Skip to main content

नॉर्मन विस्डम ...

लेखक sagarparadkar यांनी बुधवार, 12/05/2010 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
मला असे नेहेमी वाटत आले आहे की जगप्रसिद्ध कॉमेडिअन हा ब्रिटिशच असायला हवा. कारण निश्चितपणे सान्गता येणार नाही, पण ब्रिटिशान्चा 'सेन्स ऑफ ह्युमर' फारच उच्च दर्जाचा असतो असे मानणार्यान्पैकी मी एक आहे... माझ्या मते चार्ली चाप्लिन नन्तर बहुतेक 'नॉर्मन विस्डम' ह्याचा नम्बर लागावा ... मी त्याचा Stitch In Time हा सुन्दर चित्रपट पाहिला आणि २५/३० वर्शान्पुर्वी त्याच चित्रपटाचा Trailor पुण्यात्ल्या राहूल टॉकिजला पाहिलयाचे आठवले .... हया पिक्चरचे सर्व भाग youtube वर उपलब्ध आहेत. परन्तु बाकी फारसे विडिओज सापडले नाहीत.

'तो'

लेखक आनंद घारे यांनी बुधवार, 12/05/2010 08:41 या दिवशी प्रकाशित केले.
दादरला झालेल्या मराठी ब्लॉगर्सच्या मेळाव्याला हजर राहून मी वाशीला घरी परतत होतो. शिवाजी पार्कहूनच निघणारी बस पकडली आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ठेवलेल्या राखीव जागेवर स्थानापन्न झालो. शेजारी माझ्याच वयाचे एक गृहस्थ येऊन बसले. बेस्टच्या बसमध्ये शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाबरोबर बोलायची पध्दत नाही. एकाद्या सीटवर आजूबाजूला बसलेल्या दोन व्यक्तींचे बोलणे ऐकू आलेच तर त्या बहुधा आपापल्या सेलफोनवरून निरनिराळ्या लोकांशी बोलत आहेत असे दिसते. माझे तिकीट काढून झाल्यावर मी सुध्दा आपला मोबाईल काढला आणि त्यावरची बटने दाबायला सुरुवात केली.

हिंसात्मक कार्टून्स

लेखक शिल्पा ब यांनी बुधवार, 12/05/2010 04:16 या दिवशी प्रकाशित केले.
माझी चिऊ दीड दोन वर्षाची होती तेंव्हा काही violent म्हणजे tom and Jerry , काही जपानी कार्टून , कृष्णा, छोटा भीम वगैरे असे बघायची...कार्टून असल्याने आधी काही वाटले नाही...पण टीवी वरचा violence पाहून तीपण वस्तू फेकणे, चावणे, डोक्यात काहीतरी मारणे असले चालू झाले..काही कळेचना...मग लक्षात आलं कि हा सगळा टीव्ही चा परिणाम....मग तिला फक्त PBS किड्सचेच प्रोग्राम दाखवायला लागले..इतर मारामारी च्यानेल बंद....tom jerry नाही...nick वरचे कार्टून नाही...तिच्याबरोबर "अश मालनाले लोक वेले अश्तात, अश नाई कालायच्य " वगैरे सांगून सांगून थोडा फरक पडला...teenage मुलांना सुद्धा violence असलेले video games खेळू द्या

विश्वविजेता आनंद

लेखक नि३ यांनी मंगळवार, 11/05/2010 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
विश्वविजेतेपद कायम ठेवल्याबद्द्ल आनंद ला अनेकानेक शुभेच्छा.... ११ व्या मैच नंतर स्कोअर ५.५ - ५.५ झाला तेव्हाच शेवट्चा सामना अटीतटीचा होणार याची खात्री होती आणी झालेही तसेच एकुण ५६ व्या खेळीमधे आनंद ने हा सामना आणी विश्वविजेतेपद जिंकले. आनंद चे हे एकुण ४ थे विश्वविजेतेपद आहे(२०००,२००७,२००८,२०१०). शेवटच्या सामन्याचे विश्लेशन चतुरंग साहेबांनी करावे अशी मी त्यांना विनंती करुन माझे दोन सब्द संपवतो. :-) (भारतीय ) नि३.

आनंदचे अभिनंदन

लेखक प्रभो यांनी मंगळवार, 11/05/2010 22:34 या दिवशी प्रकाशित केले.
विश्वनाथन आनंद याचे अभिनंदन बुद्धीबळातील विश्वचषक जिंकल्याबद्दल. आनंदने Veselin Topalov ला ६.५-५.५ ने हारवून हा जषक जिंकला...हुर्रे....

