Skip to main content

आंबे कसे निवडावे?

लेखक अवलिया यांनी सोमवार, 14/06/2010 15:06 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी सध्या आंब्याचा सीझन चालु आहे. बाजारात अनेक त-हेचे आंबे दिसत आहेत. काही आंबे पाट्यांमधे असतात तर काही गाड्यांवर असतात. दुकानात मांडलेले असतात तर काही रस्त्यावर. काही पिकलेले काही कच्चे. काही गोड तर काही आंबटतुरट. काही चोखायचे तर काही कापायचे. काही झडप घालुन घेण्यासारखे तर काही हळुवार कोमलतेने हाताळायचे. एक ना अनेक हजारो प्रकार. काहींना हापुस म्हणतात, तर काहींना पायरी. काही तोतापुरी तर काही केशर. काही गावठी तर काही संकरित. आकारही किती विविध असतात. काही मुठीत बसतात तर काही दोन्ही हातात पण मावत नाहीत.

(नको तेच झाले)

लेखक चेतन यांनी सोमवार, 14/06/2010 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा क्रांतीताईंची सुंदर गझल नको तेच झाले असो... विरझण घाली; असेही, तसेही जरी फोल दावे; असेही, तसेही जरा बोलता तो; विरोधात काही युसलेस बोले; असेही, तसेही किती बरळावे? मुल्य लेखनाचे माकडे टंकती; असेही, तसेही उडे लेखनही, न लावता काड्या पुरावेच देई; असेही, तसेही फुका बोलबाला स्थळपालटाचा, इनो फार झाले; असेही, तसेही कशाला निमित्ते हवी भांडण्याची? कंपुबाज सारे; असेही, तसेही काव्य कर्तनाने पडे फरक का? विडंबन पाडे; असेही, कसेही अवांतर सुचना: व्रुत्त आणी व्याकरण अर्धविराम तपासत बसु नये बसलात तरी मला काही फरक पडत नाही
काव्यरस

रणथंबोर

लेखक Dipankar यांनी सोमवार, 14/06/2010 11:31 या दिवशी प्रकाशित केले.

योगायोग

लेखक आनंद घारे यांनी सोमवार, 14/06/2010 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
योगायोग म्हणजे 'कोइन्सिडन्स' या शब्दाचा अर्थ एकाच वेळी दोन घटना घडणे एवढाच होतो. पण अशा असंख्य घटना क्षणोक्षणी घडत असतात. सगळ्यांनाच योगायोग म्हंटले तर त्याचे महत्व राहणार नाही. त्यातल्या आपल्याला महत्वाच्या वाटणार्‍या आणि परस्परसंबंध नसलेल्या दोन घटना अनपेक्षितपणे एका वेळी घडल्या तरच त्याला 'योगायोग' असे सर्वसाधारणपणे म्हंटले जाते. दोनापैकी एक जरी अनपेक्षित असली तरी कधीकधी तो योगायोग धरला जातो. सूर्य उगवला आणि सकाळ झाली याला योगायोग म्हणत नाहीत, कारण सूर्योदयाच्या वेळेलाच सकाळ असे नांव दिले आहे.

राजसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

लेखक कशिद यांनी सोमवार, 14/06/2010 09:55 या दिवशी प्रकाशित केले.
"तशीच भाषा, तशीच शैली, तोच करारी बाणा. महाराष्ट्राच्या उदयासाठी पुन्हा जन्मला राणा.. मराठ्याची कधी कुणा कलली नव्हती किंमत... महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी साहेब, तुम्हीच दाखवली हिंमत.... उठ मराठ्या, जागा हो..अशी जेव्हा साद दिली..... मन सैनिकांनी...तेव्हा सर्वप्रथम दाद दिली...... आता आम्हा मराठ्यांमध्ये दिसणार नाही घबराट....... कारण या महाराष्ट्राला लाभलेत आता "मराठी ह्रदयसम्राट" मा. राजसाहेब ठाकरे याना वाढदिवसाच्या शुभेच्छा...अगदी मनापासून..!! आणि या महाराष्ट्रसाठी आपल्याला उदंड आयुष्य लाभों..हीच आई एकवीरा चरणी प्रार्थना..!! !! मनसे जय महाराष्ट्र !!

(गाडीवरचा तो हात!)

लेखक विकास यांनी सोमवार, 14/06/2010 05:23 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या लेखाची प्रेरणा ही चतुरंगचा "पाठीवरचा तो हात" हा खर्‍या अर्थाने हृद्य अनुभव आहे. त्यावरून जरी खालील अनुभव लिहीत असलो आणि म्हणून कंसात शिर्षक दिले असले तरी, ते चतुरंगच्या लेखाचे हे कृपया विडंबन समजू नये ही विनंती. त्याच्या लेखात महाराष्ट्रातील न भूतो न भविष्यती अशा निखळ व्यक्तीमत्वाचा जसा अनुभव आहे, तसाच ह्या लेखात अजून एक व्यक्तीमत्व जे कुणाला आवड न आवडो, त्याच्या शिवाय महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होणार नाही अशा व्यक्तीचा जाता जाता अनुभव आहे. इतकेच काय ते साम्य... माझी राजकीय विषयातील आवड लहानपणापासूनची. मी साधारण सातवीत, फार तर आठवीत होतो.