Skip to main content

आपलं कोण मेलं ?

लेखक जीएस
Published on गुरुवार, 10/06/2010
भोपाळचे गुन्हेगार सुटले ! बर मग ? पुढे ? मस्त फिफा वर्ल्ड कप सुरू होत आहे. हे कुठल कधीपर्यंत घेउन बसायच ? मरणारे वीस हजार कधीच मेले. यातना भोगणारेही बरेचसे मरून गेले असतील एव्हाना. मग आता काय उगाच ? ज्यांच्यावर खटला भरला ते सुटले, ज्यांच्यावर भरलाच नाही त्यांचे काय ? योग्य देखभाल न करता घातक रसायनांचा साठा करणारे कंपनी व्यवस्थापन हे गुन्हेगार क्रमांक एक. अशा कारखान्यांची तपासणी करायला सरकारचे अनेक विभाग असतात, ती तपासणी न करताच पैसे खाऊन प्रमाणपत्र देणे हेच चालत असते सर्रास सगळीकडे. तसे ज्यांनी दिले ते गुन्हेगार क्रमांक दोन. पण आता खालची बातमी बघा... अँडरसनच्या अटकेची मागणी होऊ शकते हे लक्षात घेऊन तेंव्हा त्याला भोपाळहून ताबडतोब दिल्लीला नेऊन अमेरिकेला पाठवले गेले. २०,००० बळींना जबाबदार अँडरसन भोपाळहून सरकारी विमानाने गेला, विमान तत्कालीन मुख्यमंत्री अर्जुन सिंग यांच्या आदेशावरून दिले गेले. काय कारवाई होणार आता अर्जुन सिंगवर? अर्जुन सिंग तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींकडे बोट दाखवू शकत असतील तर नक्कीच काहीच कारवाई होणार नाही. प्रकरण दाबले जाईल.. http://news.rediff.com/report/2010/jun/10/got-a-call-from-cms-office-to-... ----- दाउदने तर भारताविरुद्ध युद्ध पुकारले आहे. १९९३ च्या मुंबई बाँबस्फोटानंतर केंद्र सरकारने हात धुवून दाउदच्या मागे लागयचे ठरवले होते. व्होरा कमिटी नेमली होती दाउदची पाळेमुळे खणण्यासाठी. भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सचा व्होरा कमिटीला दिलेला अहवाल सांगतो की शरद पवार, सलिम झकेरिया आणि जावेद खान हे भारतातले प्रमुख लागेबांधे आहेत दाउदचे. त्यांचे एकमेकांशी आर्थिक व्यवहार, स्वतःच्या सरकारी विमानातून दाउदच्या माणसांची शरद पवारांनी केलेली वाहतूक, मुंबईत दंगल उसळताच दाउदच्या आईला चोवीस तासात पासपोर्ट मिळवून देउन तिची केलेली पाठवणी... सगळे अगदी सविस्तर होते त्यात. केंद्र सरकारने आपल्याच लोकांवर उलटेय म्हटल्यावर दाबला रिपोर्ट, पण आउटलूकने फोडला होता तेंव्हा तो रिपोर्ट. महाराष्ट्रात मोठा गदारोळ झाला, पुढे काय झाले.... ? पण पुढे काय ? जनतेची स्मरणशक्ती तर अगदी तोकडी. आजही हा मनुष्य समाजात उघडपणे केंद्रिय मंत्री म्हणून फिरतो आहे. सगळच मॅनेज करण्याची ताकद आज आहे. ----- अशा किती केसेस दाखवायच्या ? बघत रहायच्या ? लोकप्रतिनिधी, नोकरशाही आणि न्यापालिका हे आपण तीन स्तंभ म्हणतो लोकशाहीचे, पण या सगळ्यांनीच संगनमत करून दिवसरात्र फकत देशाचे लचके तोडत रहायचे म्हटल्यावर काय असणार आहे आपले भवितव्य? या तिघांपासून देशाला वाचवण्याचं काम कोण करणार ? की आपल अजून कोणीच मेलं नाही म्हणून आपण गप्प बसायच आहे ? तोपर्यंत थांबायच आहे ??? जरूर थांबूया.. तो सुदिन लवकरच येईल यात मला तरी काही शंका दिसत नाही. मला मार्टिन निमोलर या ख्रिस्ती धर्मोपदेशकाचे, नाझींना अटकाव करण्यासंदर्भातल्या जर्मन सुशिक्षितांमधल्या उदासीनतेबद्दलचे वक्तव्य आठवते THEY CAME FIRST for the Communists, and I didn't speak up because I wasn't a Communist. THEN THEY CAME for the trade unionists, and I didn't speak up because I wasn't a trade unionist. THEN THEY CAME for the Jews, and I didn't speak up because I wasn't a Jew. THEN THEY CAME for me and by that time no one was left to speak up
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 3842
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

