Skip to main content

विचारी मना . . .

लेखक दत्ता काळे यांनी सोमवार, 09/08/2010 21:01 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षांपूर्वींची गोष्ट मी पुण्याहून रत्नागिरीला ९.३० च्या रातराणीने (बसने) चाललो होतो. बसला खूप गर्दी होती. मी अ‍ॅडव्हान्स बुकींग केलं होतं. टू बाय थ्रीची सिटींग अ‍ॅरेजमेंट असलेल्या त्या बसचे मला एका बाकावरचे बाहेरचे तिसरे सीट मिळालेले होते. बसमध्ये कंडक्टर आल्यावर त्याने सगळी तिकिटे चेक करून, ज्यांचे बुकींग (रिझर्वेशन) नव्हते त्यांची तिकीटे फाडली आणि थोड्यावेळात बस सुरु झाली. ड्रायव्हरने बसमधले सगळे लाईटस बंद करून फक्त कंडक्टरच्या वर असलेला निळा लाईट चालू ठेवला. जवळपास सगळेच प्रवासी झोपण्याच्या मूडमध्ये असल्याने बसमध्ये फारसा गोंगाट, बडबड नव्हती.

पन्हाळा-

लेखक चिंतामणी यांनी सोमवार, 09/08/2010 20:55 या दिवशी प्रकाशित केले.
कुठल्या वेळेस जाण्यास पन्हाळा हे छान ठिक़ाण आहे. उन्हाळ्यात जा, पावसाळ्यात जा किंवा थंडीत.

नाव सुचले नाही....

लेखक बरखा यांनी सोमवार, 09/08/2010 20:40 या दिवशी प्रकाशित केले.
दाराला तोरण आ॑ब्याचे र॑गित रा॑गोळी,पणती तेवते, पाहुण्या॑ची रेलचेल गडबड वाढते आज दिन सोनियाचा,माझी लेक सासरला ग जाते... आईच्या डोळ्यात भरले ग पाणि, पापणि लवता मोती येतिल ग खाली ऊरातिल धडधड वाढ्तच जाते बघता बघता लेकीच्या डोक्यावर अक्शत पडेते, सुर येई सनईचे,चऊघडा ग वाजे लेक आईची कशी पति बरोबर सप्तपदी चालते लहान असताना धरे पित्याच्या ग हात सप्तपदी चालताना तिला होते का आठवण आज लेकीची झाल दिली तिच्या सासरी डोक्यावर ठेवली टोपली दिव्या॑ची, आईचे डोळे बोलती, मुली तेवत रहा सदा अशी सासरी झाले सर्व विधि मुलगी आ॑बा ग शि॑पते आईच्या मा॑डित झोपणारी काल, आ़ज पतिच्या मा॑डिवर पाय ठेवते आईच्या हातात डबा फराळाचा

गटारी आमुशा

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी सोमवार, 09/08/2010 19:57 या दिवशी प्रकाशित केले.
आखाड सरल्याची खूण म्हणजे गटारी आमुशा. अर्थात आषाढ मासाची अंतिम तिथी. खेडोपाडी या आमावस्येला भलतेच महत्त्व असते. श्रावणात मांस-मच्छी-दारू सबकुछ वर्ज्य असल्याने जे काही खायचे प्यायचे ते या शेवटाच्या दिवसापर्यँतच अशी रूढी रुळलेली दिसते. सगळ्यांसाठी दिवस ठरवून दिलेत. मातृदिन, पितृदिन, मैत्रीदिन एवढेच काय स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिन अशा कितीतरी दिवसांची दिनदिन दिवाळी वर्षभर सुरु असते. मग आपलाही एखादा हक्काचा दिवस का नसावा? अशी शंका घेऊन समस्त देवदासांनी एकत्र येऊन ही गटारी आमुशाची योजना उचलून धरली असावी. आणि नित्यनेमाने ते ती पाळत आले असावेत.

