Skip to main content

लीला केली विश्वंभरे ....

लीला केली विश्वंभरे ....

Published on 09/01/2010 - 12:58 प्रकाशित मुखपृष्ठ
पाणियाचे पाणीपण | आकाशीचे व्यापकपण | अग्नीचे दाहकपण | कैसे राहे || कलिकेचे सुमन | सुमनाचे गंधाळण | भ्रमरा त्याचे आकर्षण | कैसे होये || देवा अंगी देव पण | भक्तां अंगी समर्पण | दुष्टा अंगी वाकुड पण | कैसे ठाये || लीला केली विश्वंभरे | पाही कौतुक साजरे | जेथे तेथे नाना परे | विठ्ठ्ल राहे || कंटक आणि पुष्पासरी | भिन्न गुणे राहे हरी | त्या त्या तैसे वंदन करी | प्रकृती धर्मे || सज्जनास पूजावे | दुष्टां निर्दाळावे | सुमनाचे गंध घ्यावे | त्या त्या परी || सागर लहरी ०८-०१-२०१०
लेखनविषय:

याद्या 1076
प्रतिक्रिया 2

खरोखरीच खुप आवडली. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

आक्षी खरं बोलूं राह्यलासा बगा. ------------------------ The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी