इराणमधे सकिने मोहम्मदी अश्तियानी (मराठी उच्चाराबद्दल संभ्रमित) ह्या चाळिशीच्या महिलेला दगडांनी ठेचून मारण्याची शिक्षा तिथल्या न्यायालयाने दिली होती. मानवाधिकारवाल्या लोकांनी जगभर रान उठवल्यामुळे ती शिक्षा रद्द झाली. ह्या बाईंना व्यभिचारी म्हणून ही शिक्षा दिली गेली. तिला ९९ फटक्यांची शिक्षा आधीच देऊन झाली आहे. संबंधित प्रकारात दुसरी व्यक्ती (बहुधा पुरुष) हिला काय शिक्षा मिळाली ते कळत नाही.
मराठी वृत्तपत्रात याविषयी फारसे काही आलेले आढळले नाही.
माझे मतः ह्या रानटी, कालबाह्य, क्रूर शिक्षेला कुठला सुसंस्कृत देश थारा देणार नाही. पण अस्सल इस्लमी कायदा जिथे लागू असतो तिथे हा प्रकार राजेरोस होतो.