विचार करायला लावणारा लेख. त्या अहवालाची प्रत / दुवा मिळू शकेल का? बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

त्या अहवालाची प्रत / दुवा मिळू शकेल का? हेच विचारतो... मदनबाण..... "Intelligence is what you use when you don't know what to do." Jean Piaget

In reply to by बिपिन कार्यकर्ते

http://mahendra-agarwalonline.20m.com/PR_VohraCommitteeReport.htm हा एक दुवा आहे. येथे अगदी त्रोटक असा सारांश आहे या रिपोर्टचा. त्याच्या सत्यासत्यतेविषयी इतकीच खात्री देऊ शकतो की, हा इतकाच अहवाल माझ्याकडे पूर्वी होता. त्या आठवणीनुसार हा सारांश बरोबर आहे. हा अहवाल मुळातच या सारांशाइतकाच आहे अशी माझी माहिती आहे. बाकीची भरती आहे ती निवेदने, तक्रारी वगैरेंची. त्याविषयी तपशिलात या समितीने भाष्य केल्याचे केवळ चर्चेत ऐकले आहे. हा अहवाल फुटणार, फुटणार असे अनेकदा झाले. पण प्रत्यक्ष तो आणखीनच गुलदस्तात गेला असे दिसते. वर जीएस यांनी राजकीय संबंधांविषयी या अहवालात काही मजकूर असल्याचे लिहिले आहे. तशी चर्चा १९९४ पासून ऐकतोय. अहवालातील ती पाने पाहण्याचा माझा आणि माझ्या संबंधातील अनेकांचा प्रयत्न अद्याप फलद्रुप झालेला नाही हे मात्र नोंदवले पाहिजे. खुद्द 'आऊटलुक'लाही नंतर ते आरोप शाबीत करण्याइतपत वृतांकन करता आलेले नाही हीही वस्तुस्थिती आहे.

अन्याय करणार्‍याइतकाच , अन्याय सहन करणारा दोषी असतो. शेवटची कविता खूप आवडली. अमेरीकेत एकटे दुकटे लोक ट्राफीक सिग्नल्वर "स्टॉप द वॉर", "ब्रिंग बॅक ट्रूप्स" वगैरे फलक घेऊन निदर्शनं करताना दिसतात. कार वर बंपर स्टिकर्स लावलेले असतात "ब्रिंग बॅक ट्रूप्स" म्हणून, सिग्नेचर कँपेन्स घेतली जातात. भारतात तसं काही घडत नाही, आवाज उठत नाही. संघटन तर सोडाच. पाहीलेला अपवाद - तरी मला एक कौतुकास्पद वाटतं सुधीर काळे निदान त्यांच्या सहीमधे राष्ट्रपतींना पत्र लिहायची साइट ठेवतात , लिहीतात. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

In reply to by शुचि

अन्याय करणार्‍याइतकाच , अन्याय सहन करणारा दोषी असतो टाळ्याखेचक आणि तितकेच फसवे, खोटे वाक्य. अमेरीकेत एकटे दुकटे लोक ट्राफीक सिग्नल्वर "स्टॉप द वॉर", "ब्रिंग बॅक ट्रूप्स" वगैरे फलक घेऊन निदर्शनं करताना दिसतात. कार वर बंपर स्टिकर्स लावलेले असतात "ब्रिंग बॅक ट्रूप्स" म्हणून, सिग्नेचर कँपेन्स घेतली जातात. भारतात तसं काही घडत नाही, आवाज उठत नाही. संघटन तर सोडाच. त्याचा काहीही (दखलपात्र) उपयोग नाही. दर्या मे खसखस. सहीमधे राष्ट्रपतींना पत्र लिहायची साइट ठेवतात , लिहीतात. हास्यास्पद.

