Skip to main content

रानफुले

लेखक कर्नलतपस्वी यांनी गुरुवार, 21/10/2021 10:35 या दिवशी प्रकाशित केले.
करू कशाला तमा जगाची मागू कशाला उगा क्षमा प्रमाद माझा एकच झाला शोधत गेलो मानवतेच्या पाऊलखुणा ढळलो नाही वळलो नाही वेचत गेलो काटे कुटे शोधत होतो जळ मृगजळी अन गर्द सावली फड्या (निवडुंगा) खाली तमा न केली उगा कशाची फुटलो मी जरी उरी प्रमाद माझा एकच झाला कधी न केले क्रंदन कितीही शीणलो मी तरी जरी लक्ष माझी सोनफुले शोधत होतो रानी वनी कधी न केले अवडंबर त्याचे जरी हाती आली रानफुले....... 21-10-2021
काव्यरस

कोकोनट अप्पम

लेखक दिपक.कुवेत यांनी बुधवार, 20/10/2021 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
Appam णमस्कार णमस्कार णमस्कार!!! कसं चाललय मंडळी?? सगळे स्वस्थ आहात ना? चला आता चर्चेत वेळ न दवडता झटपट नारळ अप्पम करा आणि मस्त आस्वाद घ्या. साहित्य: ईडली/साधे तांदूळ - २ कप मेथी दाणा - १ छोटा चमचा पातळ किंवा जाड पोहे - १ कप खोवलेला ओला नारळ - १ कप चवीनुसार मीठ/साखर कॄती: १. तांदूळ स्वच्छ धुवुन ४-५ तास भीजत घालावे २. वाटण्याआधी एक ५ मि. पोहे भीजवुन ठेवावे (खरा एवढाहि वेळ लागत नाहि) ३.

आभाळाच्या फळ्यावर

लेखक अनन्त्_यात्री यांनी बुधवार, 20/10/2021 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
धूमकेतूच्या खडूने आभाळाच्या फळ्यावर काहीबाही लिहीण्याची होता ऊर्मी अनावर चांदण्यांच्या ठिणग्यांची घेतो मदत जराशी चित्रलिपी सजविण्या लिहीतो मी जी आकाशी रात्र होते जशी दाट तशा काही अनवट मिथ्यकथा नक्षत्रांच्या उजळती नवी वाट झळाळते तेजोमेघ गूढ कृष्णविवरांशी बोलताना, जोडतो मी नाळ आकाशगंगेशी भेट विराटाशी थेट माझ्या नक्षत्रभाषेची रोमरोमातून तिच्या रुणझुण ये सूक्ष्माची लागे उगवतीपाशी जेव्हा उषेची चाहूल माझ्या नक्षत्रभाषेची फिकटते चंद्रभूल

अवघाचि संसार - कल्याण

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी बुधवार, 20/10/2021 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचे भाग अवघाचि संसार-हिंदळे अवघाचि संसार- हिंदळे-२ अवघाचि संसार- जांभुळपाडा रामचा निरोप घेऊन मजल दरमजल करीत हरभट हिंदळ्यात पावते झाले तेव्हा एक नवीनच समस्या त्यांच्यापुढे उभी राहिली होती. त्यांच्या अपरोक्ष गोंद्याने जोर करून त्यांच्या अर्ध्या बागेचा ताबा घेतला होता. तात्पुरते कुंपण वगैरे घातले होते.

वर्षा!

लेखक Bhakti यांनी मंगळवार, 19/10/2021 23:07 या दिवशी प्रकाशित केले.
१.वसंतोत्सव साजरा २.ग्रीष्मोत्सव साजरा वर्षा...... जीवनासाठी आसुसली धरणी माय श्रावणापासून सरी झेलत झेलत भाद्रपदभर तुडूंब काठोकाठ पाण्याच्या आनंदाने बहरून पावते. शेतातल्या बीजांनी थेंब थेंब रुजून घेऊन शेतकऱ्यांच्या गळ्यात विजयाच्या माळा तोंडात सुखाचा घास भरवावा असा हा भारतातला महत्वाचा ऋतू..वर्षा ऋतू! केरळात वर्षा उर्फ मान्सूनचे आगमन झाले की आपल्या घरी हा कधी येतो यासाठी प्राणी,पक्षी,वृक्ष सगळेच चातक झालेले असतात.आभाळ भरून येत ,गरजत आता सर्वत्र थैमान घालण्याच्या तयारीत असतो.त्याला बरसून बरसून स्वच्छ ,निर

हातभार लावावा !

