बाजार मांडियेला....!
''माझा मुलगा ना, आय.आय.टी. करतोय. " कुठे ना कुठे, कधी ना कधी तरी हे वाक्य तुम्ही ऐकले असेलच. कारण बारावी विज्ञान शाखेतील मुलांपैकी निम्मी मुले आज ''आयआयटी करत आहेत.'' ''आयआयटी'' त प्रवेश मिळविण्यासाठी अभ्यास करणे याचा शॉर्ट फॉर्म म्हणजे आय अय टी करणे .
आयआयटी ,भारतातली सर्वोत्तम अभियांत्रिकी शिक्षण संस्था, या संस्थेतून बाहेर पडणारा विद्यार्थी हा सर्वोत्कृष्टच असतो, असायचा... त्यामुळे तिथे जाण्यासाठी प्रयत्न तर सगळे करायचे. पण, त्याचा इतका बाऊ होत नव्हता. पण, साधारणतः २१ व्या शतकाच्या सुरवातीपासून सारेच बदलत गेले.
मिसळपाव