ते झाड़ तोडले कोणी ?
ते झाड़ तोडले कोणी ?
पक्ष्यांची घरटी होती ... बहराची पालव होती ..
.... ते झाड़ तोडले कोणी ?
संध्याकाळी मावळतीचा निरोप घेउन आम्ही यावे ...
इवल्या इवल्या पिल्लांना हे मायेचे दाणे द्यावे ..
करून विसावा पुन्हा पिलाना तुझिया खान्द्यावरती द्यावे...
इवले होते स्वप्ना आमुचे तोडून विस्कटले कोणी?
.... ते झाड़ तोडले कोणी ?
सळ सळ ऐकत तुझीच आम्ही प्रेम गूंजने करीत होतो ..
मावळतीच्या पटलावरती स्वप्न उद्याचे रेखीत होतो ..
प्रीत फुलांच्या वचना साठी तुलाच साक्षी ठेवीत होतो ..
संकेत भेटीचा तुझ्या तळीचा असा मोडला कोणी ?
.... ते झाड़ तोडले कोणी ?
शतकापुर्वी तुझे बालपण आम्ही शिम्पिले होते ...
वर्षा काळी भिजवून तुजला आम्ही पोशिले होते ..
मेघ सैन्य हे भेटाया तुज वरुणाचे आले होते ..
तोडून सारे असे कलेवर तुला बनविले कोणी ? ....
.... ते झाड़ तोडले कोणी ?
-- सागर लहरी ३१/१०/२००९ -
लेखनविषय:
याद्या
1383
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
ह्म्म
ह्रिदयनाथ
ते झाड़ तोडले कोणी .. या कवितेची प्रेरणा
In reply to ह्रिदयनाथ by मृत्युन्जय