Skip to main content

विश्वातील पहिला सजीव कोण असावा आणि निर्जीव वस्तू कोणती असावी?

लेखक निमिष सोनार यांनी गुरुवार, 31/12/2009 18:48 या दिवशी प्रकाशित केले.
विज्ञान म्हणतं त्याप्रमाणे सुर्याजवळून एक मोठा चुंबकीय शक्ती असलेला ग्रह (किंवा जे असेल ते) वेगाने गेल्यावर सुर्याचे तुकडे वगैरे होवून सगळे तुकडे सुर्याभोवती फिरायला लागलेत व पृथ्वी ही त्यापैकीच एक. हे सत्य मानले तर एक प्रश्न मनाला भेडसावतो की, मग त्या पृथ्वीवर सगळ्यात पहिला सजीव प्राणी कोण आला? कसा व कुठून आला असावा? तो जेथून आला ते तरी कोठून आले असावे? तो जर कोणीतरी निर्माण केला असे म्हणायचे असेल तर तो निर्माता कुठून आला? कृपया या चर्चेचा ओघ 'देव आहे किंवा नाही?' याकडे न वाहू देता मला या चर्चेत विविध वैज्ञानिक शक्यतांचा विचार करून बघायचा आहे. मुळात सुर्य कुठून आला असावा?

सासू-सून-नणंद-जावा-भावजयी यांच्यातील भांडणांमूळे भारताचे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात!

लेखक निमिष सोनार यांनी गुरुवार, 31/12/2009 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
हे माझे परखड व स्पष्ट मत आहे. भारतीय पुरूष हा त्यामुळेच सुखाने जगू शकत नाही. त्याच्या डोक्यावर असते या भांडणांची टांगती तलवार. सासू हुंड्यासाठी किंवा इतर कारणासाठी सुनेला जाळते! हा भारतीय संस्कृतीचा सगळ्यात मोठा कच्चा दुवा आहे. कायद्याच्या कचाट्यातून आजही अशा प्रवृत्ती सुटतात. आजही सुशिक्षीत कुटुंबात असे घडते. अशी संस्कृती काय कामाची की ज्यात एकत्र कुटुंब पद्धतीत लहानांचे कितीही बरोबर असले तरीही त्यांना चुकीचे ठरवले जाते. मोठे म्हणतील तेच करावे लागते. ही एक शोकांतीका आहे की अशा भांडणांचा फायदा घेवून आज शेकडोंच्या संख्येने सासू-सून मालिका तयार होताहेत आणि त्या पाहिल्या जात आहेत.

भारत: का होतोय सगळ्यात जास्त खुन्यांचा/खुनांचा व अपघातांचा देश!?

लेखक निमिष सोनार यांनी गुरुवार, 31/12/2009 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतीच जवळपास सर्वच वर्तमानपत्रांमध्ये एका सर्वेक्षणासंदर्भात अशी बातमी होती की, भारत हा सर्वाधिक खून होणारा देश झाला आहे. यात आपण अमेरिकेलाही मागे टाकले आहे. तसेच अपघातांच्या बाबतीतही आपण पुढेच आहोत. अशी चुकीच्या क्षेत्रात (आणि दिशेने) होत चाललेली आपली प्रगती पाहून मन विषण्ण होते. ही वाढती गुन्हेगारी कशामुळे?

सासू ही 'आई' का होवू शकत नाही?

लेखक निमिष सोनार यांनी गुरुवार, 31/12/2009 18:36 या दिवशी प्रकाशित केले.
एक टक्का अपवाद वगळता ९९ टक्के सासू या कधीच सूनेची आई होवू शकत नाही. स्वतःच्या मुलीशी जशी वागते तशी सुनेशी का वागू शकत नाही? जी सासू स्वतःच्या सुनेशी आईसारखी वागत नाही, ती मात्र स्वतःच्या मुलीच्या सासू बाबत तीची सासू आईसारखी असावी अशी अपेक्षा का बाळगते? जेव्हा सून म्हणून एक कुणाची तरी 'मुलगी' नव्या घरात येते, तेव्हा घरातील सासूचेच मुख्य कर्तव्य असते तीला आपलेसे करणे. जर प्रत्येक गोष्टीत ती सून आणि मुलगी असा दुजाभाव करत असेल तर मग तीने तरी सुनेकडून मुली सारखी अपेक्षा का करावी? हा वैश्विक (भारतीय) प्रश्न कसा सुटेल? सुनेत आणि मुलीत नेहेमी भेदभाव का केला जातो? कामाला सून आणि आरामाला मुलगी.

व्यसन...!

