Skip to main content

आस एक जगण्याची!

लेखक अरुंधती यांनी गुरुवार, 18/03/2010 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
काल सकाळी पारुबाई कामावर आल्या तेव्हा त्यांचा उजवा गाल टम्म सुजला होता, डोळ्याजवळचा भाग सुजून काळानिळा झालेला! माझ्या छातीत चर्रर्र झालं. "काय हो पारुबाई, कुठं पडलात वगैरे की काय?" माझ्या प्रश्नावर खिन्न हसून पारुबाई चेहरा वाकडा करत म्हणाल्या, "कसलं काय ताई! काल रातच्याला ह्ये लई पिऊन गोंधळ घालीत व्हते म्हनून त्यास्नी बोल्ले तर मार मार मारलन मला! समद्या लोकांसमोर तमाशा केला वर माज्याकडचं पन्नास रुपयं घ्येतलं बळजबरीनं! आता तुमीच सांगा मी पोरांच्या प्वाटात काय घालायचं?" नवर्‍यानं दारु पिऊन आपल्याला बेदम मारले, शिवीगाळ केली ह्यापेक्षा त्या माऊलीला पोरांच्या पोटाची चिंता लागली होती.

अनुरानन

लेखक जयवी यांनी गुरुवार, 18/03/2010 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
काल टीव्ही वर सर्फिंग करतांना एक सुरेख चित्रपट बघायला मिळाला. मूळ बंगाली भाषेतला सिनेमा हिंदीत डब केलेला. राहुल बोस, रितुपर्णा घोष, आणि रिमा सेन. “अनुरानन” हे नाव त्या सिनेमाचं. मला ते नाव खूपच आवडलं. सुरवातीला अर्थ माहित नव्हता. पण सिनेमातच राहुल बोस त्याचा अर्थ सांगतो. बंगालीत तो इतकं छान उच्चारतो…ऑनुरॉनॉन. ”अनुरानन” म्हणजे एकमेकांच्या सुरात सूर मिसळणे. ”अनुरानन” ह्या शब्दातच इतकी गोड लय आहे ना….!! अर्थ कळल्यावर तर हा शब्द आणखीनच आवडला. एकमेकांच्या सुरात सूर मिसळायचा…ही कल्पनाच किती छान आहे !! हे असं सूर मिसळणं कितीजणांना शक्य होतं ? प्रत्येक नात्याचाच एक सूर असतो.

पतीच्या वडिलोपार्जित इस्टेटीमध्ये पत्नीला काहीही हक्क नाही

लेखक युयुत्सु यांनी गुरुवार, 18/03/2010 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या पती हयात असताना पतीच्या वडिलोपार्जित इस्टेटीमध्ये पत्नीला काहीही हक्क नाही अशा अर्थाचा एक लेख आजच्या सकाळ मध्ये प्रसिद्ध झाला आहे. त्या लेखाची लिंक सापडली नाही. हा असा हक्क पत्नीला असावा की नसावा या वर मिसळपावाच्या सभासदांचे मत जाणून घेण्यास मी उत्सूक आहे. ------------------------------------- हा घ्या दुवा http://72.78.249.125/Sakal/18Mar2010/Enlarge/PuneCity/page7.htm (प्रत्यक्ष वृत्तपत्र जसे दिसते त्या ई-पेपरच्या दुव्यावरती पान क्रमांक सात पहा.) -संपादक

आमच्या सम आम्हीच ! ! !

लेखक निरन्जन वहालेकर यांनी गुरुवार, 18/03/2010 10:34 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या सम आम्हीच ! ! ! रुपयौवना जणू विश्वाची तू, आम्हीही नाही कमी. वृथा अभिमान सोड आता, येईल प्रचिती तव सत्वरी ! सौंदर्य कसले बागेस त्यां माळीच ज्यां निगेला नसे चार दिसांचा ताटवा मग़ पाकळ्यांची झड असे ! ! लावण्ण्याची बाधा तुला लेखू नको मजला कमी, पाहिले बाग़ अगणित आम्ही गुलाबांची येथे नाही कमी ! ! ! निरंजन वहालेकर

पुरावा मिळाल्याशिवाय नाडी ग्रंथांवर माझा विश्वास बसणार नाही.

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 17/03/2010 23:39 या दिवशी प्रकाशित केले.
दुर्दैवाने तुमची नाडीवर जितकी ठाम श्रद्धा आहे तितकाच माझा अविश्वास अवैज्ञानिक सत्यावर आहे. तेव्हा तुम्ही कितीही जेरीला आणलंत तरी मला पुरावा मिळाल्याशिवाय माझा विश्वास बसणार नाही.
राजेश घासकडवी जी आता कसे बोललात... मग आपले व माझे पटेल... जर सत्यनिष्ठेने पुरावा मिळवाल तर मग बदलाल की नाही का तरी ही नाहीच... मी पुराव्यानेच नाडी ग्रंथांना अवैज्ञानिक, थोतांड, खोटे ठरवायचा चंग बांधून गेलो... पुराव्यासाठी जंग जंग पछाडून तमिळींना हाताशी धरून, इंडॉलॉजीच्या ताडपत्रांच्या तज्ञांनी पारखून जे ठरवले, समजले.

गाथा इराणी

लेखक अभिज्ञ यांनी बुधवार, 17/03/2010 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, परवाच पुण्यातून -पक्षी क्रॉसवर्ड मधून पुस्तक खरेदी झाली. त्यात मीना प्रभु यांचे "गाथा इराणी " हे पुस्तक देखील खरेदी केले. मौज प्रकाशनाने प्रकाशित केलेले हे पुस्तक(कंटेंट) अतिशय देखणे झाले आहे. नेहमीप्रमाणे मीना प्रभुंची लेखणी सुंदरच बरसलि आहेच. परंतु वाचता वाचता असे लक्षात आले कि पुस्तकातील मधली बरीचशी पाने गायब आहेत. काहि पानांचा क्रम वाट्टेल तसा आहे. कशाचा कशालाहि काही ताळमेळ नाही. पुस्तकाची किंमत ३०० रुपये असल्याने चिडचिड झाली. क्रॉसवर्डवाल्याला फोन केला तर त्याने चक्क कानावर हात ठेवले. एकदा विकलेले पुस्तक आम्ही बदलून देत नाहि.