Skip to main content

एका हाताने द्यायचे आणि एक हाताने घ्यायचेच, नाहीतर वेगळेच बरे.

लेखक गांधीवादी यांनी बुधवार, 11/08/2010 08:59 या दिवशी प्रकाशित केले.
गेली काही दिवस मिपावर बायका, आयटी, स्वयंपाक, ह्या विषयावर बरीच चर्चा झाली, त्यातून बरेच काही शिकायला मिळाले. आजूबाजूचे वातावरण नव्याने दिसू लागले. मात्र त्यातून काही नवीन विचारांना काहूर फुटत गेले. त्यातूनच हा लेख लिहिण्याचे ठरविले.मागे झालेल्या सर्व चर्चेचा विराम झाला आहे असे समजून (म्हणजे कुटुंब हे दोघांचे आहे, दोघांनी प्रेमाने एकमेकांना सांभाळून घेऊनच सर्व निर्णय घ्यायचे असते. असाच काही तो शेवटचा निर्णय ) एक नवीन विषयाला हाथ घालत आहे. (माझी लेखन शैली थोडी ढिसाळ असेल.

पुणेरी विक्षिप्तपणा!

लेखक इंटरनेटस्नेही यांनी बुधवार, 11/08/2010 03:08 या दिवशी प्रकाशित केले.
पुणेरी विक्षिप्तपणा _______________________________________________________ सदर लेख केवळ आपल्या मनोरंजनासाठी, माझा कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नाही. _______________________________________________________ ही घटना 'मे २००७' मधली, या काळात मी 'चाणक्य मंडल परिवारचा एक अभ्यासक्रम' पूर्ण करण्यासाठी म्हणून पुण्यात सुमारे एक महिना वास्तव्याला होतो. सदाशिव पेठेतील एका विद्यार्थी गृहात मी आणि माझा मित्र राहत असताना आलेला हा एक गंमतीशीर अनुभव.

कट्टा ईन कॅलीफोर्निया

लेखक मराठमोळा यांनी बुधवार, 11/08/2010 02:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, पुढच्या आठवड्यात मी सॅन फ्रॅन्सिस्को मधे महिन्या-दोन महिन्यासाठी काही कामानिमित्त येणार आहे, अनायासे ओळखी पाळखीचा धागा निघाला होताच म्हणुन हा प्रपंच. तर आमच्या कंपनीने मला दोन महिन्यासाठी उसा मधे पाट्या टाकण्यासाठी बोलावले आहे, नंतर कदाचित मी एखाद्या वर्षासाठी ऑस्ट्रेलिया ला जाईन. मग मनात विचार आला की आपल्या बे एरिआमधल्या लोकांना भेटावं, आठवणी सोबत राहतील. :) . एक वीकांत माझ्या काकाच्या घरी (फ्रिमोंट मधे) करण्याचे ठरवुन एखादा वीकांत मिपाकरांसोबत कट्टा करण्याची ईच्छा आहे. श्रावण पाळत नसल्याने कट्टा सामिष+पेयपान असा माझ वैयक्तीक आग्रह.

जीणं

लेखक अमोल मेंढे यांनी मंगळवार, 10/08/2010 18:51 या दिवशी प्रकाशित केले.
कुणीही येतं आणी ... भुकेलेल्याला अन्न मिळावं असं तुटुन पडतं... कुस्करुन जातं... पन्नासची नोट अंगावर फेकुन... त्याच्या प्रेमात मी पडले... अन् ... पळुन आले त्याच्या बरोबर... राजा राणीच्या सुखी संसाराच्या अपेक्षेत... पण शेवटी राजानेच राणीचा घात केला... आणी फक्त दहा हजारात माझा सौदा झाला... सुरुवातीला वाटायचं ... असल्या जीण्यापेक्षा.. आत्महत्याच करावी... पण आता सवय झालीय... अन् कालची सीता.. आजची सितारा म्हणुन बाजारात उभी राहलीय... तेव्हापासुन गल्लीत उभं राहुन... गिर्‍हाईकांची वाट पाहणं... आणी स्वत:ला कुस्करुन घेऊन... त्यांचं समाधान करणं... हेच आमचं जीणं.... हेच आमचं जीणं...
काव्यरस

आजचा शहाणपणा..........

लेखक गुपचुप यांनी मंगळवार, 10/08/2010 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
***"दोन वाईट गोष्टींमधून एक निवडायची वेळ आल्यास अशी गोष्ट निवडा जी तुम्ही पूर्वी करून पाहिली नाही." *** --------------------------------------------------------------------- "ग्लास अर्धा भरलेला आहे की अर्धा रिकामा आहे याचा विचार करण्यात वेळ न घालवता, ग्लास रिकामा झाल्यावर धुणार कोण याचा विचार करावा." --------------------------------------------------------------------- *लहानपणी खेळांविषयी प्रेम असतं तर......... तारुण्यात प्रेमाचे खेळ सुरू होतात... --------------------------------------------------------------------- आपली वडीलधारी मंडळी किती चलाख आहेत आम्हाला ते शिकवतात की , ' प्रत्येक स्त्रीला

घराकडे येताना मला काल पावसाने गाठले.......

लेखक गुपचुप यांनी मंगळवार, 10/08/2010 18:23 या दिवशी प्रकाशित केले.
घराकडे येताना मला काल पावसाने गाठले, जोरदार होता पाउस, सगळीकडे तळे साठले....! भिजत-भिजत जात होतो घराकडे...तेवढ्यात आवाज दिला कोणी, वळून बघता मागे, दिसली आमच्या कॉलेजची xyz...! जिच्यावारती झुरत होतो, जी देत नव्हती मला भाव, तिने साद घालून काळजावरती केला 'प्रेमळ' घाव...! तीही होती भिजलेली, अंगात थंडी भरलेली, लाल पंजाबी ड्रेस, अन् त्यावर matching लिपस्टिक लावलेली...! "भिजत कशाला जातोस...?

प्रेम कस असाव ?

लेखक गुपचुप यांनी मंगळवार, 10/08/2010 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम कस असाव ? क्षमाशील धरती सारख, विशाल आकाशासारख, लांबवर पसरलेल्या सागरासारख... ! प्रेम असाव आईच्या हृदयासारख, सगली दुःख सहन करूनही दुसर्यासाठी आणखी सुखाची अपेक्षा करणार...! वास्तवतेच्या आगीत होरपळून निघालेल्या तुमच्या मनाला सुखाचा, आनंदाचा ओलावा देणार... ! दिसत तस नसत, प्रेम ही असच असत, न कळत हृदयात घुसत, न जाण्यासाठी घर करून बसत.

मिपाकरांची ओळखपरेड ( नव्या-जुन्या सदस्यांची ओळख ) ...

लेखक छोटा डॉन यांनी मंगळवार, 10/08/2010 14:39 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो ( आणि मित्रांच्या मैत्रिणींनो ) ! मिसळपावच्या कट्ट्यावर दिवसेंदिवस नवनविन सदस्यांची भर पडते आहे.सर्व नविन सदस्यांचे मिपा परिवारातर्फे स्वागत ! मिपाचे रुपडे पालटले आहे.

मार खाण्याची तयारी ठेऊन (शब्दांचा) व सर्वांची माफी मागुन (आधीच)

लेखक आप्पा यांनी मंगळवार, 10/08/2010 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
हे माझे लिखाण नाही, संग्रह पण नाही, एका मित्राने काही वर्षापुर्वी एक ढकलपत्र पाठवले होते त्याचा अनुवाद आहे. आपण हे वाचलेही असेल.