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 31/12/2009 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या ३१ डिसेंबरला गहिवरला होतास तू.... शेवटचा पेग संपवताना डोळा मारून म्हणाला होतास तू , हा पेग आता शेवटचाच बरं का...! मागच्या ३१ डिसेंबरला कुजबुजला होतास तू डोळ्यात तिच्या पाहून कानात माझ्या बोलला होतास तू , आता पुढच्या वर्षी दुसरी बरं का...! मागच्या ३१ डिसेंबरला संकल्प केला होतास तू आता मिपावर येणे बंद 'खव'त माझ्या टपकला होतास तू , दुसरं संस्थळ शोधणार बरं का...! ३१ डिसेंबर परत आलाय मधुशाला विसरलास तू वपु घेवून बसलाहेस ’ती’ ही बहुदा बदलली आहेस तू., मिपाचं व्यसन मात्र तसंच बरंका.
काव्यरस

देवा तुझ्या द्वारी आलो

लेखक अमोल केळकर यांनी गुरुवार, 31/12/2009 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळ - कंपनीतील गणपती मंदिर. वेळ : संध्याकाळचे ७. ०० वा. दिनांक २९ डिसेंबर २००९ साधारण ७०-८० जणांचा ग्रुप कंपनीतील सांस्कृतीक मंडळाने आयोजीत केलेल्या ' सिध्दिविनायक पदयात्रेला' जाण्यासाठी जमला होता. यापुर्वी चार वेळा असा उपक्रम मंडळाने यशस्वी पार पाडला होता. मी पहिल्यांदाच अशा प्रकारच्या पदयात्रेत जात असल्याने एक उत्सुकता निर्माण झाली होती. कंपनीच्या आवारातील गणपतीच्या मंदिरात आरती करुन दिंडीला सुरवात झाली. ' गणपती बाप्पा मोरया ! मंगलमुर्ती मोरया ! उंदीर मामा की जय !!!! ' चा जयघोष सुरु झाला . आणि सुरु झाली रात्रीची भटकंती.

गोरी गोरी पान (विडंबन)

लेखक JAGOMOHANPYARE यांनी गुरुवार, 31/12/2009 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना: Behind every successful man there is a woman. Behind every unsuccessful man there are her parents. दुष्ट सासरा नावाचा दुष्टग्रह ज्यांच्या पत्रिकेत लग्नस्थळी ठाण मांडून बसला आहे, अशा तमाम जावयांच्या दु:खाला ही कविता नक्राश्रूपूर्ण नयनांनी समर्पित........ गोरी गोरी पान फुलासारखी छान सासर्‍या तुला एक तिरडी आण. सासर्‍याला उचलायला दारुड्यांची टोळी कशीबशी रचलेली लाकडांची मोळी मसणात बैस आता मांडुनिया ठाण सासर्‍या तुला एक तिरडी आण.. सासर्‍याच्या ताटीवर गुलाल पसरला घाई आणि गडबडीत कोळसा विसरला लायटरने पेटवू रे आता तुझा कान सासर्‍या तुला एक तिरडी आण.. सासर्‍याला जाळताना कवटी तडकली भु
काव्यरस

नशीब भाग २१ ते २५

लेखक विनायक रानडे यांनी गुरुवार, 31/12/2009 09:05 या दिवशी प्रकाशित केले.
"नशीब भाग १५ ते २०" शब्दाचे भाषांतर केल्यास विनोद निर्माण होणार परंतु कवी भावना समजल्यास कवितेचा आनंद घेता येईल, जगात सगळीकडे कवी भावना सारख्याच असतात बदलतात ते फक्त शब्द. भाषांतर काराने त्या भावना समजूनच त्या त्या भाषेत भाषांतर करणे आवश्यक असते.

"निरोप नवव्या वर्षाचा, स्वागत नव्या वर्षाचे..."

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 30/12/2009 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
चला उरलेल्या आयुष्याला, नव्याने सामोरे जाऊ परत! आणि करुया एका नव्या वर्षाचे, जोमाने स्वागत! सोबत असू द्यावी, शुभ विचारांची संगत! मग वाढेल, जीवन जगण्यातील रंगत! चला तर मग करूया, २०१० चे जोमाने स्वागत...!!! "निरोप नवव्या वर्षाचा, स्वागत नव्या वर्षाचे..."
काव्यरस

"हीएइ ह्योए ह्याई हीयेहे" चे रहस्य...!!!

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 30/12/2009 22:12 या दिवशी प्रकाशित केले.
टशन या हिंदी चित्रपटातले शिर्षक गीत ऐकले असेलच. (ताली बजावे, नचे गावे). इतर गाण्यांपेक्षा त्यात काहीतरी वेगळेपणा हवा म्हणून त्यांनी वरील "हीएइ ह्योए ह्याई हीयेहे" अशा विचित्र कोरस ने त्या गाण्याची सुरूवात केली आहे. आठवून बघा गाणे! असलाच काहितरी आवाज आहे तो! असे वाटते की चार पाच भूते कुणालातरी घाबरवायला आली आहेत आणि अचानक त्यांना थंडी वाजते. आणि त्यांचे दात दुखायला लागतात. तेव्हा मग त्या स्थितीत माणसांना घावरवतांना त्यांचा होणारा आवाज म्हणजे "हीएइह्योए ह्याईहीयेहे" दर शुक्रवारी अर्धा डझन चित्रपट रिलीज होतात. त्या प्रत्येकात किमान चार तरी गाणी असावी लागतात.