कोणता मानू मी विठठल ?

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी सोमवार, 09/08/2010 19:33 या दिवशी प्रकाशित केले.

महाराष्ट्राचं लोकदैवत पंढरपूरचा पांडुरंग अनेकांचा श्रद्धेचा विषय. पंढरपूरचा पांडूरंग सर्वसामान्यांचा देव. गरिबांना पावणारा. भक्ताच्या रक्षणासाठी धावत येणारा. असा महिमा महाराष्ट्रभर मराठी माणसाच्या मनात दडून बसलेला आहे. पंढरपूरचा हा विठोबा वारक-यांचा देव आणि वारकरी संप्रदाय हा बहुजनांचा पंथ. निमंत्रणाशिवाया लाखोंची 'पाऊले पंढरीची वाटं चालतात हे एक आश्चर्यच आहे. अशा या पांडुरंगाच्या भेटीचे योग जुळुन येणार होते. पंढरपूरला पूर्वी पंडरंगे, पांडरंगपल्ली,

विश्वरूप तेज झाले | सर्व तेज येथ आले |

लेखक सागरलहरी यांनी सोमवार, 09/08/2010 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
Mahalaxmi विश्वरूप तेज झाले | सर्व तेज येथ आले | जगज्जननीरूप बनले | महालक्ष्मी || रजत वर्ण प्रभावळ | त्यात शोभे मुख कमळ | सुवर्ण मुगुट उज्ज्वळ | दिव्य रूप || सुंदर नथ नासिकेसी | कंठी भूषणे ल्याली तैसी | प्रेमे पाहे भक्तासी | आदी-माया || सुवर्ण चरण सुंदर | मनोहर ल्याले नुपूर | पाहोनिया भक्तिपूर | मनी दाटे || सर्व विश्वाची आई | रक्त वर्ण वसन घेई | मातृ रूपे दर्शन देई | राम माझा || रूप मनोहर धरिले | परी गदा चक्र राखिले | वात्सल्याने भक्त पोशिल

काश्मिर व ईतर....

लेखक शानबा५१२ यांनी सोमवार, 09/08/2010 18:45 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार,नमस्कार..... काश्मिरमधल्या हींसाचाराची बातमी टीव्हीवर येत होती.हल्यात काहीतरी ४-५ माणसं मेली होती.हा आता काही गंभीर विषय राहीला नाही..असो.मला काहीतरी वेगळ बोलायच आहे. मी आमच्या राजाधिराज,परमपुज्य बापुंबरोबर टीव्ही बघत होतो.बापु चहा फुकत टीव्ही बघत होते. काश्मिरची बातमी आली. मी(मनात) :च्यायला ह्या लोकांच्या!!!

अर्पणपत्रिका

लेखक उमेश कोठीकर यांनी सोमवार, 09/08/2010 18:21 या दिवशी प्रकाशित केले.
आज, आपल्या पहिल्यावहिल्या रात्री, हे गोरेपान पुस्तक, तुझ्या शरीराचे हळुवार उघडतांना.... सुरूवातीलाच लक्ष वेधून घेतले बघ, तुझ्या मनाच्या; ईवल्याशा, निरभ्र, निष्पाप, पवित्र अर्पणपत्रिकेने! खरे तर; अर्पणपत्रिका टाळूनही...जाता आले असते पुढे भराभरा, अधीरपणे; पुस्तक संपविण्यासाठी सगळेजण तसेच तर करतात! पण...
काव्यरस

देऊनी स्वप्ने विझल्या गात्री

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 09/08/2010 18:19 या दिवशी प्रकाशित केले.
जरी काळरात्र होती ती तुझ्या कुशीत होती ती येई ना वेळ पुन्हा हाती ती थकल्या गात्री ....उत्तर रात्री श्वास अधीरे... गहिवरे धरित्री. ये सकाळ अवघा प्रकाश पसरे कारुण्य पुसे...
काव्यरस