Skip to main content

शनी, अवलिया, निखील आणी मकी

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शनिवार, 12/06/2010 17:20 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ता काही वेळापुर्वीच एक गंमतीशीर योगायोग लक्षात आला. आज शनी, अवलिया, निखील देशपांडे आणी मस्त कलंदर ह्या सर्वांचा वाढदिवस आहेत. *देव पण काय काय दिवस दाखवणार आहे अजुन काय महिती ?* असो.. तर ह्या सर्वांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

पाऊस

लेखक अनिरुध्द यांनी शनिवार, 12/06/2010 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
(ही कवीता आधीही प्रकाशित झालेली आहे. परंतु पाऊस चालू झाला आणि ही कवीता पुन्हा टाकायचा मोह झाला.
काव्यरस

मिपा मुखपृष्ट

लेखक गणपा यांनी शनिवार, 12/06/2010 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
आताच धनंजय रावांच्या या धाग्यात काही मिपा मित्रांनी मिपाच मुखपृष्ट (फिफा विश्वचषका संबंधित) बदलल्या बद्दल खंत आणि नाराजीचा सुर लावलेला दिसला. जरी फुटबॉल चा विश्वचषक चालु असला तरी सध्या ती एकच गोष्ट महत्वाची आहे असे मला वाटत नाही . तेव्हा जर अधे मध्ये एखादा खास दिवस असला (जसे आज आपल्या सर्वांच्या लाडल्या व्यक्तिमत्वाची पुण्यतिथी आहे) तर त्या दिवसाची आठवण म्हणुन जर मिपाच्या मुख पृष्ट बदलल तर त्यात काही वावग आहे अस मला तरी वाटत नाही. हि स्पर्धा अजुन १५-२० दिवस तरी चालणार आहे.

भाईंचा आज दहावा स्मृतीदिन.. त्या 'पुल'कीत करणार्‍या दीपस्तंभास लक्ष प्रणाम

लेखक अर्धवट यांनी शनिवार, 12/06/2010 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
आज भाईंचा दहावा स्मृतीदिन.. मला कळायला लागले तेव्हापासुन मी त्यांचे लेखन वाचतोय.. प्रत्येकवेळेला अवर्णनीय आनंद तर मिळालाच पण त्याहुनही एक मौल्यवान ठेवा मिळाला, तो म्हणजे.. आयुष्याकडे बघण्याचा एक उमदा, जागृत, संवेदनशील तरीही सजग दृष्टिकोन.. दहा वर्ष झाली.. पण खरच भाई गेलेत का? ' माझ्यापुरते भाई आहेतच, ते अजुनही एखाद्या निर्णायक 'अर्जुन'क्षणी आतून साद घालतात.... जाब चिचारतात....

पावसाची कविता

लेखक दत्ता काळे यांनी शनिवार, 12/06/2010 04:29 या दिवशी प्रकाशित केले.
मोगर्‍याचं पान सांगेल भिजताना आलेली मजा टपटपणार्‍या थेंबांतून पसरणारा गारवा, मग अनामिक थरथर ताजी उब उगत असताना निथळणारा प्रत्येक थेंब अंतस्थ हालचालींना साद देतोय शिरशिरणारा गारवा हलकेच घालतोय फुंकर ओलेत्या उबेवर फुलेच वेडावून गेलीयेत.. आता....सुगंध कोण थांबवणार ?

unicorn घोडा...

लेखक अभिषेक९ यांनी शुक्रवार, 11/06/2010 23:47 या दिवशी प्रकाशित केले.
परवा औंध कडून डांगे चौकाकडे unicorn गाडीवर येत होतो. रस्ता पण साफ होता, नवीन गाडी, त्यामुळे ६०-७० च्या वेगाने मस्त गाडी चालवत होतो. पण रक्षक चौकात लाल सिग्नल आडवा आला आणि जरा हिरमोडच झाला. गाडीचे break दाबून गाडी रस्त्याच्या डाव्या बाजूला थांबवली. फारसी वर्दळ नव्हती त्यामुळे मोजून ५-१० गाड्या सिग्नलवर थांबल्या होत्या. सिग्नल मोठा असल्यामुळे मी गाडी बंद करून इकडे तिकडे बघत होतो. अचानक मागून टप टप असा आवाज आला. घोड्याच्या टापांचा आवाज असल्यासारखा वाटत होता. आणि खरच तो तोच आवाज होता. मी मागे वळून बघितले. एक पंधरा शुभ्र घोडा अगदी रुबाबदारपणे एकेक टाप टाकत येत होता.

वी आर द चॅम्पियन्स- फिफा विश्वचशक गाणी

लेखक निखिल देशपांडे यांनी शुक्रवार, 11/06/2010 21:23 या दिवशी प्रकाशित केले.
फिफा वर्ल्ड कप आता काही तासांवर येऊन ठेपला आहे. परत तोच थरार अनुभवायला आपण तयारच आहोत. आता प्रत्येक खेळाडू आपल्या देशाला जिंकवण्यासाठी कौशल्याची बाजी लावेल. कारण इथे प्रत्येक जण आलाय तो चॅम्पियन होण्यासाठीच. क्वॉलिफायर्स पार करुन आता ३२ संघ सज्ज झाले आहेत उद्यापासुन होणार्‍या लढतींसाठी. तशी, प्रत्येक वर्ल्ड कप ची एक खासियत म्हणजे त्यांचे थीम साँग्ज आणि मॅस्कॉट्स...
विशेष

विश्वचषकाचे प्रबळ दावेदार - ३ : Die Mannschaft अर्थात जर्मनी!

लेखक मेघवेडा यांनी शुक्रवार, 11/06/2010 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
Auf jeden Regen folgt auch Sonnenschein.
थोड्याफार फरकाने 'रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल' या अर्थाचं हे वाक्य! मागल्या खेपेस आपल्याच घरात इटालियन प्रसाद खाऊन, नंतर पोर्तुगालला हरवत तिसर्‍या क्रमांकावर समाधान मानणार्‍या जर्मन संघातील प्रत्येक खेळाडू, नव्हे प्रत्येक जर्मन नागरीक हेच म्हणत असावा.
विशेष

[हिंदू विवाह कायदा] उशीरा का होईना अक्क्ल आली

लेखक युयुत्सु यांनी शुक्रवार, 11/06/2010 16:05 या दिवशी प्रकाशित केले.
पुरूष मुक्ती चळवळीच्या आजवरच्या प्रयत्ननाना उशीरा का होईना फळे मिळू लागली आहेत. http://www.esakal.com/esakal/20100610/4851882883237955138.htm