Skip to main content

पूर्वीगत पण आता काही लिहिवत नाही

लेखक अनिरुद्ध अभ्यंकर यांनी शुक्रवार, 01/01/2010 20:14 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वीगत पण आता काही लिहिवत नाही पूर्वीगत पण त्याचे काही वाटत नाही खरेच का पण आपण इतके बोथट झालो खरेच का आवाज आतवर पोचत नाही बंद घेतली करून माझी सगळी दारे मलासुद्धा मी हल्ली येथे भेटत नाही भेटलोच तर हल्ली आता वरवर हसतो नजरेमध्ये नजर घालुनी बोलत नाही काय मिळाले इतक्या ह्या तडजोडीनंतर हिशोब याचा अजून काही लागत नाही पुढे जायचे आहे येथे प्रत्येकाला कुणाचसाठी कोणी आता थांबत नाही असल्या जरि ह्या जखमा तरि ह्या तुझ्याच साऱ्या उगाच मी त्या अभिमानाने मिरवत नाही खूप शोधतो रोज तुला उघड्या डोळ्यांनी मिटून डोळे आत स्वतःच्या शोधत नाही

वरणफळे अर्थातच चकोल्या

लेखक श्रद्धा. यांनी शुक्रवार, 01/01/2010 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : तुरीची डाळ १ १/२ वाटी, भाजलेले खोबरे आणि लसुण (मिक्सरवरुन काढुन) १/२ वाटी, कांद्यालसणाचे तिखट, चिंच (आमटीला घालतो त्याप्रमाणे), गुळ, मीठ चवी प्रमाणे, वरुन घालायला कोथिंबीर आणि तुप. तेल आणि फोडणीचे साहित्य, कणिक - त्यात मीठ, हळद, हिंग,थोडेसे तिखट घालुन घट्ट मळुन घावी. कृती : प्रथम तुरीची डाळ शिजवुन घ्या. नंतर तेलामधे राई, जिरे, हिंग, हळद घालुन शिजलेली डाळ जरा घोटुन घेउन फोडणीत घालावी.

संकल्पः नव्या युगाचा

लेखक नरेंद्र गोळे यांनी शुक्रवार, 01/01/2010 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
. झाल्या चुकाही आणि उरल्या जरी उणीवा । त्यांचे स्मरून शल्य, निर्दोष कार्य व्हाया ॥ किती मार्ग उन्नतीचे, शिकवून वर्ष मिटले । त्यांनी सुपंथ क्रमू या, नवनीत या युगाचा ॥ २०१० हे नवे वर्ष आपणास, आयुरारोग्यपूर्ण शांती-समाधानाचे, भरभराटीचे आणि सुखसमृद्धीचे ठरो हीच हार्दिक शुभेच्छा! http://nvgole.blogspot.com/ या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे. .
काव्यरस

मंडली, म्या एक दादांसारकी कविता ल्यिहल्येली हाय. वाचा तर मंग आता.

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 01/01/2010 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
मंडली, म्या कालरातच्याला, नव्या वर्षाच्या मुहूर्तावर एक कविता ल्यिहल्येली हाय. हिरो आन हिरवीन आपले ग्रामीन भागातले हैत. आन त्ये शेतामदी मजा कराया आलेले हैत हा शिण हाये. जरा मजे मजेच्या अंगान त्ये खेळ खेळू र्‍ह्यायलेत. डोक्याला ताप नसल्यागत आनंद लुटायाचा आसल आन सेन्सॉर सारकं व्हत नसल तर हितं टाकू काय? नाय काय आस तस लिवलेलं नाय हो. साधं सरळ हाय. जरा जरा दादा कोंडके यांच्या लिखानासारखी हाय. नाय आधीच विचारून घ्येतो.
काव्यरस

उषा..

लेखक प्राजु यांनी शुक्रवार, 01/01/2010 09:38 या दिवशी प्रकाशित केले.
हळद माखूनी अंगावरती लोभसवाणी सोन शलाका पाण्यावरती उतरूनी अलगद तरंग उठवी हलका हलका घेता भरूनी ओंजळ अवघी साज रूपेरी पाण्यामधला डोकावूनी तो पहात राही चांद सावळ्या नभामधला सांज विसावे आकाशाच्या कुशीमध्ये लाजून थोडी रक्तिमगाली खळी पडूनी अवीट होई रात्र वेडी टिपूर तारे साक्षीला अन चंद्रकोरही गोजिरवाणी रात-दिनाच्या संयोगातून जन्मा येते उषा देखणी - प्राजु (सर्व मिपाकरांना नववर्षाच्या हार्दीक शुभेच्छा!)

