमय वातावरण असे. तसेही ते वर्षाचे ३६५ दिवस असे कारण स्वामींचा जप करणे, जप लिहिणे, लघुरुद्र, सत्यनारायण, मेहुण, सवाष्ण काही ना काही घरात सुरुच असे. बाबा खुप भाविक होते. त्यांनी गुरुचरित्र सुध्दा हाताने लिहुन काढले होते. त्यांना गाण्याची सुद्धा आवड होती. ते उत्तम पेटी वाजवत असत. त्यामुळे अधेमधे घरी गाण्याचे कार्यक्रम होत असत. लहानपणापासुन संगीत कानावरुन गेल्यामुळे का कोण जाणे पण मी गाणे शिकले नसले तरी कोण बरोबर की चुकीचे गातेय हे नक्किच कळते.

जगलो जरी मी खुप.

लेखक टुकुल यांनी सोमवार, 07/12/2009 09:46 या दिवशी प्रकाशित केले.
हि कविता माझी नसुन, माझ्या मित्राच्या काकांच्या निधनानंतर, मित्राने त्यांच्या जिवनावर केलेली कविता. जगलो जरी मी खुप परी ते जगणे नव्हते, विद्वतेचा किताब घेवुन हात कधीच थांबले होते पडलो न कुणाच्या कामी तो शब्दांचा बाजार होता, त्या बाजारातच माझ्या व्यक्तिमत्वाचा र्‍हास होता. परी न दाखवली मी कुणा नाराजी असुनी या अंतरी, माझ्या पिलांनीच माझी फसगत केली सारी, परी जीव गुंतला त्यात जरी झाले मजला परके, ह्रुदयातील सांगु मी दु:ख कुणा करावयास मन माझे हलके, जातानाही नाही सुटतील हे बंध रेशमाचे, या मायेच्या कपड्याला, शिवणारे हात विणकर्‍याचे.. जगलो जरी मी खुप.................
काव्यरस

एका बाजेची गोष्ट

लेखक मराठे यांनी सोमवार, 07/12/2009 04:47 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी आजीकडे जायचो तेव्हाचा तिने सांगितलेला एक किस्सा. तिच्याकडे रात्री गाद्या घातल्यानंतर आजी, मामा, आई, मावशी गप्पा मारत बसायचे. खरं तर त्या गप्पा ऐकता ऐकता कधी झोप लागायची ते कळायचंही नाही. पण हा किस्सा तिने सांगितला आणि त्या रात्री माझी झोपच उडाली. ती मी ऐकलेली पहिली "भयकथा" पण ती "कथा" नव्हती.. तो तिचा अनुभव होता. आजीचं सासर उरणचं. पहिल्या बाळंतपणानंतर ती घरी आलेली होती. तिला झोपायला घरातली एक बाज दिली होती. ती बाज खूप दिवस अडगळीच्या खोलीतच पडलेली होती. रात्री कधीतरी तिला बाळाच्या रडण्याचा आवाज आला. बाळाला बघायला म्हणून ती उठली. पाहते तर बाळाच्या जवळ एक जख्ख म्हातारी बाई बसलेली.

मी आणि मनू- सॉल्लिड टीम!

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 07/12/2009 01:19 या दिवशी प्रकाशित केले.
मनस्वीला सांभाळायची आता पाच वर्षं सवय झालेय. लहानपणी रात्री दीड-दोनला आल्यानंतर ती झोपेपर्यंत पाळणा हलवत बसण्याचं कंटाळवाणं कामही न कंटाळता केलं. त्यामुळं तिच्यासोबत एकटं असण्यात भीती किंवा टेन्शन वाटण्याजोगी परिस्थिती नव्हती. तरीही, एक दिवसापेक्षा जास्त काळासाठी ही वेळ कधी आली नव्हती. ती एक वर्षाची असताना हर्षदा बारामतीला कार्यक्रमाला गेली होती, तेव्हा एक दिवस पूर्णपणे मी तिला सांभाळलं होतं. अन्यथा आमची जबाबदारी काही तासांपुरतीच. या वेळी गोव्याला जायचं होतं आणि हर्षदाला रजा नव्हती. म्हणून मी मनस्वीला घेऊन जायचं ठरवलं. आई-बाबाही रत्नागिरीहून सोबत येणार होते.

[मूल ते मा़झेच होते]

लेखक अमृतांजन यांनी रविवार, 06/12/2009 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
मुळ कवी सागरलहरी ह्यांच्या ह्या अप्रतिम काव्याचे हे एक रुप चमचे ते तुझेच होते, काटेच हाती घेऊनिया.. स्वस्त नव्हतीच थाळी, म्हणे आमरस अनलिमिटेड घ्या तव मुलींशी घसट माझी, निमीत्त्य ते खाणावळी वातड सहा पोळ्या तोडतो, तिच्याकडे पाहून त्या उगीच नाही मी नोकरी, केली ती परगावी, आणिक बेचव डाळ-उसळींची, पर्वा मी केली का? तुझला आक्षेप नसे, तुच रचिला खेळ सारा, बराय हा जावईतरी, येथेच ह्याला जेवू द्या... दिन सरता डेप्युटेशनचे, दैव सारे पालटले, सुन्न मी तुझ्याच इतका, परदेसीच मला राहू द्या...
काव्यरस

ते झाड़ तोडले कोणी ?

लेखक सागरलहरी यांनी रविवार, 06/12/2009 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
ते झाड़ तोडले कोणी ? पक्ष्यांची घरटी होती ... बहराची पालव होती .. .... ते झाड़ तोडले कोणी ? संध्याकाळी मावळतीचा निरोप घेउन आम्ही यावे ... इवल्या इवल्या पिल्लांना हे मायेचे दाणे द्यावे .. करून विसावा पुन्हा पिलाना तुझिया खान्द्यावरती द्यावे... इवले होते स्वप्ना आमुचे तोडून विस्कटले कोणी? .... ते झाड़ तोडले कोणी ? सळ सळ ऐकत तुझीच आम्ही प्रेम गूंजने करीत होतो .. मावळतीच्या पटलावरती स्वप्न उद्याचे रेखीत होतो .. प्रीत फुलांच्या वचना साठी तुलाच साक्षी ठेवीत होतो .. संकेत भेटीचा तुझ्या तळीचा असा मोडला कोणी ? ....