आंबे कसे निवडावे?
राम राम मंडळी
सध्या आंब्याचा सीझन चालु आहे. बाजारात अनेक त-हेचे आंबे दिसत आहेत. काही आंबे पाट्यांमधे असतात तर काही गाड्यांवर असतात. दुकानात मांडलेले असतात तर काही रस्त्यावर. काही पिकलेले काही कच्चे. काही गोड तर काही आंबटतुरट. काही चोखायचे तर काही कापायचे. काही झडप घालुन घेण्यासारखे तर काही हळुवार कोमलतेने हाताळायचे. एक ना अनेक हजारो प्रकार. काहींना हापुस म्हणतात, तर काहींना पायरी. काही तोतापुरी तर काही केशर. काही गावठी तर काही संकरित. आकारही किती विविध असतात. काही मुठीत बसतात तर काही दोन्ही हातात पण मावत नाहीत.
मिसळपाव