Skip to main content

सावध ऐका (मागल्या) हाका!

लेखक भोचक यांनी सोमवार, 22/03/2010 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
पदार्थाची चव लिहून सांगता येत नाही, तो अनुभवाचा भाग आहे, तद्वतः इंदूरी हाकांचे विश्व हा खास अनुभवाचाच भाग आहे. आता लेखाची सुरवातच खाद्यपदार्थाच्या शब्दाने व्हावी हा खास इंदुरी असल्याचा अपरिहार्य नि अटळ परिणाम आहे. पण तो अट्टल खवय्या असल्याची साक्षही आहे. इंदुरात आल्यावरही इथल्या हाकांमध्ये भिजले नाहीत नि त्या हाका तुमच्या जिभेत भिजल्या नाहीत, तर तुम्ही 'इंदौरकर' कधीच होऊ शकणार नाही. इथल्या भय्याचा उच्चार तुम्ही कोणत्या वेळी, कोणासमोर नि कसा करता यावरही तुम्ही इंदौरी आहात की नाही हे ठरते.

[खिंड]

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी सोमवार, 22/03/2010 19:21 या दिवशी प्रकाशित केले.
|| विनायक प्रभू प्रसन्न ||
हॉल क्रमांक पाच. वरीष्ठ महाविद्यालयाचा परीक्षा पेपर इंग्रजीचा. मास्तरानं प्रश्नपत्रिका-उत्तरपत्रिका वाटल्या. पहिला तास सहज निघून जातो. सो-सो, विद्यार्थ्यांच्या नेहमीच्या हालचाली. मास्तर कॉप्या काढून घेतात. वर्गात थोडीशी हालचाल. पुन्हा नियमितपणे प्रोसेस सुरु. शेवटची पाच मिनिटे. एका पोरानं चौथ्यांदा कागदं काढली. मास्तरानं पुन्हा त्या चिठ्ठ्या जमा केल्या. आणि आता उत्तरपत्रिकाही घेतली. सर, उत्तरपत्रिका द्या ना ! सर, उत्तरपत्रिका द्या ना ! ''तुझ्या कितीदा नकला घ्यायच्या'' ''सर, सर्वच पोरं नकला करतात.

एकही अक्षर...

लेखक पुष्कर यांनी सोमवार, 22/03/2010 18:18 या दिवशी प्रकाशित केले.
काएकी कुठून कैशी ल्लोळातुन उमटे ऐशी हीन स्वरांची शुभ्र रेष ती जाणत्या त्या विहरी वेली क्षत्रपतीच्या कुरणावरुनी विकुहरातील बनुनी छाया रसावुनी मग येई रावा रुभूमीकणघृत रगडाया राजीर्ण त्या जरासंध-सम चके समस्त एकवटाया नाद जोडुनी प्रतिपदमात्रे आरंभीचा ही कविता मग अधर दिशेने बोधे वाचा शब्दार्थ - विहरी - विहरण करतात क्षत्रपती - पृथ्वीपती घृत - तेल प्रतिपदमात्रे - (कवितेच्या) प्रत्येक ओळीत

कुंग फु पांडा

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 22/03/2010 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
आज विमुक्तचा हा धागा बघताना कुंग फु पांडाची आठवण झाली आणी मी लिहिता झालो. -- बरेच दिवस मित्रांनी "साल्या तु कुंग फु पांडा बघच !" असा घोषा लावला होता. काही दिवसांपुर्वी बिका आणी मकीच्या कृपेने हा अप्रतिम अ‍ॅनीमेशनपट पाहायाला मिळाला. साधी सरळ गोष्ट पण आयुष्याची छान छान सुत्रे शिकवुन जाणारी. 'पो' हा खरेतर पिस व्हॅली मध्ये राहणारा एक पांडा, पण तो आपल्या पालनकर्त्या वडलांबरोबर (गुज पक्षी) राहात असतो.

स्मार्टफोन : मदत हवीय

लेखक आशिष सुर्वे यांनी सोमवार, 22/03/2010 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रहो.. आपल्या मिपावर बर्‍याच तंत्रज्ञ मंडळींचा वावर आहे. विविध क्षेत्रांत पारंगत असलेल्या आपल्यासारख्या तज्ञांकडून योग्य मार्गदर्शन मिळेल अशी आशा आहे. मी सध्या नोकिया ६२७० हा भ्रमणध्वनी वापरीत आहे. सध्या त्याची प्रकृती बरीच खालावली असल्याने मी सध्या एका नवीन भ्रमणध्वनीच्या शोधात आहे - जो 'स्मार्टफोन' (Smartphone) ह्या वर्गात मोडणारा असला पाहिजे. मला खालील सुविधा असणारा 'स्मार्टफोन' हवाय: १. टचस्क्रिन+की-बोर्ड (Full QWERTY tactile keyboard + Full QWERTY onscreen keyboard) - नुसता की-बोर्ड असेल तरी चालेल पण डिसप्ले-स्क्रिन बर्‍यापैकी मोठा हवा २. वाईड स्क्रिन डिसप्ले ३.

