Skip to main content

आंबे कसे निवडावे?

लेखक अवलिया यांनी सोमवार, 14/06/2010 15:06 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी सध्या आंब्याचा सीझन चालु आहे. बाजारात अनेक त-हेचे आंबे दिसत आहेत. काही आंबे पाट्यांमधे असतात तर काही गाड्यांवर असतात. दुकानात मांडलेले असतात तर काही रस्त्यावर. काही पिकलेले काही कच्चे. काही गोड तर काही आंबटतुरट. काही चोखायचे तर काही कापायचे. काही झडप घालुन घेण्यासारखे तर काही हळुवार कोमलतेने हाताळायचे. एक ना अनेक हजारो प्रकार. काहींना हापुस म्हणतात, तर काहींना पायरी. काही तोतापुरी तर काही केशर. काही गावठी तर काही संकरित. आकारही किती विविध असतात. काही मुठीत बसतात तर काही दोन्ही हातात पण मावत नाहीत. आंब्याचा बाजार बघतांना कळतच नाही कोणता घ्यावा ते? मंडळी सांगा बरे जरा तुमच्यापैकी कुणी जाणकार असेल तर आंबा कसा निवडावा? कोणत्या वेळी कोणता आंबा चांगला फलदायी असतो ? वगैरे वगैरे.. आपलाच (आंबाप्रेमी) नाना

वाचने 14450
प्रतिक्रिया 49

प्रतिक्रिया

पावसाळ्यात पण आजून आंबे मिळतात? मला रत्नागिरीचा कलमी हापूस खुप आवडतो..त्या आंब्याचा शेपच मला खुप आवडतो..खाण्यापेक्षा हाताळायलाही चांगलाच वाटतो.. तसे बाकी बरेच आंबे मी खाल्लेत..देवगड, वलसाड..पण रत्नागिरीपुढे सगळेच फिके वाटतात..वलसाड आंबे मुंबईत खुप प्रसिद्ध आहेत...आपल्या मराठी आंब्यापेक्षा हे गुजराती आंबेच लोकांना जास्त आवडतात असे दिसते.. अवांतर : परदेशात पाकिस्तानी आंबे पण दिसतात...पण.खुपच मोठ्ठे असतात...त्यामुळे कधी try नाही केले.. बाकी इतर देशांच्या आंब्याविषयी काही कल्पना नाही. खादाडमाऊ

In reply to by योगी९००

अजुन पाउस सुरु झालेला नाही. परंतु वळवाच्या सरी कोसळल्यामुळे आंब्याचे भाव (किंमत) कमी झालेली आहे, जी माझ्यासारख्या अल्प उत्पन्न (केवळ भारतीय रुपयांमधे, भारतीय लोकांना सेवा देवुन मिळणारे उत्पन्न) असलेल्यांना आता परवडु शकते. त्यामुळे अधिक माहितीसाठी चर्चा प्रस्ताव टाकला :) बाकी गुजराती आंब्याविषयीचे निरिक्षण "रोचक" आहे. --अवलिया

In reply to by योगी९००

..वलसाड आंबे मुंबईत खुप प्रसिद्ध आहेत...आपल्या मराठी आंब्यापेक्षा हे गुजराती आंबेच लोकांना जास्त आवडतात असे दिसते..
कोण म्हणतं असं? काहीतरीच.....

आंब्याचा आकार- हाताळता येईल एवढाच असावा. आंब्याची किंमत- आपल्या खिशाला परवडेल एवढीच असावी आंब्याची चव- चोखल्यानंतर दीर्घकाळ रेंगाळणारी आंबटगोड असावी प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

छान प्रतिसाद --अवलिया

In reply to by प्रकाश घाटपांडे

>>आंब्याचा आकार- हाताळता येईल एवढाच असावा. ऑ ? तुम्ही कोणत्या आंब्याबद्दल बोलताय ? ;) -दिलीप बिरुटे [चावट]

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हेच हेच ते असले मिडलाईफ क्रायसिस असलेले संपादक साध्या सरळ वाक्यात चावट अर्थ शोधतात आणि माझे साधे, सरळ, सज्जन, भोळे लेख आणि प्रतिसाद खाडकन उडवतात. निषेध ! --अवलिया

In reply to by अवलिया

एक्स्ट्रेमली सॉरी....! -दिलीप बिरुटे [खाली मान घालून उभा असलेला]

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

इटस ओके...! --अवलिया (संपादक दिलीपचा मित्र)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

[खाली मान घालून उभा असलेला] कोपर्‍यात की बेंचवर? ;) बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

छाण चाल्लय हो बिपिन- बिरुटेंच @@ बाकी बिपीनराव , तुमचे मित्र संपादक काय म्हणतात ? ह्या प्रकारच्या धाग्यांना कंटाळुन त्यांनी आज झाडु बरा नाही फिरवला ? !! - (अश्वत्थामा) टारझन

In reply to by टारझन

कोण रे ते संपादकांना त्रास देतंय? उडवा त्याची प्रतिक्रिया... तुम्च चलु द्या हो...आमचेच भय संपत नाही आजकाल.. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाटलच होतं हा नान्या असच म्हणणार की दोष तुमच्या नजरेत आहे. म्हणुन मगाशी स्वसंपादित केलेली प्रतिक्रिया आता परत टाकत आहे. :D नानबा आपली प्रतिभा अश्या फुटकळ काकु वर का घालवतोयस. (स्वगतः साला हा नाना कधी कधी अगदी भारी लिहुन जातो आणि मध्येच कुठे पाणी वाहवत जाते कळत नाही.) .