In reply to by शुचि

शुचि मॅडम, आपल म्हणन पटल........आणि ते नेहमीच पटण्यासारख असत,प्रत्येक लेखावरच!! तेव्हा आपण आपल्या विरोधात जाणारे प्रतिसाद दुर्लक्षित करावेत अस सांगावस वाटत.

अमेरीकेत एकटे दुकटे लोक ट्राफीक सिग्नल्वर "स्टॉप द वॉर", "ब्रिंग बॅक ट्रूप्स" वगैरे फलक घेऊन निदर्शनं करताना दिसतात. कारण अमेरिका आता इराण व उत्तर कोरियात सैन्य कारवाई करण्याच्या विचारात आहे असे वाचले आहे.तसे त्याचे सैन्य अजुनही इराक व अफगाणिस्तानातुन परत गेलेले नाही. सिग्नल वर बहुधा घटस्फोटीत लोक ओव्हरटाईम करत असावेत. (|: वेताळ

विचार करायला लावणारा लेख.. मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

हम्म...बोलण्यासारखे काहिच उरले नाही.. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

GS सर हे सर्व थांबण्यासाठी/कमी करण्यासाठी/नियंत्रणात आणण्यासाठी आपल्या द्रुष्टीकोनातुन काय सर्वात प्रभावी ठरेल अस आपल्याला वाटत?? आपले विचार खुप मिळते जुळते वाटले म्हणून विचारल........आपल उत्तर वाचायला आवडेल सर.

कोणताही ठोस पुरावा वगैरे न देता निव्वळ आरोपांच्या फैरी झाडणारा एक टाळ्याखाऊ आणि पोकळ लेख. जनतेची स्मरणशक्ती तोकडी आहे हे ठीक पण विरोधी पक्षदेखिल गुळणी धरून का बसले आहेत? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

शरद पवार भक्त दिसता. सकाळ मध्ये काम करता काय? विरोधी पक्षदेखिल गुळणी धरून का बसले आहेत? त्यांचेही हातपाय कुठेतरी अडकले असण्याची शक्यता आहे.

In reply to by रामपुरी

त्यांचेही हातपाय कुठेतरी अडकले असण्याची शक्यता आहे. हा हा हा!!!! मग त्यांचीही नावे येउद्यात की!! ;) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by रामपुरी

विरोधी पक्षदेखिल गुळणी धरून का बसले आहेत? त्यांचेही हातपाय कुठेतरी अडकले असण्याची शक्यता आहे. >> काहीतरीच वाक्य. त्या कारखान्यातील सुरक्षा व्यवस्थेत विरोधी पक्षाचा हात असेल मला वाटत नाही. फार तर नंतर त्यांनी दुर्गटीत जनतेच्या हिताकडे पुरेसे लक्ष दिले नाही असे म्हणता येईल. महाराष्ट्रात, काही मोठे झाले कि साहेबांची खेळी आहे, असे म्हणण्याची पध्दत पडली आहे. ----- ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.

http://www.esakal.com/esakal/20100611/5082583515205758806.htm काही काळजी नसावी. ह्या नवीन निकषाप्रमाणे महागाई कमी होत आहे. सर्व काही सुरळीत होईल. बाई आणि त्यांचा पंजा आहे सगळं व्यवस्थित करायला. तसेच, मीपा वरीलतर काही सदस्यांच्या मते भारताने खूप नेत्र दीपक प्रगती केली आहे. (आता नेत्रदीपक म्हणजे काय ह्याचा मला जरा शोध घायचा आहे). आणि काही अडण्याच्या मते तर राजकारण्यांना बद्दल काही बोलणे म्हणजे एक fashion आहे. (त्यांना खूप राग येतो तेव्हा जरा जपून) ह्या मार्गानें (आंधळी कोशंबीर खेळत) असेच पुढे जात राहिलो तर नक्कीच २०२५ पर्यंत भारत महा(ग)सत्ता होईल हे नक्की. भोपाल पेक्षा अणु प्रकल्प मध्ये किती तरी शेकडो पटीने पैसे गुंतले गेलेले आहेत आणि धोका तर हजार पटीने जास्त आहे.