खव्याची पोळी

लेखक मितालि यांनी शुक्रवार, 01/01/2010 02:12 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः १ वाटी खवा, १/२ वाटी बेसन पीठ, तुप, १ चंमचा खसखस, १ चंमचा तीळ, २ चंमचे सुखे खोबरे, ३/४ वाटी साखर, वेलचीपुड ३/४ वाटी कणीक, ३/४ वाटी मैदा, मीठ, १ मोठा चमचा बटर, तेल. कृती: कणीक , मैदा, मीठ मिसळुन घ्या. बटर गरम करुन या पीठात घाला. पाणी घालुन पीठ मळुन घ्या. पोळयांच्या पीठा पेक्षा किंचित घट्ट मळा. तेल लाऊन १०-१५ मिनिटे झाकुन ठेवा. तुपावर खवा गुलाबी रंगावर परतुन घ्या. बेसन पण तुपावर खमंग भजुन घ्या. हे दोन्ही वेगवेगळे भाजायचे आणि थंड करत ठेवायचे. खसखस , तीळ , सुखे खोबरे वेगवेगळे भाजुन एकत्र पुङ करुन घ्या.

फ्राइड कोकोनट श्रिंप

लेखक चित्रा यांनी शुक्रवार, 01/01/2010 01:10 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकरांना आणि त्यांच्या प्रियजनांना २०१० च्या आरंभी मनापासून शुभेच्छा. आज ही तळलेली कोलंबीची थोडी वेगळी पाककृती करून पाहिली. मध्यंतरी बाहेरगावी गेले असताना एका कुठच्याशा हॉटेलात थांबलो होतो, तिथल्या शेफने केलेली नारळ लावून ग्रिल केलेली कोलंबी चाखली होती, त्यामुळे तशी चव येते का ते करून पाहावे, अशी इच्छा होती. त्या पाककृतीत काय होते हे आठवत नाही. किंचित आंबट-गोड चव होती, आणि नारळ होता, त्यावरून ती बहुदा थाई पाककृतीवर आधारित असावी असा माझा समज तेव्हा झाला होता. त्यामुळे आज थोडा वेळ असल्याने, घरात कोलंबी असल्याने (आणि लेमनग्रासही!) ही पाककॄती करून पाहिली.

नवीन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा !!

लेखक टुकुल यांनी शुक्रवार, 01/01/2010 00:17 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकरांना नववर्षाच्या हार्दीक शुभेच्छा !! अवांतरः एक ओळीचा धागा आहे, पण कधी कधी चालायला काही हरकत नसावी ;-) आपलाच, टुकुल

चॉकलेट वाफल्स

लेखक स्वाती२ यांनी गुरुवार, 31/12/2009 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकरांना आणि त्यांच्या प्रियजनांना Happy New Year! खास बच्चे कंपनीसाठी नव्या वर्षाची सुरुवात यम्मी ब्रेकफास्टने! चॉकलेट वाफल्स साहित्य ३/४ कप ऑल परपज फ्लोर १/४ कप कोको पावडर (गोड नाही) १ टी स्पून बेकिंग पावडर चिमटीभर मीठ २ टे. स्पून साखर १ अंडे, बलक अणि पांढरे वेगळे करुन(अंड्याचे पांढरे कोरड्या भांड्यात) १/२ कप +१/३ कप दूध १/२ टी स्पून वॅनिला १ १/२ टे.स्पून बटर, वितळलेले(पण गरम नको) तेल किवा बटर वाफल मेकरला लावण्यासाठी कृती वाफल मेकर ला बटर किंवा तेल लावून तापत ठेवा.

माहिती हवी आहे

लेखक सदानंद ठाकूर यांनी गुरुवार, 31/12/2009 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
ड्रुपलची संपूर्ण माहिती मराठी भाषेत देणारे कोणते पुस्तक असल्यास कळवावे. याचा उपयोग माझ्या संकेतस्थळासाठी करावयाचा आहे. धन्यवाद