Skip to main content

(कोडगं सुख.....)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी सोमवार, 25/01/2010 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
सप्रे काकांची माफी मागुन.... अंदाज स्टॅमिन्याचा, माझ्या मला न आला हातात ग्लास माझा, घेता मला न आला बाटलीच टाकीली मी, अन कोंबडी रिचवली हँगओव्हर मात्र माझा, उतरविता मला न आला रस्त्यात मोळळ्या मी, का हरविले स्वतःला पोलीस एक माझा, धरण्यास हात आला आगतिक पणाने, जामिन दीला तु माझा घेईन दोन घोट, विसरण्या अपमान माझा मी कोडगा किती पण, तरीही सुखावलो बघ तल्लफ परत येता, थांबवता तुला न आला पैजारबुवा
काव्यरस

प्राँस् पालक

लेखक गणपा यांनी सोमवार, 25/01/2010 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
पालक पनीर हा प्रत्येक हॉटेलमध्ये मिळणारा आणि सर्वत्र आवडीने खल्ला जाणार पदार्थ.

म्हागाईला जवाबदार कोण ?

लेखक बाबुराव यांनी सोमवार, 25/01/2010 11:47 या दिवशी प्रकाशित केले.
महागाईला कृषीविभाग जवाबदार हाय. कृषीमंत्री जवाबदार हाय असे आरोप होत हायेत. वर्षभरापुर्वी महागाईवर नियंत्रण आनन्यासाठी देशातल्या सार्‍या मुख्यमंत्र्याची बैठक व्हणार व्हती. ती अजून झाली नाही. भाववाढीबाबत राज्यसरकार आन केंद्रसरकार जवाबदारी झटकून राह्यले. त्यामुळं म्हागाईवर नियंत्रण राह्यलेले नाय. आपल्याला काय वाटतं महागाईला जवाबदार कोण ?

विंडोज व्हिस्टा मध्ये काही गेम्स चालत नाहीत त्यासाठी काय करावे? व्हिस्टा सोबत आणखी एक ओ. एस. कशी टाकावी?

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 25/01/2010 10:06 या दिवशी प्रकाशित केले.
काही गेम्स मी जेव्हा "विंडोज व्हिस्टा" मध्ये इंन्स्टॉल करायला जातो, तेव्हा एक मॅसेज येतो की, धीस इज नॉट अ वॅलीड वीन ३२ ऍप्लिकेशन. त्यासाठी मी एक "डॉस बॉक्स" हा फ्री प्रोग्रॅम टाकून पाहिला, तरीही ते गेम रन करता येत नाही. पण, व्हिस्टा मध्ये "डॉस बॉक्स" च्या आधारे "डॉस गेम्स" चालतात (उद- डेव्ह, बायो-मेनॅस, लायन कींग वगैरे). पण, विंडोज व्हिस्टा" मध्ये नीड फॉर स्पीड, तसेच व्ही कॉप वगैरे हे गेम्स चालत नाहीत.

नवे संकेतस्थळ .

लेखक नरेश_ यांनी रविवार, 24/01/2010 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांना कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की, माझा पुतण्या सिद्धार्थ याने एक नवे मराठीसंस्थळ विकसीत केले आहे :) www.abhayaranya.com असे संस्थळाचे नाव असून औपचारिक उद्घाटन होणे बाकी असले तरीही मी आपणास ते पाहण्याची विनंती करत आहे. काही चुका, त्रुटी असल्यास नजरेस आणून द्याव्यात. धन्यवाद.

साठी बुद्धी...

लेखक विकास यांनी रविवार, 24/01/2010 20:05 या दिवशी प्रकाशित केले.
या मंगळवारी, २६ जानेवारी २०१० ला अधुनिक भारताचे प्रजासत्ताक झाले, त्याला ६० वर्षे होत आहेत. त्या निमित्ताने सर्वप्रथम सर्व भारतीयांना तसेच भारतवंशीयांना शुभेच्छा! व्यक्तीच्या आयुष्यासंदर्भात, मराठीत एक मजेशीर वाक्प्रयोग आहे: "साठी बुद्धी नाठी". त्याचे एक कारण असे सांगितले जाते की, साठाव्या वर्षांनंतर माणूस म्हातारपणा कडे झुकायला लागल्यावर परत लहान मुलासारखा वागायला लागतो, वागणे बदलू लागते, इत्यादी...मात्र राष्ट्राच्या बाबतीत असे म्हणणे अवघड आहे.

होमींग पिजन - कुशल वाटाड्या कबुतर

लेखक अजय भागवत यांनी रविवार, 24/01/2010 07:44 या दिवशी प्रकाशित केले.
कबुतराच्या अचूकतेने घरी परतण्याच्या कुशलतेची माहिती मानवाला खूप आधी पासुन होती असे दिसते. ह्या कुशलतेचा वापर मानवाने लगेचच केला. ज्यांना हे कळाले की, कबुतरांमधेच असे काहीतरी विषेश आहे त्यांची स्तुती केलीच पाहिजे. इजिप्त्शियन संस्कृतीत कबुतरांचा वापर झाल्याचे दाखले आहेत. भारतीय पुराणात काही दाखले आहेत की नाही माहीत नाही. दुसऱ्या विश्वव्यापक युद्धात जर्मनीने कबुतरांचा वापर निरोप्या म्हणून तर केलाच पण त्यांच्या मानेखाली बटू-क्यामेरे लावून चित्रफित मिळवली व युद्धात ह्या माहितीचा वापर केला.