In reply to by गणपा

>>>वाटलच होतं हा नान्या असच म्हणणार की दोष तुमच्या नजरेत आहे. अरेच्या तुम्ही तर ज्योतिषीच झाले की... ;) >>>म्हणुन मगाशी स्वसंपादित केलेली प्रतिक्रिया आता परत टाकत आहे. Big Grin धन्यु :) >>>नानबा आपली प्रतिभा अश्या फुटकळ काकु वर का घालवतोयस. अरेच्या मग मला काही माहित नसले तर मी ते विचारायचे पण नाही का ? >>>(स्वगतः साला हा नाना कधी कधी अगदी भारी लिहुन जातो आणि मध्येच कुठे पाणी वाहवत जाते कळत नाही.) स्वगत माझ्या संगणकावर नीट दिसले नाही रे... जरा जीमेलवर पाठव काय लिहिले ते. --अवलिया

In reply to by अवलिया

हेच हेच ते असले मिडलाईफ क्रायसिस असलेले संपादक साध्या सरळ वाक्यात चावट अर्थ शोधतात आणि माझे साधे, सरळ, सज्जन, भोळे लेख आणि प्रतिसाद खाडकन उडवतात. >> श्री नाना, तुझे उडवलेली लेख आणि प्रतिक्रिया कुठे मिळतील वाचायला? तो घोड्याचा लेख वाचायचा आहे.

In reply to by II विकास II

>>>श्री नाना, तुझे उडवलेली लेख आणि प्रतिक्रिया कुठे मिळतील वाचायला? नानाचे उडवलेले लेख आणि प्रतिसाद नाना एका नव्या संकेतस्थळावर टाकणार आहे . ज्या संकेतस्थळावर संपादक नसतील, जिथे नुसत्याच काड्या काड्या करायच्या आणि नुसत्याच काड्या काड्या असलेली सदस्य नावे असतील. अशा संकेतस्थळाच्या शोधात नाना आहे अशी अशी आमची नाडीपट्टी दाखवते आहे. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

म्हणजे ३ आय डी नक्की. बाकी तुमच्या नाडीत नानाचे संकेतस्थळ कसे? ----- ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.

नाना, पावसाच्या दिवसात आंबे खाऊ नये असे म्हणतात. [हाल होतात] 'केसर’ आणि 'हापूस' रसासाठी. कापून खायचा तर 'तोतापरी' आणि 'निलम' असे माझे मत आहे. नाना, माझ्या आजोळी आजोबा आज्जी बरोबर मी गावठी शाक असलेली कैर्‍या काढायचो, जमा करायचो. त्या कैर्‍या आढीला ठेवल्या की त्या पीकलेल्या आंब्याची चव काय सांगू...! काळाबरोबर आजोबा आज्जी गेले आणि वार्‍या वावधनात मळ्यात असलेली आंब्याची झाडेही...:( -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दिलीपशेट अजुन पावसाने जोर धरला नाही म्हणुन मजा करुन घेत आहे. आजोळच्या आठवणींचा असाच एक कप्पा मनात जपुन ठेवला आहे. गेले ते दिन गेले हेच खरे... --अवलिया

.

In reply to by गणपा

..

In reply to by अवलिया

गणपाशी सहमत हा नान्याला म्हणे जर्मन भाषेत लिहून दिले होते कोणीतरी २ रुच्या नोटेवर - mangoes für das Leben. घेतले नाहीत. आता रडत असतो एका संस्थळावरुन दुसर्‍या संस्थळावर

In reply to by सहज

सहजराव , त्याच नोटेच्या मागे Saft frisch engen mangoes असेही लिहिले होते. आंबोळी

In reply to by गणपा

..

चिरुन खायला बदामी आंबे आवडतात. हापुस आणि पायरी परवडत नसल्याने कधी तरी खातो. घरी आंब्याची ४ झाडे आहेत. दरवर्षी २००० आंबे येतात. मंडळी सांगा बरे जरा तुमच्यापैकी कुणी जाणकार असेल तर आंबा कसा निवडावा? >> आपल्यला परवडणारा आंबा आणि आवडणारा घ्यावा. कोणत्या वेळी कोणता आंबा चांगला फलदायी असतो ? वगैरे वगैरे.. >> जो आंबा मुड त्रुप्त करतो तो.

