गेल्या काही वर्षात आपण देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचा पार बोजवारा उडालेला पाहतो आहोत्. मुंबई ,दिल्ली,जयपुर्,हैद्राबाद्,कोइम्ब्तोर्,कोलकाता ...आता पुणे सगळीकडेच पोलिस,राज्य/केंद्र सरकार हतबल.'हयगय केली जाणार नाही' वगैरे ठरलेली भाषा,मंत्र्यांचे चौकशीचे आदेश्,निवृत्त अधिकार्यांची समिती,त्यांची पोलिसदलाला 'आधुनिक' बनवण्याची शिफारस. मग अडते कुठे?
जवळपास अशा प्रकारच्या बातमीत 'केंद्रिय गुप्तचर संस्थांनी आधीच इशारे दिले होते' अशा प्रकारची वाक्ये हमखास आढळतात्.गेल्या काही दिवसांत अशा संस्थांविषयी इंटरनेटवर काही माहिती मिळते का बघितले. पण भारतिय संस्था भलत्याच गुप्त निघाल्या. अमेरिकेच्या सी.आय्.ए.