Skip to main content

कळालं तेव्हा...

लेखक मराठमोळा यांनी शुक्रवार, 28/05/2010 01:10 या दिवशी प्रकाशित केले.
गुलाबाला पाणी घातलं तेव्हा कळालं गुलाब तर केव्हाच जळुन गेलेला आता नेहमीच हसायचं असं ठरवलं तेव्हा कळालं माझं हसणंच रुसुन निघुन गेलेलं मित्राची माफी मागायची ठरवलं तेव्हा कळालं तो तर या जगातुनच निघुन गेलेला जिच्यासाठी सगळं सोडायचं ठरवलं तेव्हा कळालं तीच मला सोडुन निघुन गेलेली मला जपणारे कोण, समजलं तेव्हा कळालं प्रेमाचे दोन शब्द बोलणारे आयुष्यातुन निघुन गेलेले आता तरी रडावं असं ठरवलं तेव्हा कळालं अश्रु सुद्धा माझ्याशी रुसुन बसलेले शेवटचा पर्याय म्हणुन मरायचं ठरवलं तेव्हा कळालं मृत्युदेवी माझ्याकडे पाठ फिरवुन हसत चाललेली डिस्क्लेमरः (गैरसमज नकोत म्हणुन): कवितेतुन एवढच सांगण्याचा उद

घरोघरी तीच………..

लेखक निरन्जन वहालेकर यांनी गुरुवार, 27/05/2010 13:53 या दिवशी प्रकाशित केले.
सगळ्याच्याच घरोघरी घडणारे नेहमीचे प्रसंग ! फक्त शब्दांत व्यक्त केलेत ! अश्या लिखाणाचा पहिलाच प्रयत्न. कदाचित रटाळहि वाटेल. तरीही लिहिण्याचे धारिष्ट केले घरोघरी तीच……….. मी ऑफिसला निघालेलो. आधीच उशीर झालेला त्यामुळे मी गडबडीत. ती बाल्कनीत उभी पण माझ्या डोक्यांत फक्त ऑफिस.आणि ऑफिस.. मी गाडीला किक मारतो अन घाईने निघून पण जातो. ऑफिसांत आल्याआल्या तिचा फोन "जाताना म्याझ्याकडे पहिले पण नाही मी आपली टाटा करीत बसली वेड्यासारखी ! आजकाल तुझे प्रेम कोरडे झाले आहे माझ्यावरचे ” . ती मला लाडात विचारते " आज काय आहे ? " " कुठे काय बुवा ! दारारोजचेच रुटीन आणि काय असणार !

पोवाडा मर्द मावळ्याचा

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 27/05/2010 09:55 या दिवशी प्रकाशित केले.
पोवाडा मर्द मावळ्याचा खण खण खणाण खण खण खण खण खण खणाण खणाणखण वाजे तलवार शिवाजीचा अवतरला अवतार शत्रूंना दिले उत्तर बाणेदार साथ दिली मावळ्यांनी भरपूर अशा राजा शिवाजीस करूनी नमन शाहिर सचिन बोरसे करतो पोवाडा मर्द मावळ्याचा जीर हा जी जी जी जी जी ... अनेक युद्धे शिवाजी राजांनी खेळीले अनेक किल्ले राजांनी जिंकीले अनेक शत्रू त्यांनी मारीले मराठी राज्य त्यांनी स्थापिले शिवाजीमहाराज छत्रपती जाहले याकारणे साथ दिली अनेकांनी तानाजी, येसाजी, बाजी, सुर्याजी अशा शुरांनी अहा ... { गद्य : यवनी सत्येच्या विरूद्ध लढाया करून शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात मराठी राज्य स्थापन केले.
काव्यरस

खरच रुचिकाला न्याय मिळाला ?

लेखक भाग्येश यांनी गुरुवार, 27/05/2010 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
रुचिका गिऱ्होत्रा प्रकरण हे सर्वश्रुत आणि सर्वज्ञात आहे. रुचिका गिऱ्होत्राचा विनयभंग करून नंतर तिला आत्महत्येला प्रवृत्त करणारे हरयाणाचे माजी पोलीस महासंचालक एस. पी. एस. राठोड याला दिड वर्षाची शिक्षा झाली परंतु या प्रकरणात त्याला फक्‍त विनयभंग केल्या प्रकरणीच शिक्षा झाली आहे. तिला आत्महत्येला प्रवृत्त करण्या प्रकरणात एस. पी. एस. राठोडला शिक्षा होणे गरजेचे आहे, असे मला वाटते. खटल्याचा सारांश : हे प्रकरण घडलं तेव्हा रुचिका होती १४ वर्षांची आणि आराधना १३. दोघी शेजारणी आणि मैत्रिणी. रुचिकाला आई नसल्याने आराधनाची आई, मधू यांचा तिच्यावर खास जीव. दोघी मैत्रिणी टेनिस खेळायच्या.

कोकणा मधिल नविन रस्ते

लेखक केदार बर्वे यांनी गुरुवार, 27/05/2010 09:03 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रानो/मैत्रीणीनो, नुकताच माझ्या एका मित्राच्या लग्ना मुळे रत्नागिरी येथे जाण्याचा योग आला, त्या निमित्ताने गणपतिपुळे येथे जाण्याचा योग आला, नुकत्याच झालेल्या सागरी रस्त्याने गणपतिपुळे हे ठिकाण आरे वारे मार्गे फक्त १५ कि.मी वर आहे. अनेक ठिकाणी असे खाडी वर पुल झाल्या मुळे कोकणातील अनेक ठीकाणे जवळ आली आहेत, आपल्याला सुधा असे काही माहित असल्यास लिहा.

मॅकमामा मॅकमामा गेलास का ?

लेखक अडगळ यांनी गुरुवार, 27/05/2010 08:08 या दिवशी प्रकाशित केले.
महावस्त्राला आम्ही पण एक चिंधी जोडावी म्हणतो. मॅकमामा मॅकमामा गेलास का ? "म्हातारा साधु" इतका प्यालास का ? गावाला मामी बघ काय सांगी , मामाचा भाचा आत्रंगी मामाच्या वाड्यात येऊन जा उरलेली चपटी घेऊन जा चपटीत पडली माशी , अडगळ घाली काशी
काव्यरस

मॅकमामा

लेखक सन्जोप राव यांनी गुरुवार, 27/05/2010 06:47 या दिवशी प्रकाशित केले.
अखेरीस मॅकमामा गेला. तसे बरेच दिवस आजारीच होता म्हणा! सुटला बिचारा! मॅकमामाला जग दुसर्‍याच नावानं ओळखायचं, पण माझ्यासाठी तो मॅकमामाच. त्याच्या गालफडावर खूप आधी थोडसं मास होतं तेंव्हापासून ते तीसेक वर्षं खप्पड झालेल्या गालफडांवर दाढी वाढवून ती लपवण्याच्या त्याच्या प्रयत्नांतून ते अखेरीस लिव्हरला सूज आल्यानं पुन्हा त्याची गालफडं पुन्हा पुरीसारखी टम्म झाली तोपर्यंत माझ्या दृष्टीने तो कायम मॅकमामाच होता. 'मामा मोठा तालेवार, रेशीम घेईल हजार वार' या न्यायाने त्याने कधी मला आणि त्याच्या इतर भाच्यांनाही लंगोटीचा तुकडाही दिला नाही. पण तरी मॅकमामा तो मॅकमामाच.