Skip to main content

आमच्या घरचा व्हेज पिझ्झा

लेखक मस्तानी यांनी शुक्रवार, 25/06/2010 21:28 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव वर पाककृती ज्या प्रकारे सादर केल्या जातात ते पाहून एकदा मला पण हुक्की आली आपण देखील असं करून पहावं ... पण मुळातच पाक-कला-गुण अंगी नसल्याने करायचं काय न फोटो कशाचे काढायचे हा विचार करण्यात काही दिवस गेले ... मग शेवटी मनाचा हिय्या केला आणि एक प्रयोग करायचा ठरवला. प्रयोग यशस्वी झाला असं म्हणायला हरकत नाही कारण त्यानंतर पुन्हा "घरचा पिझ्झा" बनवण्याची फर्माईश आली.

???

लेखक प्रमोद देव यांनी शुक्रवार, 25/06/2010 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
कविता वाचता वाचता कुणी तरी करतोय विडंबन छान,मस्त,झकास वगैरे म्हणून आम्हीही देतोय उत्तेजन पण एकदा कहरच झाला एकामागून एक विडंबनाच्या गाड्या धावायला लागल्या सटासट्‌ आम्हाला भिती की एखादे वेळी गाडीच घसरायची अचानक त्या गुळगुळीत ’रुळा’वरून !!!
काव्यरस

[कूळ ]

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शुक्रवार, 25/06/2010 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
[इतके काव्य पचवल्यावर मी कसा दूर राहू. मूळ कवीचे आभार ] :) लॉगीन केल्याबरोबर, याची तक्रार त्याची तक्रार मी शांतपणे वाचत असायचो. तो या आयडीने यायचा अन ती या आयडीने यायची. तोल सांभाळत एकमेकांना डोळा मारत, काहीच्या काही प्रतिसाद ती टाकायची संपादक त्यांना समजून घ्यायचे. काळाबरोबर बदलत अनेक सदस्य रंगून गेले मी मात्र दाबत आहे डिलीट बटन या धाग्यावरुन त्या धाग्यावर. व्यर्थ...!
काव्यरस

नळ

लेखक अर्धवट यांनी शुक्रवार, 25/06/2010 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
आमची एक वास्तववादी.. हातात हात घेवुन आम्ही चालायचो ती एका नळाला घागर लावायची मी दुस-या नळावर कळशी ठेवायचो तोल संभाळत चालत असतांना बोलत असतांना असंच आयुष्यातही पाणी भरायचं एकमेकांना हलकेच बजावुन सांगायचो बोअरींगच्या गाडी येउन तीची पाणीटंचाई संपवुन गेली. मी मात्र मारत आहे पाण्यासाठी वणवण चकरा - ऩळ टु नळ
काव्यरस

(वळ)

लेखक अर्धवट यांनी शुक्रवार, 25/06/2010 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
उप्पर मेरा एक.. हातात हात घेवुन आम्ही चालायचो ती एका रुळावर पाय ठेवायची अन् मी दुस-या रुळावर पाय ठेवायचो तोल संभाळत चालत असतांना बोलत असतांना "बाबांना आधी तुच सांगायचं" एकमेकांना हलकेच बजावुन सांगायचो हळुच दाराआडुन, कधीतरी तिचा बाप बघुन गेला माझ्या मात्र पाठिवर आता "वळ" दुखतायत जोरात - पाय टु केस.

(गळ)

लेखक मोहन यांनी शुक्रवार, 25/06/2010 16:29 या दिवशी प्रकाशित केले.
आमचाही एक प्रयत्न. वाहत्या गंगेत ... कोणे एके काळी गळ टाकून मासे पकडायचा आमचा छंद कधी बसमधे ,कधी कॉलेज कट्टयावर तर कधी चौकात प्रत्येकाचा गळ वेगवेगळा गळ जास्त मासे मोजकेच पण छंदात आम्ही धुंद एकमेका सहाय्य करायचा पंथ हार मानायची नव्हती , होतोच बेधुंद मासा गावायला धीर लागतो जरा जाग येवून पाहतो तर मासेपारधी गळ विकून बांधलेले दिसले दावणीला मी मात्र आताशा करतोय समुपदेशन ... मासा टू मासा मोहन
काव्यरस

इंद्रवज्र : माहिती हवी आहे.

लेखक महेश हतोळकर यांनी शुक्रवार, 25/06/2010 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या म.टा. मध्ये इंद्रवज्राबद्दल वाचले. नवीनच माहिती वाटली. कोणाला याबद्दल आजून माहिती आहे का? म.टा. मध्ये फारच त्रोटक दिले आहे. जोडीला फोटोही असतील तर आजूनच मस्त.

रानकंद - करांदे

लेखक जागु यांनी शुक्रवार, 25/06/2010 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
लागणारे साहित्य : करांदे धुवुन काप करुन आपट्याचा पाला राखाडी मिठ (जाडे असल्यास चांगले) पाककृती: कापलेले करांदे राखेमध्ये घोळवुन तो पातेल्यात आपट्याचा पाला मध्ये मध्ये घालून रचावे. टोपाच्या कडेने करांदे बुडे पर्यंत अलगद पाणी टाकावे आता हे उकळवत ठेवावे. उकळी आली की पाणी काढुन टाकावे (टोपावर झाकण ठेउन टोपाच्या दोन कडांना झाकणा सकट धरुन उतरते धरुन पाणी काढावे). हे पाणि एकुण दोन वेळा काढावे. तिसर्‍या पाण्यात मिठ घालावे व करांदे शिजवुन घ्यावेत.

सुळ

लेखक कोदरकर यांनी शुक्रवार, 25/06/2010 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
हे घ्या आणखी एक... कायदा हातात घेवून ते चालायचे कधी अफगाण कधी पाकिस्तान मधे दिसायचे... जीव सांभाळत चालत असतांना बोलत असतांना असंच मुठीत घेवून आपणजगायचे सगळ्यांना बजावुन सांगायचो कायद्याच्या रुळावरुन कधीतरी त्यांची गाडी घसरली फाशीचे सुळ मात्र वाट पहात आहेत चातकासारखी कधी येतात... अफजल टु कसाब
काव्यरस