( बे ) शरम ! ! !

लेखक निरन्जन वहालेकर यांनी सोमवार, 22/03/2010 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
( बे ) शरम ! ! ! आमच्या वेळी गावांत कधीतरी लाल दिव्याची गाडी दिसायची, आत आपलं माणूस बघून छाती भरून यायची. . आज गल्लोगल्ली गाड्यांवर तसलेच लाल दिवे चमकतात, आतील धनदांडगे मात्र आपले कुणीच नसतात. गाड्या उदंड झाल्या लालदिव्याच्या, जनतेचे हाल कमी नाहीत, लालदिव्याची गाडी बघून आता काहीच वाटत नाही. गाडीवरच्या लाल दिव्यांना अब्रूची चाङ नाही म्हणूनच रेडलाईट एरियात आता लाल दिवा लागत नाही, लाल दिवा लागत नाही.

माझा चारोळी संग्रह (२२ चारोळ्या)

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 22/03/2010 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
(मी आत्तापर्यंत लिहिलेल्या २२ चारोळ्या मिसळपाव च्या वाचकांसाठी देत आहे! ) ------------------------------------------------------- (१) गुढीवाडव्याच्या शुभेच्छा "चैत्र महिन्याशी करूया पुन्हा मैत्र... नव्या वर्षाचे रंगवूया सुखद चित्र...

सांगू काय, सांगू काय?

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 22/03/2010 14:24 या दिवशी प्रकाशित केले.
( "एका माणसाची दाढी केवढी लांब सांगू काय ...." या एका बालगीताच्या चालीवर खालील विडंबनात्मक कवीता वाचावी. वरील बालगीत फाउंटेन कंपनीच्या च्या एका बालगीतांच्या व्हि‌. सी. डी. मध्ये आहे. ते 'यु ट्युब' वर शोधले तरी मिळू शकेल. दैनंदिन जीवनातील, राजकारणातील विविध ठिकाणी विरोधाभास दिसतो, त्यावर उपहासात्मक कविता मी लिहीली आहे.) एका मॉडेलची वस्त्रे केवढी छोटी, सांगू काय ? सांगू काय, सांगू काय, सांगू काय ? एवढी छोटी, एवढी छोटी की, रॅंपवर चालतांना गळून जाय.... सांगू काय, सांगू काय, सांगू काय ?
काव्यरस

प्रेमात तुझ्या...संपलो मी...!!

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 22/03/2010 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेमात तुझ्या गुंतलो मी माझाच नाही उरलो मी प्रेमाच्या खेळात जिंकलो मी हृदयात तुझ्या व्यापून उरलो मी..... भेटलीस तेव्हा हरखलो मी हसलीस तेव्हा हर्षलो मी रुसलीस तेव्हा हुरहुरलो मी निघालीस तेव्हा हिरमुसलो मी..... तू दूर होतीस तेव्हा, तुझ्या हृदयात दिसलो मी परत कधी आलीच नाहीस तेव्हा, माझ्याच अश्रूंमध्ये विरघळून संपलो मी
काव्यरस

काळ्या पैशाला करमाफी दिली तर देशाचा फायदा होईल?

लेखक अरुंधती यांनी सोमवार, 22/03/2010 13:35 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी एका देशाने तेथील नागरिकांच्या काळ्या पैशावरचा कर रद्द (कर माफी) जाहीर करून त्यांना काळा पैसा बाहेर आणण्याची व तो देशांतर्गत व्यापारात गुंतवण्याची संधी दिल्याचे वाचनात आले. त्यातून त्यांचे वर्किन्ग कॅपिटल वाढले, देशातील गुंतवणूक वाढली, मंदीच्या काळात परिस्थिती सावरायला मदत झाली आणि रोजगारनिर्मिती झाली. असा उपाय आपल्या भारतात केला तर??? त्याचे काय फायदे अगर तोटे असतील? अशा मार्गाने का होईना, काळा पैसा योग्य मार्गाने बाजारात येईल? त्यात धोका काय? आपले काय मत? -- अरुंधती