Skip to main content

लीला केली विश्वंभरे ....

लेखक सागरलहरी यांनी शनिवार, 09/01/2010 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
पाणियाचे पाणीपण | आकाशीचे व्यापकपण | अग्नीचे दाहकपण | कैसे राहे || कलिकेचे सुमन | सुमनाचे गंधाळण | भ्रमरा त्याचे आकर्षण | कैसे होये || देवा अंगी देव पण | भक्तां अंगी समर्पण | दुष्टा अंगी वाकुड पण | कैसे ठाये || लीला केली विश्वंभरे | पाही कौतुक साजरे | जेथे तेथे नाना परे | विठ्ठ्ल राहे || कंटक आणि पुष्पासरी | भिन्न गुणे राहे हरी | त्या त्या तैसे वंदन करी | प्रकृती धर्मे || सज्जनास पूजावे | दुष्टां निर्दाळावे | सुमनाचे गंध घ्यावे | त्या त्या परी || सागर लहरी ०८-०१-२०१०

दुर्ग आणि ढाकोबा... सह्यकड्याचे पहारेकरी

लेखक विमुक्त यांनी शनिवार, 09/01/2010 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
सह्यकड्याच्या टोकावर बसलो की कोकणातून वाहणाऱ्या वाऱ्याचा स्पर्श सुखावून जातो... नजर जाईल तीथपर्यंत कोकणात डोकावता येतं... एक विरळाच निवांतपणा जाणवतो... मागच्या वेळी ढाकोबाच्या माथ्यावरुन हे सगळं अनुभवलं होतं... ढाकोबाच्या परिसरात एकतरी मुक्कामी ट्रेक करायचा असं तेव्हाच ठरवलं होतं... २-३ जानेवारीला सुट्टी असल्यामुळे भटकंतीला जायचं पक्क होतं... मी, अजित आणि ऋशी असे तीघेजण होतो... पुणे - जुन्नर - इंगळूण - दुर्ग - ढकोबा - आंबोली - जुन्नर - पुणे असा प्लान ठरला...

`शिक्षणाच्या आयशीचो... ...

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 09/01/2010 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
`विठ्या, आरं माजी काठी खंय आसा?'... सकाळीसकाळी `मॊर्निंग वॊकाक' निघालेल्या सदुनानानं मुलाला हाळी देत विचारलं आणि विठ्यानं हांतरुणातनंच `ऊं' करत कूस बदलली. विठ्या म्हन्जे, सदुनानाचं रत्नं... गाववाले त्याला `नानाची अवलाद' म्हणायला लागले, तेव्हापास्नं सदुनानाही त्याला `विठ्या' म्हणायला लागला होता. मुलाला येताजाता हाक मारताना तरी तोंडात देवाचं नाव यावं, म्हणून सदुनानानं त्याचं नाव `विठ्ठल' ठेवलं होतं... तो लहान होता, तेव्हा त्याच्या मागनं पळताना सदुनानाची तारांबळ उडायची... `विठ्ठला, असं वागू नुको रे... विठ्ठला, शानपण कवा येनार रे माज्या सोन्या'...

अनिवासी भारतीयांनाही मिळणार मतदानाचा अधिकार

लेखक शाहरुख यांनी शनिवार, 09/01/2010 09:28 या दिवशी प्रकाशित केले.
सगळं गाव पेपर वाचतंय याची संपूर्ण जाणीव आहे..बातमी महत्वाची वाटल्याने द्यायची इच्छा झाली. अनिवासी भारतीयांनाही मिळणार मतदानाचा अधिकार
नवी दिल्ली - अनिवासी भारतीयांना 2014 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपर्यंत मतदानाचा अधिकार मिळू शकतो, असे संकेत पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी शुक्रवारी दिले. आठव्या प्रवासी भारतीय संमेलनाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. ""मतदानात आणि भारतातील निर्णयप्रक्रियेत आपल्यालाही महत्त्व मिळावे, ही अनिवासी भारतीयांना इच्छा मान्य आहे.

श्रवण कौशल्य

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 09/01/2010 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
एखादा आपल्या जीवनातला घडलेला प्रसंग घ्या. आपल्याला कोणीतरी काहीतरी काम सांगते व आपण ते काम जसे सांगितले अगदी त्याबरहुकूम करतोच असे नाही. असेच आपण एखाद्याला सांगितलेल्या कामाच्याबाबतीतही घडते. विद्यार्थीदशेत असल्याप्रसंगी शिक्षकाने शिकविलेले आपल्या जसेच्या तसेच लक्षात राहत नसण्याची शक्यता फारच असण्याची शक्यता असते. आपण टिव्ही, रेडिओ, चित्रपटात अनेक संवाद ऐकतो. हे संवाद आपल्याला जसेच्या तसेच लक्षात काही राहत नाहीत. अर्थात, ते लक्षात ठेवणे एवढे गरजेचेही नसते म्हणा. तरीही, एखादी गोष्ट आपण जशीच्या तशी, वाक्यन वाक्य लक्षात ठेवू शकत नाही.

या निर्दय मंत्र्यांचा धिक्कार!

लेखक बहुगुणी यांनी शुक्रवार, 08/01/2010 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
आताच माणुसकीला काळिमा लावणार्‍या या दोन तामिळी मंत्र्याच्या या घृणास्पद वर्तनाविषयी वाचलं, स्वतःचा जीव धोक्यात घालून चंदनचोर वीरप्पनला ठार मारणार्‍या सब इन्स्पेक्टर आर वेत्रवेल्ली याला सात स्मगलर्स नी भर रस्त्यात हल्ला करून त्याचे दोन्ही पाय तोडलेले असतांना, पाठोपाठ आपल्या लवाजम्यासहित घटनास्थळी पोहोचलेल्या तामीळनाडूचे आरोग्य मंत्री एम आर के पनीरसेल्वम आणि युवक आणि क्रीडा मंत्री मोइद्दीन खान या दोघांनी कसलीही मदत न केल्याने वेत्रवेली अति रक्तस्त

उत्सव ...!

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 08/01/2010 13:46 या दिवशी प्रकाशित केले.
*********************************************** मेघांचे उत्सव रिमझिमणारे जलदांचे अन गूढ चिंतन समीर बावरा निरंतर गातो आषाढातील जलदाच्या वेणा... निळे सावळे घन थरथरणारे दव-बिंदूचे अन हळवे स्पंदन विहग स्वरांचे सुखे मिरवती शुभ्र क्षणांचा सुरेल मेणा... गीत अधरीचे ते हुळहुळणारे थिजलेल्या अन मौनाचे मंथन मेघही वळले होवून आतूर अन जलधारांची अक्षयवीणा... ते मुग्ध इशारे प्रतिबिंबांचे रुजलो अन होवून हिरवे पाते लंघून सार्‍या सीमा शब्दांच्या एकटा कोरतो मौनाच्या लेण्या... *****************************************************
काव्यरस

ओझी

लेखक क्रान्ति यांनी शुक्रवार, 08/01/2010 00:44 या दिवशी प्रकाशित केले.
आहे तीच जड झाली, नका लादू रे आणखी खुळ्या अपेक्षांची ओझी किती पेलावी सारखी? रोज अंतहीन चालणारी जीवघेणी स्पर्धा उरी फुटेतो धावून इवलासा जीव अर्धा तोही राही कुठे आता?
काव्यरस