खरड वहीची कवाडे बंद

लेखक सोम्यागोम्या यांनी मंगळवार, 11/05/2010 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
मला कुणाच्याच खरडवहीत लिहिता येत नाही. नवीन मालकांना हे सांगण्याचा ह्या ध्याग्याहून कुठला दुसरा मार्ग उपलब्ध नव्हता. कारण त्यांच्या खरडवहीत सुद्धा आम्हाला प्रवेश नाही. मालकांच्या सवडीनुसार ही अडचण दूर करता आली तर बर होईल व त्यानंतर हा धाग उडवलात तरी चालेल. You are not allowed to post in this guestbook. असे वाचावयास मिळते. सध्या मिपावर ह्या पेक्षा गंभीर प्रश्न सुरु आहेत याची आम्हाला कल्पना आहे जमेल तेव्हा करा. धन्यवाद.

"त्या" धाग्याबद्दल मिलिंद फाटक यांचे स्पष्टीकरण

लेखक शानबा५१२ यांनी मंगळवार, 11/05/2010 20:28 या दिवशी प्रकाशित केले.
माझा हा लेख(?) http://misalpav.com/node/12218 काही दीवसांपुर्वी तुम्ही वाचायचा त्रास घेतलात त्याबद्दल धन्यवाद........... त्यातली मध्यवर्ती भुमिका करणारे 'मिलिंद फाटक' त्या लेखात ज्यांना 'हीरो' असे संबोधले आहे ते.ह्यांनी त्यावर ही प्रतिक्रिया दीली......... "धन्यवाद,comments छान आहेत,पण एक चुक आहे.फक्त टकला म्हणून नाही तर माझ्या चेह-यावर डाग ही असतात,मी वयाने मोठाही असतो आणि मला चस्मा ही असतो." मग मी जरा आगावपणा(?) केला,आता तो आगावपणा का ते सांगतो थांबा नंतर......पहील मी काय प्रतिसाद दीला तो लिहतो....... "शतशा: आभार फाटक सर, अहो पण फाटक सर मुद्दा

"ओरडू नका... पुस्तकाची किंमत? तीन? हे घ्या..."

लेखक इन्द्र्राज पवार यांनी मंगळवार, 11/05/2010 14:20 या दिवशी प्रकाशित केले.
जीवनातील प्रत्येक वस्तूचे मोल हे पैशात करण्याची जी प्रवृत्ती माणसाच्या मनी वसत असते तिला अनेक कंगोरे असतात; त्यापैकी एक म्हणजे त्याची बौद्धिक कमजोरता. आपण पैसे फेकले म्हणजे झाले, ती वस्तू काय होती, कशी होती, जिची आहे/होती त्याच्या मनात त्या वस्तूबद्दल काय कोमल हळव्या भावना आहेत, त्याने ती वस्तू कशा प्रकारे ती पैदा केली होती, कशी जपली होती, या व अन्य बाबींचे अजिबात सोयरसुतक अशा गुर्मीत वाढलेल्या इसमाच्या गावी नसते. अशा प्रसंगी "हतबलता" म्हणजे नेमकी कोणत्या प्रकारची "डिश" आहे हे उमगते आणि संबंधित व्यक्ती खिन्नपणे समोरच्या घडामोडीकडे पाहत राहते.

राष्ट्रीय विज्ञान-तंत्रज्ञान दिनानिमित्त... वरुण यंत्र - तंत्राचा जाहीर निषेध

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 11/05/2010 13:59 या दिवशी प्रकाशित केले.
राष्ट्रीय विज्ञान-तंत्रज्ञान दिनानिमित्त... वरुण यंत्र - यज्ञ तंत्राचा जाहीर निषेध मिठाच्या आहूतींनी वरुण देवरायाला आळवण्याच्या हास्यास्पद प्रकाराला प्रतिबंध करावा.
आज (दि ११ मे २०१०) राष्ट्रीय विज्ञान-तंत्रज्ञान दिनानिमित्त दै. सकाळ पेपरमधे कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी वरुण यंत्राचा वापर हा लेख पान १ व११ वाचून...
मित्र हो, ही आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाची क्रूर चेष्टा तर नाहीना असे विचारावेसे वाटू लागले. बिरबल-अकबराच्या गोष्टीतील 'खिचडी पकाने के लिए' अती दूर ठेवलेली चूल काही कामाची नाही.