Skip to main content

धागा धागा अखंड दळूया

लेखक केसुरंगा यांनी बुधवार, 04/08/2010 02:18 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या दोन दिवसांपासून मिपावर अनेक सुरेख चर्चा चालू आहेत. अनेक नवनवीन सदस्य मिपावर येऊन लेखन करुन आपल्या मनातल्या भावनांचा निचरा करत आहेत. विचारांची देवाण घेवाण करत आहेत. त्यावर साधक बाधक चर्चा होत आहेत, विचारप्रबोधन, तसेच मनोरंजन होत आहे.. अनेक लोकांना आनंद झालेला आहे.. जुन्या मिपाच्या नावे उमाळे फुटू लागले..
काव्यरस

एक निर्णय्...मदत न करण्याचा. माझा निर्णय चुकीचा आहे कि बरोबर?

लेखक जाई अस्सल कोल्हापुरी यांनी बुधवार, 04/08/2010 02:07 या दिवशी प्रकाशित केले.
एक निर्णय... मदत न करण्याचा. ...परवाचीच गोष्ट आहे. माझ्या शेजारी एक पाकिस्तानी कुटुंब राहते.अगदी well established...नवरा,बायको आणि तीन मुलं.रोजच्या बोलण्या- भेटण्यातून तिच्याशी छान मैत्री झालेली आहे. तिचं नाव लाईमा आहे. वयाने माझ्या एवढीच आणि अतिशय सुंदर! तिच्या सारखीच तिची मुलंही देखणी. एक मुलगी आणि दोन मुलं. ती सारी फलटण माझ्याकडे खेळायला,अभ्यासाला येते.अगदी रोज येते. लाईमा सुद्धा खूप प्रेमळ आहे.अतिशय हसरी,बोलकी आहे.तिच्या नवऱ्याला काही मी पाहिलेले नाही.कारण ती माझ्याकडे तो office ला गेल्यावरच येते. आमचे जे काही बोलणे-भेटणे होते ते तो गेल्यावरच.

रावण पिठल्यावर उतारा...मलाई मिंट स्मूदी (लस्सी ची इं.आवृत्ती)

लेखक जाई अस्सल कोल्हापुरी यांनी बुधवार, 04/08/2010 00:31 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : १ कप गोड घट्ट दही २-३ चमचे साखर पुदिन्याची पाने -७-८ बर्फ ३-४ क्यूब्ज घरगुती साय २-३ चमचे किंवा whipping cream किंवा व्हिप्ड क्रीम स्प्रे कृती : अगदी बारीक चिरुन घ्या. दही + साखर + चिरलेला पुदीना मिक्सर मध्ये घ्या. साखर विरघळेपर्यंत ब्लेंड करा. बर्फ घालुन थोडा वेळ फिरवा. ग्लास मध्ये घ्या. त्यावर आपली मस्त घरगुती दाट साय घाला. किंवा क्रीम घाला. एखाद्या पुदीन्याच्या पानाने मस्त गार्निश करा. आपल्या आवडत्या जागी जा जिथे कोणी त्रास देणार न

१ ऑगस्ट २०१०

लेखक सारंग कुलकर्णी यांनी मंगळवार, 03/08/2010 23:12 या दिवशी प्रकाशित केले.
आज १ ऑगस्ट २०१०. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची पुण्यतिथी. दररोज सकाळी इंटरनेटवर वृत्तपत्र वाचणे हा माझा क्रम ठरलेला आहे. त्याप्रमाणेच आज मी सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, आणि लोकसत्ता ही नेहमीची वृत्तपत्रे उघडली. अर्थात टिळकांचा स्मृतीदिन आणि रविवार असा योग असल्या कारणाने माझ्या या आवडत्या व्यक्तिमत्वाबद्दल भरभरून वाचायला मिळणार अशी माझी खात्री होती. पण मी एक गोष्ट विसरलो होतो किंवा दुर्लक्षित केली होती म्हणणे योग्य होईल, कि या महान नायकाच्या पुण्यतिथीपेक्षाही महत्त्वाची तिथी आज होती.

बेस्ट OF फाईव्ह. विद्याथ्याचा दृष्टीकोन.

