मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रानकंद - करांदे

जागु · · पाककृती
लागणारे साहित्य : करांदे धुवुन काप करुन आपट्याचा पाला राखाडी मिठ (जाडे असल्यास चांगले) पाककृती: कापलेले करांदे राखेमध्ये घोळवुन तो पातेल्यात आपट्याचा पाला मध्ये मध्ये घालून रचावे. टोपाच्या कडेने करांदे बुडे पर्यंत अलगद पाणी टाकावे आता हे उकळवत ठेवावे. उकळी आली की पाणी काढुन टाकावे (टोपावर झाकण ठेउन टोपाच्या दोन कडांना झाकणा सकट धरुन उतरते धरुन पाणी काढावे). हे पाणि एकुण दोन वेळा काढावे. तिसर्‍या पाण्यात मिठ घालावे व करांदे शिजवुन घ्यावेत. मग हे पुर्ण गार झाल्यावर स्वच्छ धुवुन खायला घ्यावेत. हे आहेत धुतलेले करांदे. Image removed. हा आहे आपट्याचा पाला जो आपण दसर्‍याला सोने म्हणुन वाटतो. Image removed. ह्या आहेत कापलेल्या करांद्याचे काप : Image removed. अश्या प्रकारे राखाडीत घोळवायच्या. Image removed. आपट्याचा पाला घालून अश्याप्रकारे हे काप रचायचे. Image removed. अश्या प्रकारे पाणी घालुन उकळवावे. Image removed. दोनदा पाणी बदलल्यावर मिठ घातलेल्या पाण्यात उकळवुन काढल्यावर स्वच्छ धुतलेल्या करांद्याच्या फोडी. Image removed.

वाचन 6381 प्रतिक्रिया 14