Skip to main content

बिती ना बितायी रैना... वाह तात्या!

लेखक संजय अभ्यंकर यांनी गुरुवार, 10/06/2010 23:34 या दिवशी प्रकाशित केले.
वाह तात्या! संगीतातले अल्टिमेट काय असेल ते सारे या गाण्यात आहे. जया, हरीभाई, लता, भूपेंद्र आणी तो आर. डी.! ईश्वराने या सार्‍यांना या गाण्या साठी जवळ आणले!

डेटाबेसमध्ये काहीतरी गडबड

लेखक धनंजय यांनी गुरुवार, 10/06/2010 21:28 या दिवशी प्रकाशित केले.
संकेतस्थळाच्या डेटाबेसमध्ये काहीतरी गडबड झालेली दिसते. माझ्याच कित्येक लेखांच्या ठिकाणी जायचा प्रयत्न करता "प्रवेश प्रतिबंधित" असा संदेश येत आहे. (अन्य सदस्यांचेही गेल्या महिन्यातले लेख दिसत नाहीत.)

आपलं कोण मेलं ?

लेखक जीएस यांनी गुरुवार, 10/06/2010 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
भोपाळचे गुन्हेगार सुटले ! बर मग ? पुढे ? मस्त फिफा वर्ल्ड कप सुरू होत आहे. हे कुठल कधीपर्यंत घेउन बसायच ? मरणारे वीस हजार कधीच मेले. यातना भोगणारेही बरेचसे मरून गेले असतील एव्हाना. मग आता काय उगाच ? ज्यांच्यावर खटला भरला ते सुटले, ज्यांच्यावर भरलाच नाही त्यांचे काय ? योग्य देखभाल न करता घातक रसायनांचा साठा करणारे कंपनी व्यवस्थापन हे गुन्हेगार क्रमांक एक. अशा कारखान्यांची तपासणी करायला सरकारचे अनेक विभाग असतात, ती तपासणी न करताच पैसे खाऊन प्रमाणपत्र देणे हेच चालत असते सर्रास सगळीकडे. तसे ज्यांनी दिले ते गुन्हेगार क्रमांक दोन. पण आता खालची बातमी बघा...

कातरवेळ

लेखक दत्ता काळे यांनी गुरुवार, 10/06/2010 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
पडवीत सांजअंधारी कवडसा मनाचा श्वास तुळशीच्या पणतीभवती मिणमिणतो मंद प्रकाश तु काय अवेळी येशी भासांत पैंजणी घुमती विटलेल्या उबेसाठी भरजरी शाल एकांती ? डोळ्यांच्या काठावरती तरळते तुझे बघ नांव पण हाय, नदीच्या काठी डोंबांचा अवघा गांव लसलसत्या काळोखात क्षीण जीव एकटा बसला विझणार्‍या टेंभ्यावरती वाघुळ करीतसे हल्ला
काव्यरस

दिसू लागले स्पष्ट जसे हे

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 10/06/2010 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा चित्त यांची नित्तांत सुंदर गझल दिसू लागले स्पष्ट जेवढे आणि मिपावरच्या गेल्या काही दिवसातील घटना दिसू लागले स्पष्ट जसे हे पैसे सगळे धूसर झाले सर्व निवासी परदेशी मग एक एक दृग्गोचर झाले चुकली त्याची वाट म्हणूनच कमावलेले नाव गमवले तोवर होता उशीर झाला आणिक मग हस्तांतर झाले संपादक झाल्यावर शिकला विनायास प्रतिसाद खरडणे अधी बरा तो लेखक होता, त्याचे माकड नंतर झाले वाचन करता-करता इतका लख्ख देखणा प्रकाश फुटला शरदिनितैंची पाटी फुटली अन् त्यांचे भडकमकर झाले पवार थत्ते धाग्यामध्ये इतिहासाचा चोथा कुटला जितके जितके वादळ उठले शांत कुठे सावरक

प्यार हुआ इकरार हुआ...

लेखक अवलिया यांनी गुरुवार, 10/06/2010 14:56 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी अचानक रेडीओवर म्हणा किंवा येता जाता कुठे अवचित काही जुनी हिंदी गाणी अचानक कानावर पडतात. सुमधुर संगीत आणि तितकेच अर्थवाही शब्द यांचा सुंदर मिलाफ होतो. कधी कधी एखादे गाणे आपल्यावरच लिहिले आहे असाच भास होतो. काही गाणी मनाला आनंद देतात, दिलासा देतात. जगण्यासाठी कारण देतात. रागदारी, सा रे ग म यातलं काही मला कळत नाही. उगाच लै भारी असा भाव खाण्यासाठी एकुलता एक कळणारा राग पन्नास ठिकाणी लिहुन भास का मारायचा? नाही कळत म्हणजे नाही कळत. सगळ्याच गोष्टी आपल्याला कळल्याच पाहिजेत असे जरुरी नाही. फुलाचा वास येतो, अत्तराचा वास मोहवितो. बास.