लेखक हेमंतकुमार यांनी मंगळवार, 19/10/2021 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
गंमती वाक्प्रचारांच्या : भाग १ नमस्कार ! एक गमतीदार भाषिक प्रयोग सादर करतो आहे. ‘हात’ हा शब्द असलेले सुमारे ३० वाक्प्रचार एका गोष्टीत एकत्र गुंफले आहेत. गोष्ट बाळबोध आहे हे सांगणे न लगे. हाताचे वाक्प्रचार याहून अधिक माहीत असल्यास जरूर भर घालावी आणि गोष्ट पुढे चालू ठेवावी. प्रतिसादात नुसते वाक्प्रचार न लिहिता ते गोष्टीच्या कुठल्याही परिच्छेदात घालून गोष्ट पुढे सुसंगत होईल असे पहावे.

अश्रूंचे झरे

लेखक चांदणशेला यांनी सोमवार, 18/10/2021 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्न सारे आज पेटले अश्रूंचे झरे डोळ्यांत आटले हृदयात माझ्या गहिरी वेदना जळतो हा प्राण सांगू कुणा पाश अंतरीचे कसे सुटले येते रोज आठवणींचे वादळ थकलेल्या जीवास राहिले ना बळ डोईवरले आभाळ विस्कटून गेले दैव माझे झाले खोटे हातातल्या फुलांचे झाले काटे जुलूम नियतीचे सारे मी झेलले
काव्यरस

पहिलं वहिलं प्रेम माझं

लेखक प्रज्ञादीप यांनी सोमवार, 18/10/2021 09:00 या दिवशी प्रकाशित केले.
कवितेचा नायक ..गावातील बँक अधिकार्राचा मुलगा काॅॅलेजमद्ये नायक व नायिका एकत्र शिकतात पहिलं वहिलं प्रेम माझं मुकंच राहुन गेलं . आयुष्याचं इंद्रधनु फिकंच राहुन गेलं . कुणीच कुणाला काही नाही बोललेलं पण डोळ्यातलं प्रेम डोळ्यांना समजलेलं. एक दिवशी मी लवकर येउन त्याच्या बाकावर लाल गुलाब ठेवलेले. सगळ्या वर्गाने त्याला चिडव चिडव चिडवलेले . मग तो काही दिवस दिसलाच नाही .... अचानक त्याच्या वडीलांची बदली झाल्याचं कानावर आलं. अन् डोळ्यातलं प्रेम आसवांबरोबर वाहुन गेलं. पहिलं वहिलं प्रेम माझं मुकंच राहुन गेलं . आयुष्याचं इंद्रधनु फिकंच राहुन गेलं .

हंपी, हंपी आणि पुन्हा हंपी! भाग २

लेखक एक_वात्रट यांनी रविवार, 17/10/2021 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
०८ ऑगस्ट आजचा आमचा पहिला थांबा होता गणिगत्ती जैन मंदिर. अगदी साध्याश्या या मंदिराकडे लोकांना आकर्षित करेल असं काहीच नाही; ना भव्य आकार, ना कुठली आकर्षक कलाकुसर. मला मात्र हे मंदिर त्या काळच्या राजांच्या उदार आणि प्रत्येक धर्माचा आदर करण्याच्या प्रवृत्तीचं प्रतीक वाटलं!

कंटाळा

लेखक पाटिल यांनी रविवार, 17/10/2021 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
एके दुपारी आम्ही कार्यालयात टंगळमंगळ टोलवाटोलवी इत्यादी महत्वाची कामं करत बसलो असतानाच शेजारचे रावसाहेब नामक समवयस्क सहकारी मित्र बोलले की, "पाटील, आज जरा कंटाळाच आलाय बुवा." यावर आम्ही बोललो की, "रावसाहेब, तुम्हाला कंटाळा आलाय ही उत्तमच गोष्ट झाली. कारण आजच्या स्पर्धेच्या युगात स्वतःला सतत सिद्ध करत राहणं, स्वतःला सतत वागवत राहणं, ही काही सोपी गोष्ट नाही. त्यामुळे मनुष्याला अधूनमधून कंटाळा येणं अगदी साहजिक आहे. उदाहरणार्थ कामाचा, राहत्या जागेचा, शहराचा, गोंगाटाचा, माणसांचा वगैरे कंटाळा येणं हे नैसर्गिकच आहे.