Skip to main content

इवलेसे रोप लावियले द्वारी...

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 18/05/2010 13:38 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मायबाप मिपाकरहो, 'इवलेसे रोप लावियले दारी, तयाचा वेलू गेला गगनावरी...' हे असं झालंय बघा मिसळपावचं. मला आठवतंय, तीन वर्षापूर्वी मी आणि नीलकांतने या संकेतस्थळाच्या उभारणीस प्रारंभ केला. तेव्हा आम्ही दोघे आणि आमचे काही हितचिंतक एवढेच लोक होतो. नीलकांत तेव्हा उमेदवारीच्या दिवसांत होता. स्वतःचा संगणकही नाही अशी त्याची अवस्था. त्या काळात या मुलाने अक्षरशः नेट कॅफेत बसून या संस्थळाच्या उभारणीचे काम केले. यशस्विरीत्या संस्थळ चालू झाले. 'लोग मिलते गये कांरवा बनता गया' अशी मिपाची वाढ उत्तरोत्तर होत गेली.

अंगाई

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 18/05/2010 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा {जगातल्या सगळ्या आया आणि त्यांच्या लेकरांची माफी मागून} अलिकडे निंबोणीचे झाड राहिलेच नाही चंद्र वेडा मोबाइलच्या टॉवरमागे झोपी जाई! गाय पदपथावर, चिमणीला घरटे नाही परस ना वेली, कुठे झोपतील जाई-जुई? शाकीरा, मॅडोना, जॅक्सन यांनी गिळली अंगाई! देवकी, यशोदा नाही, आई हवी पैसेवाली हट्ट पुरविता तिची झोळी रिकामीही झाली! नको रडगाणे, हवी जाहिरातीमधली आई!

सॅलड

लेखक राधा१ यांनी मंगळवार, 18/05/2010 09:09 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या उन्हाळा आहे. त्यामुळे थोड समर सॅलड कराव अस सकाळी माझ्या मनात आल त्याची हि रेसिपी. माझ्याकडे कॅमरा नाही :( त्यामुळे फक्त रेसिपी देत आहे. या सॅलडच नाव मला माहित नाही कारण सर्व साहित्य घरी होत म्हणुन प्रयोग केला. दुपारी १ मोठा बॉलभर खाल्ल वर थंड ताक प्यायल की झाला तुमच जेवण. साहित्यः कोबी: श्रेडेड १ वाटी लिची: ३/४ सोलुन चिरुन जामः २ बारिक चिरुन टोमॅटो: २ बिया काढुन व चिरुन कोथिंबीर : बारिक चिरलेली काळं मिठ, मिक्स हर्ब्स (पिझ्झा बरोबर येतात ते मी वापरते) चवीनुसार सर्व साहित्य एकत्र करावे व फ्रिजमध्ये थंड करुन वाढावे.

परसगावचा हा अंदाज

लेखक केशवसुमार यांनी मंगळवार, 18/05/2010 01:47 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मिपाच्या हॉटेलात काय खावे आणि काय नाको यावर जंग्गी चर्चा चालू आहे त्याला प्रतिसाद घ्यावा या विचारात होतो तितक्यात शरदिनीतै ची अतिवससुंदर कविता वाचनात आली पोटी ऐकून धुडूम्म गाज परसगावचा हा अंदाज पोरासोरा सवालआम्हा काय हदडले ओ मामा गोलाबारी सुसूत्र ताडन हर बारीला दारूण धावन शोषण भीषण पोषण बेसन गाडीवरचे चटपट ग्रासन जहाल काढा पत्थरपाला ढोसून जिव्हा कडू जहाला तोंडाला घालून या खाडा गप्पगुमाने घरी पडा

जावा तिकडे

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 17/05/2010 23:58 या दिवशी प्रकाशित केले.
जावा तिकडे उं.. जावा तिकडे मी नाही येत, तुम्ही ना गडे सोडा मला आता, जवळ कशाला ओढता तुम्ही गडे ||धृ|| शौकिन तुम्ही हे आसलं, नाही म्हणत नाही कधी हौस जीवाची करता, सोडत नाही एकही संधी अंहं...
काव्यरस

(खांदे दुखले!!!!)

लेखक मस्त कलंदर यांनी सोमवार, 17/05/2010 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
थकलेल्या जीवावर ओझ्यांची लादणी विसाव्यासाठी आतुरलेले सारे शरीर अन् कांती आयुष्यभर बहिणींच्या उचलुनी पिशव्या खांदे दुखले...||१|| आठवड्यांच्या बाजारातून विक्रेत्यांची दाटी आणि म्हणुनी "हे घ्या ताई" लागतात ते पाठी आता संपेल, झाला शेवट, वेडी आशा खोटी तोवर पाह्ती आणखी दुकाने, या पुन्हा उचकण्यासाठी आयुष्यभर बहिणींच्या उचलुनी पिशव्या खांदे दुखले...||२|| व्हावी खरेदी.. चुटकीसरशी!!!
काव्यरस

काही ओल्या आठवणी...

लेखक येडाखुळा यांनी सोमवार, 17/05/2010 23:11 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार...मिपावरचं पहिलंच लेखन... संभाळून घ्या... सध्या उन्हाळा असह्य झाला आहे. आणि पावसाळ्याची आपण सगळे आतुरतेने वाट पाहत आहोत. मला भटकंतीची आवड असल्याने सध्या मोठी पंचाइत झाली आहे..कुठेही फिरायला जाता येत नाही. सगळं शुष्क वातावरण. जुन्या ट्रेक्स च्या आठवणी मनात पुन्हा पुन्हा येत आहेत आणि उन्हाळा संपल्यावर कधी एकदा बाहेर पडतोय असं झालंय.

पोरी पदर घे उन लागलं

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 17/05/2010 23:11 या दिवशी प्रकाशित केले.
पोरी पदर घे उन लागलं चाल: येथे ऐका आगं पोरीsss पदर घे ग उन लागलं गssss रंग काळल गss आता ग पोरी पदर घे उन लागलं आता ग पोरी पदर घे ग उन लागलं उन लागलं ग रंग काळल पोरी पदर घे उन लागलं आता ग पोरी पदर घे ग उन लागलं बाहेर पडती तू गं दुपारमधनं वेगी चाल रस्ता सारा पायाखालनं उन आहे जाळ आसं चैत्रातलं पोरी पदर घे ग उन लागलं आता ग पोरी पदर घे उन लागलं माती उडतीया आशी गं वार्‍यावर डोळा जाईल धुळ ss अन होईल येळ वाट पाहायची आता उगा किती काळ आता तरी सांग सारं मनातलं ग पोरी पदर घे ग उन लागलं आता ग
काव्यरस