Skip to main content

आमच्या शाळेत भरविलेले सायन्स प्रदर्शन

लेखक शनआत्तार यांनी मंगळवार, 16/02/2010 19:12 या दिवशी प्रकाशित केले.
photo नमस्कार आपणास मी एक आज गम्मत सांगणार आहे. आपण सगळे जण लहान मुलांना अल्लड समजतो. त्याना काही कळत नाही त्याना सगळ्या गोष्टी समजाव्याला लागतात मात्र हे सर्व साफ खोटे.आमची शाळा देवगड तालूक्यातील शिरगाव सारक्या लहान खेड्यात आहे. आमच्या शाळेत इंग्लंड च्या न्यु कासल विश्वविद्यापीठातर्फे अनुदान मिळाले असून त्या अनुदानावर आम्ही संगण्क शिक्षण मुलांना देतो. आम्ही संगणक शिक्षण देत नसून ती मुले आपोआप आपणच त्या संगणक प्रयोगशालेत स्वःता शिकत असतात.

सॉफ्टवेअर ?

लेखक नम्रता राणे यांनी मंगळवार, 16/02/2010 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीतुन इंग्रजी तसेच इंग्रजीचे मराठी भाषांतर करण्याचे सॉफ्टवेअर कोठे उपलब्ध होईल ?

तुझे माझे गुलाबाचे

लेखक पुष्कराज यांनी मंगळवार, 16/02/2010 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
तुझे माझे गुलाबाचे जुळ्लेच नाही नाते गुलाबाच्या गंधाहून काट्याचीच ओढ वाटे मैत्री मध्ये आपुल्या या भांडणच होती फार रुसुनिया कित्येकदा शब्दांचीच मारामार गुलाबाचे फुल देता काटे तुला बोचतात शब्द तुझे प्रेममय रातदिन टोचतात शब्दाविना फुलाविना तुझे माझे आहे नाते म्हणुनच गुलाबाच्या काट्यांचीही ओढ वाटे
काव्यरस

(ती अन तो )

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 16/02/2010 13:47 या दिवशी प्रकाशित केले.
कच्च्या मालाचे पुरवठादार : दुवा १, दुवा २ दुवा ३ ती - इ..इ....नको ना. तो - नको काय नको ती - धसमुसळा कुठचा! तो - मी धसमुसळा तर तू कोण? ती - तिकडे शिरला बघ!! तो - आता काय करू? ती - काय करू म्हणजे काय? जरा चपळाई दाखव की. तो - तेच तर करतोय. ती - हो पण तुला तेच जमत नाही. तो - आता तुझा हात आडवा आला. मधे मधे करू नकोस तू. ती - अरे पण तुला जमत नाही तर असा चिडतोस का?

गुंडाळलेल्या कापडाची कहाणी!

लेखक नीधप यांनी मंगळवार, 16/02/2010 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणापासून नव्वारी साडी म्हणजे काहीतरी प्रचंड अवघड, गूढ आणि एकदम खानदानी प्रकरण असावं असा एक समज बसला होता डोक्यात. माझी आजी काही नव्वारी नेसत नाही. पण नव्वारी नेसणार्‍या लांबच्या आज्या घरी आल्या की मला खूप मस्त वाटायचं. आपल्या नात्यात पण हे अवघड आणि खानदानी प्रकरण आहे याचं समाधान वाटायचं. पण तरी कधी नव्वारी नेसून बघण्याचा प्रयत्न केला नव्हता. 'जाणता राजा' नाटकात मी सामील झाले मग नव्वारी नेसायला शिकणं, नेसणं, नेसवणं हे ओघानेच आलं.

जगताना...

लेखक जयेश माधव यांनी मंगळवार, 16/02/2010 03:35 या दिवशी प्रकाशित केले.
जगताना... माणूस म्हणून जगताना खूप सोसाव॑ लागत॑ स्वतःच्या मर्म ब॑धावर पाणी सोडाव॑ लागत॑ ताठ मानेन॑ जगताना खूप भोगाव॑ लागत॑ आशा निराशेच्या गर्तेत स्वतःला झोकव॑ लागत॑ स्वय॑पाक शिजवताना आधण ठेवाव॑ लागत॑ आग निखार्‍याच्या जाळाकडे अधुन मधुन पहाव॑ लागत॑ असत्याचा सामना करताना सत्य जगाव॑ लागत॑ मानापमानाच्या प्रस॑गा॑ना सामोर॑ जाव॑ लागत॑ वणवण हि॑डताना उन पेलाव॑ लागत॑ सुखाच्या शोधासाठी खूप वेळ जळाव॑ लागत॑ जयेश माधव

बाँबस्फोट ,सुरक्षा आणि गुप्तचर संस्था

लेखक चिरोटा यांनी मंगळवार, 16/02/2010 03:14 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही वर्षात आपण देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचा पार बोजवारा उडालेला पाहतो आहोत्. मुंबई ,दिल्ली,जयपुर्,हैद्राबाद्,कोइम्ब्तोर्,कोलकाता ...आता पुणे सगळीकडेच पोलिस,राज्य/केंद्र सरकार हतबल.'हयगय केली जाणार नाही' वगैरे ठरलेली भाषा,मंत्र्यांचे चौकशीचे आदेश्,निवृत्त अधिकार्‍यांची समिती,त्यांची पोलिसदलाला 'आधुनिक' बनवण्याची शिफारस. मग अडते कुठे? जवळपास अशा प्रकारच्या बातमीत 'केंद्रिय गुप्तचर संस्थांनी आधीच इशारे दिले होते' अशा प्रकारची वाक्ये हमखास आढळतात्.गेल्या काही दिवसांत अशा संस्थांविषयी इंटरनेटवर काही माहिती मिळते का बघितले. पण भारतिय संस्था भलत्याच गुप्त निघाल्या. अमेरिकेच्या सी.आय्.ए.

श्रीवर्धन हरिहरेश्वर

लेखक Manish Mohile यांनी सोमवार, 15/02/2010 22:59 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रानो, मिपा वरचे माझे हे पहिले लिखाण. मुळचा मुम्बईचा असलो तरी नोकरीच्या निमित्ताने गेली 13 - 14 वर्षे बाहेरगावी असतो. खूप वर्षानी कोकणात श्रीवर्धन हरिहरेश्वरला जाण्याचा योग आला. तिथूनचे काही फोटो. http://picasaweb.google.com/manishmohile/HariHareshwarDec2008?feat=dire…

कंपार्टमेंट

लेखक विनायक प्रभू यांनी सोमवार, 15/02/2010 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
खरे तर 'अ' शी मैत्री व्हायचे काहीही कारण नव्हते. एका अत्यंत जवळच्या मित्राने करुन दिली. हळु हळु मैत्री वाढली. एकत्र बसणे उठणे होउ लागले. मैत्री घनिष्ठ झाली. एकमेकांशी रोज बोलणे होउ लागले.