Skip to main content

नेमाडेंचे हिंदु एक समृद्ध अडगळ कोणी वाचले आहे का?

लेखक थोर्लेबजिराव यांनी शुक्रवार, 06/08/2010 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
नेमाडेंचे हिंदु एक समृद्ध अडगळ कोणी वाचले आहे का? मिसळपाववर लिहिताना कृपया देवनागरी लिपीचा वापर करावा. - संपादक मंडळ

मासे १३) वाकटी

लेखक जागु यांनी शुक्रवार, 06/08/2010 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
लागणारे साहित्य: ४-५ वाकट्या हिंग, हळद, १ चमचा मसाला चविपुरते मिठ ४-५ लसुण पाकळ्या ठेचुन तळण्यासाठी तेल. क्रमवार पाककृती: प्रथम वाकटीचा बाजुचा छोटा पिसारा ओढून काढायचा. मग त्याचे डोके व शेपुट काढुन तुकडे करायचे व स्वच्छ धुवायचे. तेल वगळून वरील सर्व जिन्नस एकत्र करायचे व तव्यावर मिडीयम गॅस वर वाकट्या शॅलो फ्राय करायच्या. जास्त वेळ शिजउ नये त्यामुळे कडक होतात.

ग्रिन चिकन

लेखक जागु यांनी शुक्रवार, 06/08/2010 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
लागणारे साहित्य: १ किलो चिकन साफ करुन धुवुन २ बटाटे फोडी करुन ग्रिन मसाला वाटण - मिरच्या १० (तिखटाच्या आवडीवर अवलंबुन) कोथिंबीर २ मुठ, पुदीना १ मुठ, आल १ इंच, लसुण ८-१० पाकळ्या. हिंग, हळद, चवीप्रमाणे मिठ १ लिंबु गरम मसाला १ चमचा तेल क्रमवार पाककृती: प्रथम धुतलेल्या चिकनला वरील वाटण, मिठ, हिंग, हळद, एक लिंबाचा रस चोळून घ्यावे व अर्धा तास मुरवत ठेवावे. मग तेलावर वरील सगळ टाकुन बटाट्याच्या फोडी टाकाव्यात.

आभाळमाया

लेखक दत्ता काळे यांनी शुक्रवार, 06/08/2010 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
अंगणात फिरताना रात्री सहज आकाशाकडे लक्ष गेले खूप दिवसात आकाशच नाही बघितले असंख्य तार्‍यांनी भरलेले दूर दूर विखरलेले तारे स्वयंप्रकाशी, लखलखणारे मूलतत्वाशी नाते असणारे एकमेकांपासूनद्धा आता किती दूर बघता बघता एक तारा निखळला गालावरून ओघळणार्‍या अश्रूसारखा घसरून गेला अनंतात आकाशाशी नाते सोडून दचकून भानावर आलो.. आभाळमाया जपायला हवी अश्म होईतोवर तरी

पाऊस...

लेखक वैभव देशमुख यांनी शुक्रवार, 06/08/2010 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याच माणसाची बरी नाही टाळाटाळ कोणी मागतो पाऊस त्याला देवू नये जाळ सोड मनातली आढी नको झुराया लावूस माझे डोळे चातकाचे तुझा चेहरा पाऊस... - वैभव देशमुख

तरंग

लेखक अवलिया यांनी शुक्रवार, 06/08/2010 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
नजरेत नजर मिळवुन सखी बोलायची अन् भलत्या ठिकाणी रेंगाळणारी नजर पाहुन हात मानेजवळ नेऊन काय हे म्हणायची... डोळ्यातील गढुळपण कमी होतांना ओठातल्या ओठात हसायची अन् स्मित टिपले नाही म्हणुन रुसायची आजकाल अवचित तळ्यात पडणारा दगड हलकेच तरंग उमटवतो अन शांतपणे तळाशी जातो परत सगळं शांत शांत ... जसं काही झालंच नाही.

मस्त मस्त कुकिज

लेखक जासुश यांनी शुक्रवार, 06/08/2010 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
१ कप गव्हाचे पिठ 1/4 कप self raising फ्लोर 1/2 कप पिठि साखर 1/4 टिस्पुन मिठ 1/2 टिस्पुन इलायची 1/2 कप अनसॉल्टेड बटर 2 टेबल्स्पून्स दुध ओवेन 360 डिग्री फॅरनाइट वर प्री हिट करा. एका बोल मधे पीठ, साखर,मिठ,इलायची पाउडर मिक्स करा. आता वितल्लेले बटर,दूध घालुन निट मिक्स करा व ते वरिल बोल मधिल मिक्स मधे घाला. ह्याचा मळून मउ गोळा करा. आनी त्याचे छोटे छोटे गोळे करून चप्टे करा. आता हे गोळे बेकिंग ट्रे वर ठेवा.