लेखकश्रीगणेशायांनी सोमवार, 13/09/2021 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
मी लिहावं, तू वाचावं.
मी बोलावं, तू ऐकावं.
मी भांडावं, तू रुसावं.
मी हसवावं, तू हसावं.
मी न बोलता जाणावं,
तू डोळ्यांतून सांगावं.
काळजाला स्पर्शणारं, तुझ्या वहीतलं,
मी एक, पिंपळपान व्हावं...
लेखकप्राची अश्विनीयांनी सोमवार, 13/09/2021 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
तसं म्हटलं तर त्यांची ती होती खरीखुरी डेट
पण तिच्या त्याच्या मनासारखी घडलीच नाही भेट..
सुट्टीचा दिवस होता,
Backdrop ला पाऊस होता.
Romantic होतं weather,
एकांताची हलकी चादर.
ती म्हणाली, खरंच येऊ? तो म्हणाला, yes plz, I'll wait....
पण... तिच्या त्याच्या मनासारखी घडलीच नाही भेट..
खरंतर त्याच्याचसाठी नेसली ती नव्वीन साडी
ह्रदयात तिच्या धडधडणारी सुप्परफास्ट होती गाडी.
तरी बरं तोंडावरती लावला होता मोठ्ठा मास्क
नाही तर hiding feelings is not a simple task!
चेहरा कोरडा करून म्हणे, "Soooo sorry for the late"
पण....
मनस्वी सिद्धार्थला विविध विषयातील शिक्षण घेण्याची आवडच होती असं म्हंटलं तरी चालेल. म्हणूनच तो केवळ ग्रॅज्युएट आणि पुढे एम. बी. ए. होऊन थांबला नव्हता; तर त्याने कायद्याचे शिक्षण देखील पूर्ण केले होते. सिध्दार्थला चित्रकलेची देखील खूप आवड होती.
सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा. श्रीगणेशावर लिहायचं म्हटलं की त्याच्याबद्दलच्या असंख्य गोष्टी, कथा आपणास आठवत असतात. श्रीगणेशाच्या विविध कथा आपणास कायमच आवडत असतात.
लेखकगोरगावलेकरयांनी सोमवार, 13/09/2021 07:06 या दिवशी प्रकाशित केले.
घरापासून अगदी अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेल्या कर्नाळ्याला गेल्या काही वर्षांपासून एकदा तरी भेट दिली जाते. काही वेळा फक्त पक्षी अभयारण्यात फेरफटका तर काही वेळा किल्ल्यावर चढाई. गेल्या वर्षी करोना काळामुळे संधी हुकली पण सध्या अभयारण्यात जाण्यास परवानगी आहे. याच गोष्टीचा फायदा उचलत थेट किल्ल्यापर्यंत मुसंडी मारली.
किल्ल्याची ऐतिहासिक माहिती वगैरे गोष्टी मिसळपाववर पूर्वी आलेल्या आहेत तसेच जालावर सुद्धा माहिती आहेच.
आज फक्त फोटोंमधून किल्ल्यापर्यंतची भटकंती.
अभयारण्यात सकाळी ७.०० ते दुपारी ३.०० पर्यंत येथे प्रवेश दिला जातो.
लेखकKadamahesh5यांनी सोमवार, 13/09/2021 03:07 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक समर्थ रामदास
"वार्ता विघ्नाची" म्हणजे अफजल खान विजापूरहुन निघाला. सुखकर्ता दुःखहर्ता......ही गणपतीची आरती संपूर्ण महाराष्ट्रात म्हंटली जाते.हि आरती समर्थ रामदास स्वामी यांनी रचली आहे.गणपतीची संकष्टी चतुर्थी करणारा गणेशभक्त प्रत्येक घराघरांत असणारच. देवादिकांसह संतांनी देखील सर्व कार्यात गणपती प्रथम पूजला आहे.भाद्रपद शु. ४ ते भाद्रपद शु.१४ हा गणेशोत्सवाचा कालावधी आहे.प्रचलीत गणेशोत्सवाच्या पूर्वी श्री समर्थ रामदास स्वामींनी हा उत्सव सुरू केल्याची नोंद इतिहासात आहे. ह्या गणेशोत्वाला इ.स.२०२१ साली ३४५ वर्ष पूर्ण होतं आहेत.
समर्थे सुंदरमठी गणपती केला !
लेखकkvponksheयांनी रविवार, 12/09/2021 21:19 या दिवशी प्रकाशित केले.
पेशव्याचे सेनानी विठ्ठल नरसिंह विंचूरकर (पानिपतावर झालेल्या लढाईतले ते विठ्ठल शिवदेव विंचूरकर वेगळे आणि हे वेगळे) हे ब्रिगेडियर स्मिथ च्या बरोबर काही दिवस होते. त्यांनी इंग्रजी फौजेतील शिस्त जवळून पहिली होती. त्यांनी पेशव्यास "इंग्रजांशी आता बिघाड न करण्याचा सल्ला दिला ". पण रावबाजीने तो ऐकला नाही. तरीहि विंचूरकर पेशव्याची आज्ञा मानून ससैन्य हजर झाले होते.
गोविंदराव काळे या बारभाईतील तत्कालीन एकमेव हयात सेनानींचे म्हणणेही युद्धाच्या विरोधात होते. मराठ्यांच्या लढायांचा इतिहास या पुस्तकात त्यांचे म्हणणे दिले आहे. " तूर्त इंग्रजांशी लढाईचा प्रसंग आणू नये.
चिरंजीवी
चिरंजीवित्व म्हणजे नक्की काय असेल? काल मापन संपेपर्यंत जिवंत राहाणं; कालांता पर्यंत मृत्यू न येणं; म्हणजे चिरंगीजित्व असेल का? पण जरी मृत्यू येत नसला तरीही शरीर पेशींमध्ये सुक्ष्मगतीने का होईना पण बदल तर होत असतीलच ना?
लेखकसुक्यायांनी रविवार, 12/09/2021 04:03 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो,
सगळ्यांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे. दरवर्षी बाप्पाची मनोभावे पुजा करताना सर्व जण खुप सुंदर अशी आरास करतात. काही जण तर अगदी जीव ओतुन सुंदर देखावे करतात. यावर्षी सगळ्या मिपाकरांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन व्हावे म्हणुन हा धागाप्रपंच ..
मग येउ द्या तुमच्या घरच्या बाप्पाचे फोटो ... सुरुवात मी माझ्यापासुन करतो ... हा माझ्या घरचा बाप्पा . . .