गेल्या काही वर्षात आपण देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचा पार बोजवारा उडालेला पाहतो आहोत्. मुंबई ,दिल्ली,जयपुर्,हैद्राबाद्,कोइम्ब्तोर्,कोलकाता ...आता पुणे सगळीकडेच पोलिस,राज्य/केंद्र सरकार हतबल.'हयगय केली जाणार नाही' वगैरे ठरलेली भाषा,मंत्र्यांचे चौकशीचे आदेश्,निवृत्त अधिकार्यांची समिती,त्यांची पोलिसदलाला 'आधुनिक' बनवण्याची शिफारस. मग अडते कुठे?
जवळपास अशा प्रकारच्या बातमीत 'केंद्रिय गुप्तचर संस्थांनी आधीच इशारे दिले होते' अशा प्रकारची वाक्ये हमखास आढळतात्.गेल्या काही दिवसांत अशा संस्थांविषयी इंटरनेटवर काही माहिती मिळते का बघितले. पण भारतिय संस्था भलत्याच गुप्त निघाल्या. अमेरिकेच्या सी.आय्.ए. ची साइट आहे,गोर्या साहेबाच्या MI6 ची साईट आहे,इस्रायलच्या मोसादची पण साईट आहे.पण भारतिय गुप्तचर संस्थांची वेब साईट नाही.
भारतिय वृत्तपत्रांमध्येही ह्यासंस्थांविषयी कधीही माहिती येत नाही.टी.व्ही चॅनेल्सपण ह्या संस्थांविषयी विषयी बोलायचे टाळतात.
प्रश्न पडतो की ह्या संस्थांचे काम चालते तरी कसे? Official Secret Act विषयी मला जास्त माहिती नाही पण आजच्या जगात ह्या संस्था,त्यांचे कामकाज् एवढ्या प्रमाणात गुप्त ठेवण्याचे कारण काय?भारताच्या अंतर्गत सुरक्षेसाठी इंटिलिजन्स ब्युरो ही संस्था आहे तर बाह्य सुरक्षेसाठी रॉ नावाची संस्था आहे एवढेच ऐकून आहे.रॉ चा वार्षिक जमाखर्च कॅग तपासत नाहीत असेही वाचले होते.
वाचने
2370
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
काय आहे
घोळकर
म्हणूनच
In reply to घोळकर by विनायक रानडे
निधर्मी
म्हणूनच
In reply to निधर्मी by चिरोटा
प्रश्न
गुप्तचर यंत्रणा आणि पोलिस..
सहमत
In reply to गुप्तचर यंत्रणा आणि पोलिस.. by प्रमोद देव