चकलीची एक जग्गात भारी आठवण... वाचाच!
...चकलीच्या आठवणीनं डोळ्यात पाणी आलं.
इथे आल्यावर चकली खायची इच्छा झाली ,म्हणतात ना विनाशकाले विपरित बुद्धि.
इथल्या एका दुकानामध्ये मूरक्कू नावाचा चकलीचा दक्षिण भारतिय चुलतभाऊ दिसला. हौस आणि हव्यासापोटी घरी घेऊन आले.
घरी येऊन मस्त चहा बनवला आणि बसले ते मुरक्कू घेऊन.
बोटांनी तुकडा मोडायचा प्रयत्न केला तर काही तुटेना..
मग आणखी पुढचा गाxव पणा केला आणि सरळ तोंडात टाकली.
तरिही तो मुरक्कू दाद देइना तर सोडुन द्यावा ना विषय,पण नाही. हावरटपणा!
त्यापुढचा गाxवपणा+ कुडुम कुडुम खायला सुरुवात केली. एक दोन सेकंद चर्वण केले.आणि पहिल्याच तुकड्यात खडा आला.
मिसळपाव