एक उनाड दिवस .....
शनिवार : दिनांक १९/१२/२००९
सौभाग्यवती गुरूवारीच सोलापूरी, माहेरी गेलेल्या होत्या. त्यामुळे यावेळच्या विकांताचे आमचे प्लानिंग सॉलीड ठरवले होते. म्हणजे शनिवारी पहाटे १० वाजता उठायचे. मग चहा करुन घ्यायचा. त्याप्रमाणे उठलो. चहाचा (करायचा) कंटाळा आल्याने नुसतेच थंडगार दुध घशाखाली उतरवले.
नाष्ट्याला काय बनवावे बरे? :/
पोहे, उप्पीटाचा कंटाळा आलाय. मॅगी नावाच्या शेवया मला आवडत नाहीत. घरातली पास्त्याची पाकीटे संपलेली. आधी विचार आला की पनीर पकोडे वगैरे काहीतरी मस्त चमचमीत करुन खावे. पण फ्रीज उचकला तेव्हा लक्षात आले की फ्रीज मध्ये पनीरच काय, साध्या हिरव्या मिरच्याही नाहीत. :T .
मिसळपाव