In reply to by Manoj Katwe

* संपादित * श्री अडाणि, कृपया आपले म्हणणे संयमाने मांडावे. - अफाट जगातील एक अडाणि.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद, व्होरा अहवाल संसदेत सादर झाला होता पण त्यात हा मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सचा अहवाल दाबला गेला अस आउटलूकच म्हणणं होतं. गुगलवर शोधल्यावर मला आउटलुकमधल्या या लिंक सापडल्या. http://www.outlookindia.com/article.aspx?200790 http://www.outlookindia.com/article.aspx?20079३ अर्जुन सिंग वा पवार ही फक्त उदाहरणं झाली. आपली लोकशाही राज्ययंत्रणा पूर्ण सडली आहे. ही यंत्रणा ज्यांच्या ताब्यात आहे तेच आपले आणि या देशाचे सगळ्यात मोठे शत्रू आहेत. त्यामुळे आम्ही मतदान केले, कमीत कमी वाईट उमेदवाराला वा दुसर्‍या पक्षाला मत दिले म्हणजे आमची जबाबदारी संपली असे स्वतःलाच फसवून उपयोग नाही. ( एनरॉन अरबी समुद्रात बुडवू, दाऊदला पकडू म्हणत भाजप सेना सत्तेवर आले. त्यांनी काय केले ?) हे सगळे कधी तरी लवकरच आपल्याही मुळावर येणार आहे, तसे येऊ नये या स्वार्थी हेतूने का होईना पण भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी याविरुद्ध आपले आपल्यालाच लढावे लागणार आहे आपापला थोडा वेळ आणि आपलाच पैसा खर्च करून. माहितीचा अधिकार्-प्रसार माध्यमे-इंटरनेट-पीआयएल अशी काही साखळी वापरून एकदा नव्हे - दररोज. पण हे करायची आपली तयारी आहे का ? याचा मी विचार करतो आहे.

In reply to by जीएस

हम्म हम्म.................विचार करतोय.........
आपलाच पैसा खर्च करून.
म्हण्जे आपल्याला सुध्दा गैर व्यवहार करावे लागतील पैसा कमवायला .कारण घाम गाळून आलेल्या पैशात हे सर्व नाही करता येणार! पीआयएल??? म्हण्जी??? Pen Ink Lekhak का???
पण हे करायची आपली तयारी आहे का ? याचा मी विचार करतो आहे.
तुम्ही 'कुणाची तयारी आहे का?' असा विचार करुन काय होणार 'तुमची तयारी आहे का?' अस विचारा.............आपण स्वःता विचार करु नका GS सर!! हो मी तयार आहे........बोला कुठे बसुन बोलुया.......बाकी 'तसल्या' वेळी मी भाषण फार छान देतो..त्याचा आपल्या चळवळीत वापर करता येइल..........पण खर्च वाढेल!! :D

आपलं कोणीच मेलं नाही. मेलं असतं तर मायबाप सरकार कडून काही लाख रुपयांचा मोबदला मिळवण्याचा प्रयत्न केला असता.....[ठिक आहे थोडंफार कमीशन द्यावं लागलं असतं..चालायचचं..त्या सरकारी नोकरांना सुद्धा पोटं आहेत, शौक आहेत...त्या आमदारांना/खासदारांना सुद्धा तिकीट मिळवण्याचा खर्च आहे, कार्यकर्ते पोसण्याचा खर्च आहे...एकमेकांची मदत नाही केली तर माणूसकी मग कसली? जाणारा गेला..काय करणार..आजारात सुद्धा जाउ शकला असता..यात गेला..जाताना कुटूंबाचं थोडं भलं करून गेला...स्वर्गात आत्मा सुखात असेल]

हल्ली कशाचंच काही वाटत नाही. :) पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे Phoenix

सरकारने आपल्या 'कुटूंबनियोजन' खात्याची कार्यपध्दती बदलली आहे. जन्मावर नियंत्रण ठेवणे हे मतांखातर शक्य नसल्यामुळे लोकसंख्या मर्यादित ठेवण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे असे त्यांना वाटत असावे. आणि या कामात त्यांना अतिरेकी, नक्षलवादी यांचीही सक्रीय मदत मिळते आहे. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

भावना बोथट होताहेत हेच खरं! - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/

In reply to by प्राजु

प्राजु ताई तुझ्याशी १००% सहमत... लोकांच्या भावना खरचं बोथट झाल्या आहेत !!! मदनबाण..... "Intelligence is what you use when you don't know what to do." Jean Piaget