लेखन नेहेमीचेच भावोत्कट. नान्याचा हातखंडा लिखाण वाचून मजा आली....स्साला... काय अस्सल लिखाण आहे. शब्द न् शब्द मोजून-मापून. बढिया. पण नाना, काहीतरी अधिक भरीव लिहावेत अशी विनंती, पांचट लिखाण तुम्हाला सहज शक्य आहे, ते तुम्ही करीत आलाच आहात. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

फार पुर्वी एक "खुले आम" नावाचा चित्रपट येऊन गेला..(http://www.imdb.com/title/tt0416890/) RD चे संगीत आणि "आंब्या"वर चित्रपट म्हणून पहायला गेलो..फार निराशा झाली..पुर्ण चित्रपटात एकही फळ दाखवले गेले नव्हते.. तेव्हापासून या फळांच्या राजावर एखादा चित्रपट यावा अशी ईछ्छा बाळगून आहे. खादाडमाऊ

In reply to by योगी९००

तेव्हापासून या फळांच्या राजावर एखादा चित्रपट यावा अशी ईछ्छा बाळगून आहे.
हापूस चित्रपट येतोय ना लवकरच. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

आरारारा रा रा त्या मराठी माती वाल्यांनी पार मातीच करुन टाकली की राव. शिणुमाची संमदी श्टोरीच सांगुन राह्यले ना भाव ते.

In reply to by योगी९००

आणी गानीबी ऐका रसाळ हापुसवानी http://haapus.erosentertainment.com/marathi/index.html आणी कोंटेस्ट बी ठेवलीय त्या हापुसवाल्यांनी -- तीबी बगा जमती का ती? http://dvdstore.erosentertainment.com/contest/qa_box.asp?ID=44&Contest=…

पण तुम्हाला आंबेच हाताळायचेच असतील तर बाजारात जा. त्यावर एकादा लेख टाका. वादळात व पावसात पडलेले आंबे पिकताना डागलतात व खाताना मध्येच एकादा मिठाचा खडा लागावा तसा खारट व आंबट लागतात. तसे तुम्ही आंबटशौकिन आहातच. :D वेताळ

In reply to by वेताळ

>>>तुम्ही आंबटशौकिन आहातच. माझ्यासारख्या सज्जन पापभीरु माणसाला नावे ठेवल्याबद्दल वेताळाचा निषेध. या अमावस्येला मांत्रिक तुला बाटलीत बंद करेल असा शाप देतो --अवलिया

In reply to by अवलिया

आंबटशौकिन ह्या शब्दाचा अर्थ ज्याला आंबट रस आवडतो,आंबटरसाचा शौक असणारा असा घ्यावा. ;) बाटली मला तरी रस नाही :D वेताळ

तोतापुरी : अगदीच तोता वाल्यांनी खावा... हापुसः राजा लोकांनी खावा, महाराजा. रायवळ/गावठी: गावची चव हवी असलेल्यांनी लोकांनी खावा... आता आंब्याच्या आकारावरुन.. तोतापुरी: भंगार हापुसः कसा गरगरीत..बघता क्षणीच चव घेऊन पहावा असा... रायवळ/गावठी: गोट्यांमधला बिर्री प्रकारची गोटी कशी असते तसाच प्रकार (वेळेला केळं) तसा हा आंबा.. बाकी हातात बसतो का नाहे हे असलं बघु नये. वाटलं की घेऊन टाकावं. संकरीत आंबा म्हटलं अगदीच एखाद्या शेतकी शास्त्रज्ञाच्या प्रयोगशाळेत गेल्या सारखं वाटतं. बाकी नाना, आंबा चोखुन खाण्यात जी मजा आहे ती कापुन खाण्यात नाही....तोंड कसं रंगलं पाहीजे. २ दिवस हाता-तोंडाचा वास नाय गेला पायजे. नंतर जमवायच्या त्या फक्त कोया...आणि त्या कोयांची फक्त लगोरी खेळायची.... (एका वेळेला पाटी पाटी पायरी हादडलेला) - वाटाड्या...

In reply to by वाटाड्या...

ज ब रा रे वाटाड्या ... खरोखर नावाला जागलास तु !!! :) --अवलिया

In reply to by वाटाड्या...

वाटाड्याषी सहमत. :D

आम्ही येथे आंबे निवडायला मदत केली होती तर लोक बोलतात की आम्ही वंगाळ बोलतो. ठिक आहे. आयडी आयडी चा परिणाम दुसरं काय? The universal symbol for diabetes मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही

स्।आंआट

नाना, आंबे निवडुन झाले की सांग खायला येउ.

आणि सर्व प्रतिसाद वाचले. तरी पण राहववत नाही म्हणुन सांगतो. आंबा कोणताही असुद्या, तो पाडावर(झाडावर) पिकलेला असावा. असा पाडाचा आंबा खायला मिळण म्हणजे स्वर्ग सुख ब्रका? आण्णा (जगदिश खेबुडकर ) काय म्हणतात तेवढ ऐकाच ;-) http://www.dhoomley.com/meemarathi/Pinjra/Naka%20Todu%20Pavan%20Jara%20Thamba.htm *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

सुगंध, रूप, रंग, नेत्रसुख यात उजवं फळ घ्यावं. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

हापुस म्हणजे हेमामालीनीचा चेहरा तर केशर म्हणजे ईशा देओलचा ! (आपली पसंती मात्र केशरला) --------------------- हे शेतकर्‍यांचे राज्य व्हावे.