लेखक Bhushan Kulkarni यांनी मंगळवार, 03/08/2010 22:27 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार! टिप-(पहिलाच लेख आहे त्यामुळे काही चुका आहेत कृपया समजुन घ्यावे.हा एक ट्रायल लेख) मी 10वी शिकत आहे.सध्या गाजत असलेल्या BEST OF 5 या राज्य सरकार च्या निर्णया बद्दल मी माझे वैयक्तीक मत मांडणार आहे.या निर्णयांबाबत आमच्या विद्यार्थाँमध्ये जी चर्चा चालते ती तुमच्या समोर मांडणार आहे.: BEST OF 5 चा निर्णय चांगला आहे कारण आम्हा विद्यार्थ्याँचे सर्वात जास्त मार्कस हे मराठीत जातात.आणि BOF मुळे शक्यतो मराठी बाजुला पडते.तसे बघितले तर मराठी आपली मातृभाषा.तिच्यात जास्त मार्कस मिळायला हवेत पण मराठीच्या पेपरला हस्ताक्षर,शुद्धलेखणाच्या चुका,ईत्यादी निव्वळ लेखणाच्या चुकात गुण जातात.माझ्या मते जगात खुप लोकांना आपली मातृभाषा कुठलीही असो ती लिहायला नीट जमत नाही. उदा. अमेरीकेच्या ENGLISH SPELING MASTER र्स्पधेच्या विजेतेपदी अनेक वेळा अमेरीकन नाही तर भारतीर अथवा आशियन मुलांचा समावेष आहे. सध्या वर्तमान पत्रात खुप वेळा वाचले आहे की ENGLAND,US लिखापडीच्या कामांमध्ये भारतीर आणि आशियाई व्यक्तिँची नेमणुक जास्त केली जाते कारण त्यांच्याकडुन ENGLISH GRAMMAR च्या चुका ENGLISHलोकांपेक्षा कमी होतात. S.S.C मध्ये बहुतांश मुलांचे मराठीचे गुण हे ईतर विषयांच्या गुणांपेक्षा कमी असतात.माझ्या मते 80% मुलांचे BEST OF हे विज्ञान.गणित,समाजशास्त्र,ईग्रजी आणि संस्कृत हे असणार आहेत कारण यात पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात.आणि 95%च्या आसपास सहज जाता येते. त्यामुळे माझ्या मते B O F IS THE BEST.

न कळणार्‍या गोष्टी

लेखक महानगरी यांनी मंगळवार, 03/08/2010 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
आज काल बऱ्याच गोष्टींचे अर्थच कळेनासे झाले आहेत. आपली आणि लोकांची आवड यात एवढा फरक कधी पडायला लागला? आपल्याला साधारण "वाह्यात" वाटणारे वागणे हे "हिप" किंवा "कूल" आहे असे चक्क छापून कसे येते आहे? आत बघा मी एक यादीच तयार केली आहे १. राहुल/राखी च्या स्वयंवराला येणार्‍या इच्छुक वधू/वर आणि त्यांचे कुटुंबीय - सगळ्या जगाकडून हसू करून घ्यावे असे त्यांना का वाटावे? राखीचे चे मुरके, रडणे किंवा रागावणे त्यांना लोभसवाणे वाटले की काय! आणि सावंत बाईंचे लाजऱ्या भारतीय वधूचे रूप, (कलात्मक पद्धतीने अंग उघडे टाकले असले तरी) आपण खरे आहे असेच मानले ना.

३० जुलै - वसंतराव देशपांडे यांचा स्मृतिदिन

लेखक भारी समर्थ यांनी मंगळवार, 03/08/2010 20:14 या दिवशी प्रकाशित केले.
वसंताची गायकी परंपरेच्या पालखीतून संथपणे मिरवीत जाणारी नाही. दर्‍याखोर्‍यातून बेफाम दौडत जाणार्‍या घोडेस्वारासारखी त्याच्या गायकीची मूर्ती आहे. भर ऊन्हाळ्यात पलाशबनात अग्निपुष्पे फुलावी तशी ही गायकी. ती फुले पहायला ऊन्हाची तिरीप सोसणारी जवानी हवी. - पु.ल. देशपांडे फार दिवसांपूर्वी ’नक्षत्रांचे देणे’ या कार्यक्रमात शंकर महादेवन यांनी ’बगळ्यांची माळ फुले’ गायले होते. त्यावेळी गाण्याचे मूळ गायक ’वसंतराव देशपांडे’, अशी प्रथमच माहिती मिळाली. पण, वसंतरावांची पहिली खरी ओळख झाली ती पुलंनी त्यांच्यावर लिहीलेल्या एका लेखातून.

पुस्तकविश्व

लेखक ऋषिकेश यांनी मंगळवार, 03/08/2010 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
"अरे ते ना सी फडक्यांचं पुस्तक.. काय बरं नाव त्याचं!! छ्या आता नेमकं लक्षात येत नाहि आहे" "हो रे परवा मला पण युगांतच्या लेखिका पटकन आठवेना. इतकं छान पुस्तक पण काहि केल्या नाव आठवेना" "अरे नेमाड्यांची हि दोन पुस्तकं मी वाचली मस्तच लिहितात. बाकी त्यांनी कोणती पुस्तकं लिहिली आहेत त्याची यादी मिळते का रे कुठे" "हे पुस्तक मस्त दिसतंय पण महाग आहे. घ्यावं की नाहि कोणी परिचय/परिक्षण लिहिलं असतं तर किती बरं झालं असतं" "काय सांगतोस तुला नाहि आवडलं ते पुस्तक. मला तर फार आवडलं.. तु सांग काय नाहि आवडलं?" अश्या प्रकारचे प्रश्न/चर्चा तुम्ही करता की नाहि? आणि बर्‍याचदा प्रश्न हे प्रश्नच रहातात.